Saturday 21 January 2017

प्रतिभावंत अभिनेत्री.... स्मिता पाटील

                  चित्रपट,दूरचित्रवाणी किव्हा नाटक या सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुणे येथे झाला. वडील शिवाजीराव पाटील मंत्री आणि आई विद्याताई पाटील समाजसेविका ह्या अश्या घराण्यात स्मिता पाटील यांचा जन्म झाला. त्यांच्या शालेय शिक्षणानंतर त्यांनी अभिनयासाठी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थान मध्ये प्रवेश घेतला. स्मिता पाटील यांचा पहिल्यांदा संबंध आला तो दूरदर्शन वाहिनी वरील वृत्तनिवेदिका म्हणून. स्मिता पाटील यांचा चेहरा खूपच फोटोजेनिक होता त्यामुळे त्यांच्यावर नजर पडली ती दूरदर्शन वाहिनीचे मुख्य श्री. कृष्ण मूर्ती यांची आणि स्मिता पाटील यांची  हिंदी वृत्तनिवेदिका म्हणून वर्णी लागली.नंतर दिग्दर्शक श्याम बेनेगर ह्यांनी स्मिता पाटील ला त्यांच्या चित्रपटात काम करायची संधी दिली आणि १९७० च्या दशकात स्मिता ह्यांच्या कारकिर्दीची उड्डाण घेतली. चरणदास चोर,निशांत ह्या सारख्या चित्रपटातुन त्यांनी छोट्यामोठ्या भूमिका केल्या नंतर त्यांना मुख्य नाटिका म्हणून  चित्रपटात काम करायची संधी मिळाली. मंथन या चित्रपटात साकारलेली तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि अखेर स्मिता पाटील ह्या स्पॉटलाईट मध्ये आल्या. भारतीय अभिनेत्री हौसा वाडकर ह्यांच्या कल्पित आत्मचरित्रावर आधारित भूमिकेने स्मिता पाटील ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आणि तो चित्रपट होता १९७७ चा भूमिका हा चित्रपट. स्मिता पाटील ह्यांनी त्यांच्या अभिनयाच्या या प्रवासात बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. सद्गती,चिदंबरम ह्या सारख्या चित्रपटातील भूमिकेने त्यांच्या अभिनयाला एक उंची मिळवून दिली.


प्रत्येक भूमिकेमध्ये त्या स्वतःला समर्पित करायच्या प्रत्येक भूमिकेमध्ये स्वतःला वाहून घेण्याची त्यांची क्षमता त्यांना नैसर्गिकच होती. त्यांनी मराठी नव्हे तर बंगाली आणि गुजराती ह्या भाषेच्या चित्रपटातून देखील काम केलं. त्यांची प्रत्येक भूमिका हि लक्षात ठेवण्यासारखी होती. जब्बार पटेल ह्यांच्या जैत रे जैत या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नायिका का पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं असून ह्या चित्रपटाची गाणीही खूप लोकप्रिय झाली. समाजाबद्दल काहीतरी करून दाखवायची जिद्द ती तळमळ असणारी भूमिका त्यांनी उंबरठा ह्या चित्रपटात खूब गाजवली. त्यांच्या अभिनयाची ताकद हेच त्यांच्या अभिनयाची ओळख बनली. अक्लेर संधानी ह्यांच्या बंगाली चित्रपटातील त्यांची भूमिका आणि अभिनय कमालीचा ठरला. केतन मेहता दिग्दर्शित भवानी भवाई ह्या गुजराती चित्रपटासाठी देखील त्यांची नेमणूक झाली. चक्र या भूमिकेच्या वेळेत भूमिकेला वाव देण्यासाठी स्मिता पाटील ह्यांनी मुंबईमधील सर्व झोपडपट्टी वस्तीना भेट दिली आणि तिथलं निरीक्षण आपल्या अभिनयातून व्यक्त केलं आणि परिणाम असा झाला कि पुन्हा एकदा राष्ट्रीय पदकावर त्यांनी आपली मोहोर उमटवली. १९८० च्या काळात प्रत्येक निर्माता दिग्दर्शन त्यांना आपल्या चित्रपटात घेऊ पाहत होता. अमिताभ सोबतच्या नामक हलाल मधील आज लपट जाये तो ह्या गाण्यामध्ये त्यांचा वेगळा अंदाज पाहायला भेटला. रमेश सिप्पी दिग्दर्शित ह्यांच्या शक्ती ह्या चित्रपटात त्यांनी अमिताभ सोबत काम केलं. राजेश खन्ना ह्यांच्या आखिर क्यू,अमृत,नजराणा हे चित्रपट देखील त्यांच्या वाटेला आले. अर्ध सत्य,आज कि आवाज,गुलामी ह्यांसारख्या चित्रपटात त्यांनी साहायक नायिका म्हणून भूमिका साकारली. मंडी आणि सुबह यांसारख्या वास्तववादी चित्रपटात देखील तिने काम केलं. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ उतार येत असतात आणि प्रेम कलाकार त्यांना सामोरे जातो असच काहीतरी झालं स्मिता पाटील ह्यांच्या आयुष्यात. त्यांनी विवाहित असलेल्या राज बब्बर ह्यांच्याशी लग्न केलं तरीही त्या केतन मेहता ह्यांच्या मिर्च मसाला ह्या चित्रपटात झळकल्या पण तो चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच स्मिता पाटील ह्यांना हे जग सोडावं लागलं. १३ डिसेंबर १९८६ ला अकाली मृत्यू झाला.त्यांची चित्रपटाची कारकीर्द हि कमी काळाची ठरली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकूण ८० चित्रपट केले. १९८५ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील नावाजण्यात आलं. चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या चैतन्यशाली व्यक्तिमत्वाला  majja.ooo कडून मानाचा मुजरा.





majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment