Tuesday 2 May 2017

विक्रम गोखले -सुहासिनी मुळ्ये प्रथमच मराठीत एकत्र

                      मराठी चित्रपटसृष्टीत आता विविध प्रयोग होताना दिसत आहे. नवीन विषय आणी साचेबद्ध मांडणीमुळे आज मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारत आहे. त्यामुळेच सधन निर्माते आणि प्रस्तुतकर्त्यांची रेलचेल मराठीत वाढताना दिसून येत आहे. येत्या २ जून रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'बेहेन होगी तेरी' आणि 'डाव' या मराठी-हिंदी द्विभाषिक चित्रपटांचे प्रस्तुतकर्ते 'ऑडबॉल मोशन पिक्चर' हे त्यातलेच एक उदाहरण. 'देव देव्हाऱ्यात नाही' ह्या आगामी मराठी सिनेमाचे देखील ते प्रस्तुतकर्ते असून, या चित्रपटाद्वारे ते प्रथमच एक नवीन विषय घेऊन मराठीत येत आहे. 


'देव देव्हाऱ्यात नाही' ह्या सिनेमाचे आणखीन एक वैशिट्य म्हणजे, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज व्यक्तिमत्व असणारे  विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये हे प्रसिद्ध कलाकार यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दोघांनी हिंदी तसेच मराठीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी हि जोडी पुन्हा एकदा या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहे. प्रवीण बिर्जे दिग्दर्शित हा सिनेमा एका सत्यघटनेवर प्रेरित असून, याची कथा, पटकथा तसेच संवाद आशिष देव यांनी लिहिली आहे. नितीन उपाध्याय यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये या दिग्गज जोडीबरोबरच यात अभिनेत्री रीना अगरवालदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अस्सल कौटुंबिक मेलोड्रामा असणा-या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या मे महिन्यापासून सुरुवात होत आहे. 'देव देव्हाऱ्यात नाही' या सिनेमाच्या शीर्षकावरून हा सिनेमा नेमका कोणत्या सत्यघटनेवर प्रेरित आहे, याचे कुतूहल प्रेक्षकांना नक्कीच असेल!  







majja.ooo : Ankita Lokhande.    

कुलकर्णी चौकातला देशपांडे..मराठी चित्रपट

              पिपाणी,टुरिंग टॉकीज,अनुमती,बायोस्कोप,नीलकंठ मास्तर,शासन ह्यांसारख्या दर्जेदार चित्रपटानंतर दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' हा चित्रपट २९ सप्टेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


अक्षय्य तृतीया च्या निम्मिताने ह्या चित्रपटाचा टिझर पोस्टर ची पहिली झलक आपल्याला पाहायला मिळाली. पोस्टर बघता कथानक नक्की काय असेल ह्याचा अंदाज बांधता येत नाही. पोस्टर बघून या चित्रपटाची उत्सुकता वाढते हे मात्र नक्की.

                    स्मिता फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत विनय गनू निर्मित आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' ह्या चित्रपटातील अजून बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत.


majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday 27 April 2017

विठ्ठला चे मधुर सूर !

चित्रपटातील गाणी हा सध्या एक महत्वाचा घटक बनला आहे. ज्या चित्रपटाची गाणी रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात तो चित्रपट नक्कीच एका वेगळ्या उंचीवर जातो. असाच एक दमदार मराठी चित्रपट 'विठ्ठला शप्पथ' आपल्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या नावावरून तुम्हाला कळलंच असलं चित्रपटाचे कथानक विठ्ठलाशी निगडित असेल परंतु या चित्रपटाचे नाव जितके हटके आहे तितकीच ह्या चित्रपटाची गाणीही कमाल आहेत.
               ह्या चित्रपटातील नुकतंच एका गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले.  'ठायी ठायी माझी विठाई' असे सुंदर बोल या गाण्याला लाभले आहेत. गीतकार मंगेश कांगणे ह्यांनी ह्या गाण्याचे बोल लिहिले आहेत. ह्या गाण्यात एकूणच विनवणी आहे आणि विठ्ठलाची स्तुती आहे. मराठी चित्रपटसृष्टीचे सुरांचे जादूगार म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे चिनार-महेश यांनी ह्या गाण्याला एका वेगळ्याच पद्धतीने संगीतबद्ध केले आहे. विठ्ठलावरील गाणी आपण बरीच ऐकतो परंतु अजून एक विठ्ठलावरच गाणं तयार करणं एक नवीन लोकांना आवडेल अशी चाल तयार करण्याचं सुंदर काम चिनार-महेश ह्या जोडीने केले आहे.

             

              चिनार-महेश ह्या जोडीने प्रत्येकवेळी रसिकप्रेक्षकांना आपल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध केले आहे. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन आणि पूर्वी पेक्षा काहीतरी वेगळं घेऊन येत असतात ह्यावेळी सुद्धा असच काहीतरी फ्रेश आणि नवीन ते आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहेत.आणि त्यांच्या ह्या कामात त्यांना एक सुरेल आवाज लाभला तो म्हणजे गायक राहुल देशपांडे ह्यांचा. राहुल देशपांडे ह्यांच्या आवाजाला आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या आवाजातून सादर होणार प्रत्येक गाणं म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असते. विठ्ठला शप्पथ ह्या चित्रपटात एकूणच ४ गाणी आहेत आणि हि चारही गाणी वेगळ्या धाटणीची असून चिनार-महेश यांनी ती संगीत बद्ध केली आहेत.जिथे एवढे सगळे दिग्गज कलाकार एका गाण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यामधून काहीतरी अलौकिक असा अनुभव प्रेक्षकांना येणार हे नक्की. त्यामुळे ह्यावर्षीचे सुपरहिट सॉन्ग घेऊन हि सर्व टीम सज्ज आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
         गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन प्रस्तुत चंद्रकांत पवार दिग्दर्शित 'विठ्ठला शप्पथ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.








majja.ooo : Ankita Lokhande.

'करार' चित्रपट २६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित

             
         सुट्ट्यांचा हंगाम सुरु झाला कीअनेक चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज असतात. मात्र इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)च्या समोरउन्हाळ्याच्या सुट्टीत सिनेमा प्रदर्शित करण्यास हिंदीचे निर्माते धजावतात. याच संधीचा फायदा एप्रिल-मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांना होतो. संपूर्ण कुटुंबासोबत सिनेमा पाहता येण्याजोगी हीच सुट्टी असल्याकारणामुळेअनेक महिने प्रदर्शनासाठी थांबलेल्या 'करारया सिनेमाला देखील याच महिन्याचा मुहूर्त लाभला आहे. मनोज कोटियन दिग्दर्शित हा सिनेमा २६ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे करारबद्ध झाले आहे.  

बिपीन शाह मोशन पिक्चर्स  गौतम मुनोत प्रॉडक्शन्स एल.एल.पी. प्रस्तुत, क्रेक इंटरटेंटमेंटस् प्रा. लि. कृत 'करारहा सिनेमा प्रेक्षकांना नवा दृष्टीकोन देणारा ठरणार आहे.  आपल्या अभिनयाबरोबरच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पाहोचवण्यास नेहमी तत्पर असलेला सुबोध भावे यात मध्यवर्ती भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात सुबोधसोबत उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर या अभिनेत्रीदेखील प्रमुख भूमिकेत आढळणार आहेत. 

या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत दिग्दर्शक मनोज कोटियन यांनी सांगितले कि, 'करारहा एक कौटुंबिक सिनेमा असूनया सिनेमाचा विषय लक्षात घेताकुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी हा सिनेमा पाहायला हवाअशी आमची इच्छा होती. मे महिन्याच्या सुट्टीत सगळे कुटुंब एकत्र येत असल्यामुळे, 'करारसिनेमा याच हंगामात प्रदर्शित करण्याचा आम्ही विचार केला'. तसेच हा सिनेमा पाहिल्यानंतर आजची वर्कहोलिक पिढी आपल्या बीजी शेड्युलमधून थोडावेळ आपल्या कुटुंबासाठी नक्की काढेलअशी आशा देखील ते व्यक्त करतात.    


समाजात विशिष्ट नाव आणि ओळख बनवण्यासाठी स्वतःच्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणाऱ्या एका करारबद्ध तरुणांची कथा यात मांडली आहे. आयुष्याला केवळ 'करारम्हणून पाहणाऱ्या या तरुणाच्या वैवाहिक आयुष्यातल्या उणीवाआणि त्यातून भविष्यात उद्भवणा-या समस्या यात मांडण्यात आल्या असून, या सिनेमातील गाणी देखील प्रेक्षकांना रोमांचित करणारी आहेत. या गाण्यांचे गुरु ठाकूर आणि मंगेश कांगणे यांनी लेखन केले आहे. संगीत दिग्दर्शक विजय गवंडे आणि परेश शाह यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्तेश्रेया घोषालबेला शेंडेसोनू कक्करजसराज जोशीनेहा राजपाल आणि वैशाली सामंत अशा सुरमयी गायकांचा आवाज लाभला आहे. 

संजय जगताप लिखित या सिनेमाचे संवाद आणि पटकथा हेमंत एदलाबादकर यांनी लिहिले आहेत. हा सिनेमा रसिकांना मंत्रमुघ्ध करणारा ठरेल यात शंका नाही. आजच्या धावत्या जगात बदलत चाललेली मातृत्वाबाद्दलची मानसिकता सांगणारा हा सिनेमा कुटुंबवत्सल प्रेक्षकांना आपलासा करण्यास लवकरच येत आहे. 

Sunday 23 April 2017

FU Movie Teaser Launch

              तो परत आलाय... असं म्हणत खरंच आकाश ठोसर पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या भेटीला आला आहे. F.U.या त्याच्या आगामी चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. आकाश चा दुसरा चित्रपट तोही महेश मांजरेकर दिग्दर्शित म्हणजे चित्रपट कसा असेल हे तुम्हाला विशेष सांगण्याची गरज नाही. टिझर लाँच ला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली तसेच चित्रपटाची स्टार कास्ट म्हणजेच आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, माधव देवचके, मयुरेश पेम, सत्या मांजरेकर, हि यंग स्टारकास्ट यांनी हजेरी लावली. विशेष उपस्थिती होती ती म्हणजे सलमान खानची मैत्रीण लुलिया हिची.

                महत्वाची गोष्ट म्हणजे बॉलीवूड अभिनेते बोमन इराणी आणि अभिनेत्री इशा कोपीकर ह्यांची झलक सुद्धा आपल्याला ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा टिझर तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला नक्की कळवा.
लिंक: https://www.youtube.com/watch?v=HX22O9kKW8w


काही छायाचित्रे :













majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday 20 April 2017

             डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. नुसता डॉक्टरांचा चेहरा जरी पाहिला तरी रुग्णाला ठीक झाल्यासारखे वाटायचे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे हेच नाते आता हळूहळू लोप पावत आहे.व्यावहारिकतेच्या या जगात रुग्ण तसेच रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. त्यामुळेच तर डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रकार आता चेव धरू लागले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांची बाजू मांडण्यासाठी विक्टरी व्हिजन बॅनरखाली अभिनेत्री प्रियांका यादव निर्मित आणि प्रमोद मोहिते सहनिर्मित 'चुकलं जरा डॉक्टर होऊन' हे गाणे लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे . रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रोषांचा सामना करणाऱ्या आजच्या डॉक्टरांचा आक्रोश मांडणा-या या गाण्याचे नुकतेच जुहू येथील आजीवासन स्टुडियोत सॉंग रेकोर्डींग करण्यात आले. प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित 'चुकलं जरा डॉक्टर होऊन' या गाण्याचे रोहन पटेल यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, सुरेश वाडकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि वैशाली सामंत या गोड गळ्यांच्या गायकाचा आवाज त्याला लाभला आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या मानसिकतेचा वेध घेणा-या या गाण्याचे बोल काही डॉक्टरांनीच लिहिले आहेत. डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. सुनंदा डावरे अशी त्यांची नावे असून अविनाश घोडके यांनी देखील हे गाणे शब्दबद्ध करण्यात त्यांना सहाय्य केले आहे.  





उपचारादरम्यान पेशंट दगावला अगर काही बरेवाईट झाल्यास, डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मनोवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे, त्यासाठी डॉक्टरांची बाजू देखील पडताळून घेणे गरजेची आहे. 'चुकलं जरा डॉक्टर होऊन' हे गाणे डॉक्टरांच्या याच सकरात्मक बाजूचे दर्शन प्रेक्षकांना करून देणार आहे.    




 

            TTMM म्हणजेच तुझं तू आणि माझं मी... हटके नाव हटके कथानक आणि अर्थात हटके असं टिझर पोस्टर घेऊन हि टीम पुन्हा आपल्या भेटीला आली आहे. पोस्टर बघता समुद्र आणि ह्या दोघांचा प्रवास अश्या गोष्टीचा अंदाज लावता येतो. आता ह्यात नक्की काय साम्य आहे हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.


एक नवीन फ्रेश जोडी आपल्याला ह्या चित्रपटात बघायला मिळणार आहे ती म्हणजे ललित प्रभाकर आणि नेहा महाजन. ह्या पोस्टर ने प्रत्येकाची उत्सुकता तर वाढवलीच आहे पण हि जोडीही सध्या खूप चर्चेत आहे. हि जोडी ऑनस्क्रीन आल्यावर प्रेक्षकांची किती मन जिंकेल हे लवकरच आपल्याला समजेल. Mirah Entertainment आणि Vaishali Entertainment प्रस्तुत कुलदीप जाधव दिग्दर्शित हा चित्रपट १६ जुने २०१७ ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.






majja.ooo : Ankita Lokhande.