Saturday 14 January 2017

एक अष्टपैलू अभिनेता...सचिन पिळगावकर

                     सचिन पिळगावकर एक असा अभिनेता ज्याने मराठी चित्रपटसृष्टीचा मान त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आणखी उंचावला.  सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ ला मुंबई मध्येच झाला. आपल्या आयुष्यातील ५० वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीला अर्पण केली.  मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी दिवस आणणारा असा कलाकार आहे ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांना चांगले दिवस आणले. अवघ्या ४ वर्षापासून सचिन अभिनय करत आहे ४ वर्षाच्या वयात त्याने १९६२ साली हा माझा मार्ग एकला ह्या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केलं. ह्या चित्रपटातील अभिनयाने चित्रपटातील त्याच्या ह्या प्रवासाला उंची गाठून दिली. ह्या भूमिकेसाठी सचिनला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर १९६७ चा सचिनचा पहिला चित्रपट म्हणजे मंजली दीदी हा होता. ह्या चित्रपटामध्ये धर्मेंद्र आणि मीनाकुमारी ह्यांची प्रमुख भूमिका होती. ऋषिकेश जोशीने दिलेल्या संधीच सचिनने सोनं केलं आणि सचिनचं नशीब त्याच्या अभिनयासारखं उजळू लागलं. ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी ह्यांच्या सहवासात सचिन हिंदी आणि उर्दू शिकले. सचिन पिळगावकर यांनी जवळपास ६५ चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. देवानंद च्या ज्वेल थेफ,प्रेम पुजारी या चित्रपटात तसेच संजीव कपूरच्या चंदा और बिजली फिरोज खान यांच्या मेला आणि शम्मी कपूरच्या ब्रह्मचारी या चित्रपटात सचिन पिळगावकर झळकले.
                 श्री कृष्णा लीला या चित्रपटातील कृष्णाची त्यांची भूमिका  विशेष लक्षात राहते. राजश्री प्रोडक्शन च्या गीत गाता चल ह्या चित्रपटाने बॉलीवूड ला एक नवीन चेहरा दिला. प्रमुख नायक म्हणून सचिन सर्व चित्रपटात गाजत होता. मराठी आणि हिंदी भाषेवर त्याच प्रभुत्व तर होतच त्या सोबत त्यांनी भिजपुरी भाषेचा हि अभ्यास केला. तसेच सचिन ने सहाय्यक अभिनेता म्हणून देखील बऱ्याच चित्रपटात काम केलं. १९७५ च्या  शोले या गाजलेल्या चित्रपटासाठी सचिन ने अहमद ची छोटी तरीही महत्वपूर्ण भूमिका केली. अवतार,सूर सरगम,सत्ते पे सत्ता,जुदाई,राम तेरे कितने नाम असे अनेक चित्रपट सचिन ने केले.


                मराठी मध्ये सचिन ने अष्टविनायक हा चित्रपट केला. आणि तो बराच गाजला. मायबाप हा त्याचा मराठी मध्ये दिग्दर्शन केलेला पहिलाच चित्रपट होता. १९८४ साली आणखी एक सिनेमा आला तो म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला. ह्या चित्रपटामुळे सुप्रिया सचिन ची एक जोडी प्रेक्षकांना भेटली.आणि हि जोडी अवघ्या काही दिवसातच लोकप्रिय झाली. हि जोडी १९८५ मध्ये विवाहबंधनात अडकली. आणि ह्या जोडीने मराठी प्रेक्षकांना अनेक गाजलेले चित्रपट दिले. माझा पती करोडपती,नवरा माझा नवसाचा,आम्ही सातपुते असे अनेक चित्रपट करून सचिन पिळगावकर ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. १९८८ मध्ये आलेला अशी हि बनवाबनवी हा चित्रपट जबरदस्त गाजला. ह्या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला विनोदी तसेच कलाकारांनी परिपूर्ण असा एक सिनेमा दिला. सचिन पिळगावकर हे अभिनेता गायक पटकथाकार दिग्दर्शक निर्माता अश्या अनेक भूमिकांमधून नावारूपाला आले. त्यांनी त्यांच्या बऱ्याच चित्रपटांसाठी पार्शवगायन केले. तसेच छोट्या पडद्यावरील मालिकेसाठी देखील पार्शवगायन केले. तसेच दिग्दर्शक म्हणून त्यांची तू तू मैं मैं हि मालिका बरेच वर्ष गाजली. चलती का नाम अंताक्षरी या मालिकेचे त्यांनी सूत्रसंचालन केले. एका पेक्षा एक या डान्सिंग रिऍलिटी शो ची निर्मिती करून महागुरू नावारूपाला आले. आपल्या अभिनयाची ५० वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी ऑटोबाओग्राफी लिहिली. हाच माझा मार्ग.
                 आत्मविश्वासाच्या  जोरावर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवली त्या अष्टपैलू कलाकाराला majja.ooo तर्फे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.





majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment