Thursday, 5 January 2017

राजन चित्रपटात झळकणार दुर्गा पाटील हिचा चेहरा...

                  छोटा राजन याच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट 'राजन' हा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर राजनच्या भूमिकेत दिसणार आहे. संतोष सोबत एक नवीन चेहरा आपल्याला दिसणार आहे तो म्हणजे दुर्गा पाटील हिचा. अवघ्या १९ वर्षात एवढ्या मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी भेटणं हि दुर्गासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं ती म्हणते. चौदावीमध्ये शिकत असलेल्या दुर्गाला रग्बी खेळ खेळायची आवड आहे. भारतामध्ये रग्बीला पाहिजे तेवढं महत्त्व दिले जात नसून दुर्गा रग्बी नॅशनल प्लेअर आहे. तसेच तिने मार्शल आर्टस् मध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे.
                    रंगमंचाची भीती दुर्गा मध्ये कधीच नव्हती. लहानपणापासून दुर्गाला नृत्याची प्रचंड आवड आहे ती इंटरनॅशनल डान्स अकॅडमी मध्ये डान्स इंस्ट्रक्टर सुद्धा होती. राजन चित्रपटातील राणी या भूमिकेसाठी जेव्हा तिची निवड झाली तेव्हा २३० मुली होल्डवर होत्या या सर्वांमधून जेव्हा दुर्गाची ची निवड झाली ती फक्त तिच्यातील अभिनयाच्या आवडीमुळे आणि रंगमंचावरील प्रेमामुळे. जेव्हा दुर्गाची निवड झाली तेव्हा तिच्या देहबोली आणि भाषाशैली वर विशेष मेहनत घेण्यात आली चित्रपटातील राणी या भूमिकेसाठी दिग्दर्शक भरत सुनंदा यांना कठोर,प्रेमळ आणि नाजूक अशी मुलगी हवी होती खेळाडूवृत्ती असलेल्या दुर्गाला ह्या भूमिकेसाठी तयार करताना ६ महिन्यांचा कालावधी गेला. पहिल्यांदाच संतोष जुवेकर सोबत काम करण्याच्या अनुभव वेगळाच होता असं ती म्हणते. तिने खेळामध्ये खूप काही केलं असून आता तिला फक्त अभिनयाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. या सर्व प्रवासात तिचे बाबा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी तिला महत्वाची साथ दिली. 'या चित्रपटामुळे माझ्यात खूप बदल झालाय.माझी देहबोली बदलली आहे आणि हा बदल मला आवडतोय,मला अभिनयात अजून रस आलाय ' असं दुर्गा म्हणते.
                   ध्येय पूर्ण करण्याची  जिद्द माणसाला कधीतरी चुकीच्या मार्गावर घेऊन जाते आणि आयुष्यात कशा प्रकारचे बदल होतात असे काहीसे कथानक या चित्रपटाचे असणार आहे. चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील   असून सह-निर्माते दीप्ती श्रीपत आहेत.दिग्दर्शक भरत सुनंदा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिधम मुव्ही प्रेजेंटसोबत मुदिता फिल्म्स प्रस्तुत राजन हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.


majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment