Friday, 27 January 2017

"माणूस एक माती" चित्रपटाचा फर्स्ट लुक

  "माणूस एक माती" चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नेहमी कॉमेडी भूमिकांमधून सर्वाना हसवणारा सिद्धार्थ जाधव ह्या चित्रपटात मात्र वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं पोस्टर बघता कथानक नक्की काय असेल ह्याचा अंदाज बांधता येत नाही. सिद्धार्थ जाधव सोबत या चित्रपटात गणेश यादव,स्वप्नील रसेकर,विलास उजवणे,रुचिता जाधव,हर्षा गुप्ते हि स्टार मंडळी झळकणार आहे. "माणूस एक माती".... कारण अजून बरंच काही करायचं आहे. या वाक्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाला घेऊन उत्साह निर्माण झाला आहे.             शिवम सहेली परिवार प्रस्तुत शिवम एंटरटमेन्ट इंडिया लिमिटेड निर्मित "माणूस एक माती" या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सुरेश शंकर झाडे यांनी केलं आहे. हा जबरदस्त चित्रपट २४ मार्च पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

majja.ooo : Ankita lokhande.

No comments:

Post a Comment