Saturday 21 January 2017

'लय वळवळतंय'... रांजण चित्रपटाचं अजून एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..

                  रांजण चित्रपटाचं 'लागीर झालं रं' ह्या गाण्याला प्रेक्षक वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला आहे ह्यात काही शंका नाही परंतु या चित्रपटातील इतर गाणी कशी असतील याची सर्वानाच उत्सुकता होती आणि ती उत्सुकता आता थोडी संपली आहे असं म्हणता येईल कारण या चित्रपटाचं एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'लय वळवळतंय'असं ह्या गाण्याचं नाव आहे. हे गाणं अवधूत गुप्ते ह्यांच्या रांगड्या आवाजात सजलं आहे.गावरान भाषेत संगीतबद्ध झालेलं हे गाणं अवधूत गुप्ते ह्यांच्या आवाजाने अजूनच खुलून आलंय. पहिल्या वहिल्या प्रेमात पडल्यावर काय काय होत हे ह्या गाण्यात अगदी मज्जेदार पण सांगितलं गेलं आहे. संगीत नरेंद्र भिडे यांचं असून गीतकार वैभव जोशी आहेत

                  'लागीर झालं रं' आणि 'लय वळवळतंय' हि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे असं बोललं तर वावघ ठरणार नाही. आता चित्रपटाची इतर गाणी कधी येतील यासाठी प्रेक्षक वर्ग उत्सुक आहे. इतर गाणीही इतकीच सुपरहिट ठरतील आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून रांजण हा २०१७ चा सुपर हिट चित्रपट ठरेल अशी आशा व्यक्त करायला काही हरकत नाही. 
                श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ‘रांजण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.




majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment