Monday, 16 January 2017

पुष्कर श्रोत्री वळणार आता दिग्दर्शनाकडे....

                   मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बहुरूपी अभिनेता म्हणून ओळखला जाणारा कलाकार म्हणजे पुष्कर श्रोत्री. त्यांचा अभिनय आपण बऱ्याच चित्रपटांमधून बघत आलो आहोत. मराठीमध्ये तर त्यांनी अभिनयाचे कौशल्य दाखवलेच आहे त्यासोबत हिंदी मध्येही त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे.  त्यांच्या हजरजबाबी पणा आणि विनोदाच्या परफेक्ट टायमिंग साठी ते ओळखले जातात. आपल्याला ते अभिनेता म्हणून तर परिचित आहेतच परंतु आता त्यांनी दिग्दर्शनाचा विडा  उचलला आहे. त्यांचा पहिला दिग्दर्शित केलेला चित्रपट 'उबंटू' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


ह्या चित्रपटाचं नाव जरा हटके असून ह्याच कथानक नक्की काय असेल हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. चित्रपटाचा पोस्टर बघता लहानमुलांच्या शालेय आयुष्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल अशी आशा व्यक्त करता येते. ह्या चित्रपटाचं लेखन,दिग्दर्शन आणि निर्मिती पुष्कर श्रोत्री याने केली आहे.

 १४ जानेवारी ला हा चित्रपट सांगली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला प्रदर्शित करण्यात आला त्यानंतर १५ जानेवारीला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला प्रदर्शित करण्यात आला होता... ह्या चित्रपटाच्या अधिक माहितीसाठी आपल्याला अजून थोडी वाट बघावी लागेल.
majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment