Monday, 30 January 2017

चाहत्यांकडून होतेय फुगे चित्रपटाची प्रसिद्धी..

   खूप दिवस प्रेक्षकवर्ग आतुरतेने ज्या चित्रपटाची वाट बघत होता तो धम्माल विनोदी चित्रपट "फुगे" १० फेब्रुवारीला परीक्षकांच्या भेटीस येणार आहे.पार्टी दे हे मज्जेदार गाणंही सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे.सुबोध आणि स्वप्नीलच्या चाहत्यांमध्ये ह्या चित्रपटाला घेऊन प्रचंड उत्साह असून त्यांनी त्यांच्या परीने फुगेचं प्रमोशन करायला सुरुवात केली आहे. मराठीचा रोमँटिक हिरो म्हणून आपण स्वप्नीलला ओळखतो त्याच्या काही महिला फॅन्स ने फुगे नावाची मेहेंदी आपल्या हातावर काढून प्रोमोशन केलं आहे. तर एकीने १० फेब्रुवारी 'फुगे' असे नाव कोरलेली संत्री बाजारात विकायला ठेवली आहेत. स्वप्नीलची फॅन असलेल्या एका शिक्षिकेने पार्टी दे ह्या गाण्यावर डान्स बसवून तो सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. याहून कमालीची बाब म्हणजे एका तरुणाने चक्क कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचा अभिषेक केला. याआधी कोणत्याही मराठी सिनेमाची इतकी प्रसिद्धी झालेली आठवत नाही.





            तगडी स्टार कास्ट जबरदस्त गाणी हटके कथानक हे सगळं आपल्याला फुगे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे शिवाय सुबोध आणि स्वप्नीलची एक वेगळीच भूमिका आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
          इंदर राज कपूर प्रस्तुत आणि  एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी निर्मित हा सिनेमा स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. फॅन्सच्या इतक्या प्रतिसादानंतर हा चित्रपट नक्की सुपरहिट होईल यात काही शंका नाही. मग पाहायला विसरू नका १० फेब्रुवारीला फुगे हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.




majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment