Monday 23 January 2017

‘९ कोटी ५७ लाख’

              ‘९ कोटी ५७ लाख’ एवढे पैसे कशासाठी आणि कोणासाठी असा विचार तुमच्या मनात आलाच असेल तर हे नाव आहे एका मराठी नाटकाचं.

एकदमच हटके असलेलं हे नाव प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. सुप्रसिद्ध अभिनेते संजय मोने लिखित हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नाटकाचं पोस्टर बघता ह्या नाटकाचं कथानक पैशाच्या अवतीभवती फिरत आहे असं दिसून येतं. संजय मोने हे ह्या नाटकात अभिनय देखील करणार आहे. त्यांचा स्वभाव बघता हे धम्माल विनोदी नाटक असेल यात काही शंका नाही.

ह्या नाटकात संजय मोने,आनंद इंगळे,सुलेखा तळवलकर,मंगेश साळवी,विवेक मोरे,राहुल कुलकर्णी,रेणुका बोधनकर हि स्टारकास्ट या नाटकात बघायला मिळणार आहे. या दोन अंकी धम्माल विनोदी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी २८ दुपारी  ३;३० शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे.
 







majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment