Saturday 7 January 2017

दादा कोंडके एक अष्टपैलू कलाकार...

                                मराठी चित्रपटसृष्टीला खदखदून हसवणारे अष्टपैलू अभिनेते म्हणजे दादा कोंडके.  दादा कोंडके यांचे खरे नाव म्हणजे कृष्णा कोंडके. मराठमोळे अभिनेते ज्यांनी मराठी चित्रपटांतून अभिनय केला आणि ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. दादांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ झाला. आपण काहीतरी वेगळं करावं असं त्यांना प्रत्येक वेळेस वाटत असायचं म्हणून त्यांनी एका बँड पथकामध्ये सहभाग घेतला आणि तिथे सगळे सगळे त्यांना बँडवाले दादा म्ह्णून ओळखायला लागले. माझ्यावर एकतरी नाटक करा असं ते प्रत्येकवेळी म्हणायचे तेव्हाच वसंत सबनीसांनी दादांना घेऊन विच्छा माझी पुरी करा हे नाटक केलं. या नाटकाचे १५०० हुन अधिक झाले आणि हाच दादांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. दादा अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी राज्यभर दौरे केले लोकांची बदलत जाणारी भाषा तसेच भाषांचे प्रकार ह्याचा त्यांनी अभ्यास केला आणि चित्रपट निर्मिती चा विडा उचलला. त्यांच्या सवांदफेकीमुळे त्यांच्या सर्व भूमिका महाराष्ट्रात लोकप्रिय झाल्या आणि पडत्या काळात मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले.
                    त्यांची संवादफेक म्हणजे बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्या. लोकांना त्यांची हि कला बऱ्यापैकी पटली. त्यांच्या नेमक्या ठिकाणी पॉंझ घेण्याच्या स्टाईल ने लोकांना वेड लावून सोडले. तांबडी माती या चित्रपटात त्यांना प्रथमच मोठ्या पडद्यावर काम करायला मिळाले. त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे सोंगाड्या. सोंगाड्या चित्रपटात काम करून त्यांनी त्यांच्या अभिनयाचे कौशल्य जगभरात दाखून दिले. सुरवातीला सोंगाड्या ह्या चित्रपटाला बरेच विरोध आले नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशावरून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि तो सुपरहिट झाला. दादांनी नंतर स्वतःची निर्मिती संस्था सुरु केली ती म्हणजे कामाक्षी पिक्चर्स. दादांच्या चित्रपटांना नेहमीच सेन्सर च्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असत. त्यामुळे त्यांची नेहमी वाद्ग्रस्थ विषयांमध्ये चर्चा असायची त्यांचे बरेच चित्रपट सेन्सर बोर्ड ने अडवले.


                        त्यांचे सलग ९ चित्रपट २५ आठवडे सुपरहिट ठरले आणि सिल्वर जुबली झालेल्या या सर्व चित्रपटांमुळे मराठमोळ्या दादांचं नाव गिनीज बुक मध्ये नोंदवण्यात आलं. दुअर्थी विनोदाकडे झुकणाऱ्या संवादामुळे त्यांच्या चित्रपटांना प्रसिद्धी मिळाली. काही लोकांना त्यांचे हे विनोद पटण्यासारखे नव्हते परंतु बाकी प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर उचलून धरलं. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील काम केलं त्या चित्रपटांची नावं जरा हटके असायची तेरे मेरे बीच मे,अंधेरी रात मी दिया तेरे हाथ मे,आगे कि सोच,खोल दे मेरी जुबान यांसारखे चित्रपट दर्जेदार ठरले. त्यांनी पांडू हवालदार या त्यांच्या चित्रपटाचं त्यांनी हिंदी मध्ये रूपांतर करून गुजराती मध्ये नंदू जमादार हा चित्रपट प्रसिद्ध केला. दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांनी                                 अभिनेता,निर्माता,गायक,गीतकार,कथाकार,पटकथाकार,दिग्दर्शक,आणि संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून प्रवास केला.
                           अखेर १४ मार्च १९९८ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दादांची प्राणज्योत मावळली. प्रेक्षकांना हसवून सोडणाऱ्या मराठी चित्रपटांचं नावं  अजरामर करणाऱ्या आणि दोन दशक अधिपत्य गाजवलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्याला majja.ooo चा मनाचा मुजरा.





majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment