Tuesday 28 February 2017

मिरची म्युजिक अवॉर्ड्स...



मिरची म्युजिक अवॉर्ड्स...
नुकतंच मिरची म्युजिक अवॉर्ड्स हा सोहळा पार पाडण्यात आला. संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांना त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी गौरवण्यात आलं. त्याची काही छायाचित्र...
Album of the year - Sairat
 Song of the year - Yad Lagla
 Male Vocalist - Yad Lagla
 Music Composer - Sairat Zhala ji
 Programmer and Arranger of the year - Sairat Zhala ji
 Listener's choice song of the year - Sairat Zhala ji


Lyricist of the year : Guru Thakur 
Natsamrat - Mituni Lochane


Gaurav Dagaonkar - one way ticket 


                                                 Rohan Rohan for the song #Baba from the                                                                                                                     movie Ventilator.

                                                               song of the year - Baba
                                                                    Priyanka chopra


                                       Sagar Dhote : upcoming music composer of the year at the 



                                                मिरची म्युजिक अवॉर्ड्स प्राप्त कलाकारांचे अभिनंदन..




majja.ooo : Ankita Lokhande. 





Monday 27 February 2017

300 गायक गाणार एक गाणे

                  मराठीमध्ये सध्या बायोपिक ला बरंच उधाण आलं आहे... विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर आधारित एक बायोपिक लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



 विशेष म्हणजे या चित्रपटात रिले सिंगिंग होणार आहे. भारतात प्रथमच रिले सिंगिंग होणार असून ३०० गायकांना विक्रम पार पाडण्यात येणार आहे. प्रसिद्ध गायिका साधना सरगम ह्यांच्या उपस्थितीत हा इव्हेंट पार पडला. सिनेमाच्या प्रमोशनचा एक भाग म्हणून नवा विक्रम भारताच्या नावावर होणार आहे. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे या चित्रपटात डॉ. तात्याराव लहाने यांची भूमिका साकारणार आहे. चक दे प्रोडक्शन निर्मित डॉ. तात्याराव लहाने चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विराग मधुमालती वानखेडे असून एक हिंदुस्थानी या संगीतकाराने हे गाणं कंपोज केलं आहे. ह्या सर्व नवीन प्रयोगांमुळे सर्वांचं लक्ष या सिनेमाकडे लागलं आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday 25 February 2017

पद्मश्री पुरस्कार प्राप्त कलावंत...डॉ श्रीराम लागु.

             आपल्या अभिनयाचा झेंडा उंच फडकविणारे एक अभिनय संपन्न कलावंत म्हणजे डॉ श्रीराम लागु. रंगभूमीवरचा एक असा नटसम्राट ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात अभिनयाचं विद्यापीठ सामावलं आहे. श्रीराम लागू हे रंगकर्मी नाहीतर रंगधर्मी आहेत. एक चिंतनशील अभिनेता म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर असले तरी ते हाडाचे कलावंत आहे. १९ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा मध्ये त्यांचा जन्म झाला. पण त्यांचे बालपण पुण्यातच गेले. पुण्याच्या भावे हायस्कूल मध्ये त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेतील गॅदरिंग मध्ये त्यांनी पहिल्यांदाच नाटकात सहभाग घेतला. तेव्हा त्यांना प्रचंड घाम फुटला त्यांनी कसाबसा तो प्रयोग पूर्ण केला. पण तेव्हा त्यांनी ठरवलं यापुढे नाटकाच्या आजूबाजूला देखील फिरकणार नाही. परंतु काही काळानुसार त्यांची नाटकातली आवड वाढली.

पाचवी सहावी पासून त्यांना नाटकांची,वाचनाची आणि सिनेमा पाहण्याचे वेड लागले होते. त्यावेळेस ते मराठी नाटक चोख पाठ करायचे. आणि हॉलिवूड कलाकारांच्या पद्धतीने ते सवांद बोलून पाहायचे,हा जणू त्यांना छंदच जडला होता. त्यानंतर त्यांनी फग्युर्सन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. आर्टस् स्कुल मधून चित्रकला शिकावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु वडलांच्या हट्टामुळे वैद्यकीय व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलं. १९४६ साली पुण्याच्या बी.जे मेडिकल कॉलेज मध्ये ते दाखल झाले. ५ वर्षाच्या शैक्षणिक प्रवासामध्ये त्यांनी ५ मोठी नाटक केली आणि अनेक एकांकिका केल्या. तेव्हाच त्यांनी लग्नाची बेडी हे नाटक केलं आणि ह्या नाटकातील डॉ. कांचन ची भूमिका त्यांना पारितोषिक मिळवून देणारी ठरली. शिक्षण घेत असताना त्यांना त्यांचं पाहिलं प्रेम लाभलं. आणि त्यांचं आयुष्य उजाळले ते डॉ. मालती रेगे ह्यांच्या रूपानं. हे विवाहबद्ध झाले तेव्हा ते M.B.B.S होते. त्यावेळेस त्यांनी अनेक नाटकात अभिनय केलाच पण आचार्य अत्रेच्या उद्याचा संसार या नाटकासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाले. दूरचे दिवे हे नाटक करत असताना तात्यासाहेब शिरवाडकर यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. आणि त्याच भेटीत ते प्रचंड भारावून गेले.
           जग्गनाथचा रथ ह्या नाटकातल्या त्यांच्या ७ वेगळ्या भूमिका आपण कधीच विसरू शकत नाही. व्यावसायिक रंगभूमीशी त्यांचं एक निराळंच नातं निर्माण झालं. वसंत कानेटकरांच्या वेड्याचं घर उन्हात या नाटकातला दादासाहेब रंगभूमीवर डॉ. लागूंच्या रूपात अवतरला. त्यांना पारितोषिक तर मिळालीच पण खूप प्रसिद्धी देखील मिळाली. या काळात त्यांच्या वाचनात आणि विचारणा चांगली शिस्त लाभली. मर्ढेकरांकाढून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. पाश्चिमात्य रंगभूमीवरचे नाटक त्यांनी अगदी जवळून पहिली. जून १९६२ मध्ये ते पुण्यात परतले आणि ताराचंद हॉस्पिटल मध्ये सर्जन म्हणून रुजू झाले. पण तेव्हा त्यांना रंगभूमी देखील पुन्हा एकदा खुणावू लागली. नंतर त्यांना रंगायन मध्ये काम करण्याची ऑफर मिळाली. मादी,मी जिंकलोमी हरलो,एक होती राणी,अशा अनेक नाटकांमधून त्यांनी अभिनय केला. तेव्हा त्यांनी विजय तेंडुलकरांची भेट झाली ह्या लेखकाचं एक वादळी नाटक आलं गिधाडे नावाचं. जे असभ्य भाषेवर आधारित होत. त्यामुळे हे नाटक करायला कोणीच तयार नव्हतं. पण अपवाद होता तो श्रीराम लागु यांचा.या नाटकाला बराच विरोध झाला. किमान ७ ते ८ वर्ष हे नाटक काही होईना. श्रीराम लागू यांनी या नाटकात अभिनय नव्हे तर दिग्दर्शन देखील केलं. तेव्हा त्यांना साथ लाभली ती अमोल पालेकरांची.
              वसंत कानेटकरांच्या इथे ओशाळला मृत्यू या नाटकात त्यांची संभाजीची भूमिका अद्भुत ठरली. पुढे तात्यासाहेब शिरवाडकर हे त्यांच्या आयुष्याला वळण देणारे व्यक्तिमत्व ठरले. त्यांनी श्रीराम लागू ह्यांना नजरे समोर ठेऊन नटसम्राट हे नाटक लिहिले. हे नाटक रंगभूमीवर साकारताना अप्पा साहेब बेलवलकरांच्या रूपात डॉ श्रीराम लागू रंगभूमीवर अशी काही कमाल करून गेले कि अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले. प्रत्येक भूमिकेचा बारीक अभ्यास करून मगच ते रंगभूमीवर उतरवणं हा त्यांचा स्वभाव होता. तनुजा सोबत केलेला लग्नाची बेडी,सुंदर मी होणार,आणि प्रेमाची गोष्ट या नाटकातील त्यांचा अभिनय आजही लक्षात राहतो. नाटकासोबत छोट्या आणि रुपेरी पडद्यावर त्यांनी आपला अभिनय सुरुच ठेवला.      
               पिंजरा,सामना,सिंहासन,मुक्ता,झाकोळ,खिचडी यांसारखे चित्रपट करणाऱ्या मराठमोळ्या कलाकाराने हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये देखील अनेक लक्षवेधी भूमिका केल्या. मराठी सिनेमा पेक्षा हिंदी चित्रपटातील त्यांचा वावर हा कायम लक्षात राहण्यासारखा आहे. घरोंदा ह्या हिंदी चित्रपटासाठी त्यांना फिल्म फेअर अवॉर्ड देखील मिळाले. एखादा कलावंत समाजाचं देखील देणं लागतो हि गोष्ट त्यांनी जाणली आणि सामाजिक  कार्यात त्यांनी सहभाग घेतला. हा कलावंत महाराष्ट्रात जन्माला आला हे महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीला majja.ooo तर्फे शुभेच्छा.  




majja.ooo : Ankita Lokhande.

Friday 24 February 2017

शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली मार्जरीनची भव्य 'त्रिमूर्ती'....

              जेवण बनवणे ही जशी कला आहेतसेच ते सजवणेआणि त्यावर काआर्व्हिंग करणे हा देखील शेफच्या प्रोफेशनमधील आगळावेगळा असा पैलू आहे. भारताचे प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांनी या कलेत खूपच प्रावीण्य मिळवले आहे. इतकेच नाहीतर त्याही पुढे जाऊन मार्जरीन शिल्पकार म्हणून ख्याती असलेले देवव्रत लवकरच एका अद्भुत कलेचा नमुना आपल्यासमोर घेऊन आले आहेत. सान्ताक्रुज येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरदेशीय (डॉमेस्टिक) विमानतळाच्या आवारात (अरायवलमध्ये) देवव्रत मार्जरीनची 'त्रिमूर्तीसाकारली आहे. 
भारतातील प्रसिद्ध लेण्यांची देणगी असलेल्या या 'त्रिमूर्तीचे मार्जरीन शिल्प ८ बाय ६.५ फुट उंचीचे बनवण्यात आले आहे. या भव्य शिल्पासाठी तब्बल १५१२ किलो मार्जरीन वापरण्यात आले. नुकत्याच २४ फेब्रुवारीला झालेल्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले असून, या भव्य शिल्पाचे कामकाज अवघ्या १० दिवसात पूर्ण करण्यात आले. १४ फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात आलेले हे कामकाज निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवसाचे १४ तास देवव्रत या काआर्व्हिंग कलाकारीसाठी सदर ठिकाणी व्यस्त असायचे. 


           याबद्दल आपले मत व्यक्त करताना देवव्रत यांनी सांगितले की, 'भारतीय संस्कृतीत 'त्रिमूर्ती'ला अढळ स्थान आहे. ब्रह्माविष्णू आणि महेश यांचे प्रतिक या त्रीमुर्तीत आहेजे निर्मितीसंगोपन आणि विनाश ह्या जीवनातील महत्वाचे तीन पैलू स्पष्ट करतातज्या कधीच बदलत नाहीकेवळ आपल्याच नव्हे तर जगातील इतर संस्कृतीला देखील ह्या पैलू लागू होतात. जगात येणाऱ्या प्रत्येकाला या घटकांमधून जावंच लागतं,  आपल्या भारतीय संस्कृतीचे हे मूळ असून याची महती जागतिक पातळीवर करून देण्याचा माझा मानस आहे. शिवाय  काआर्व्हिंगची कला मला अंतरराष्ट्रीयस्तरावरदेखील जोपासायची असल्यामुळेइतर कोणत्या शिल्पापेक्षा 'त्रिमूर्तीरेखाटून भारतीय संस्कृतीचे प्रतिक लोकांसमोर सादर करणे मला योग्य वाटले.ही मार्जरीनरुपी त्रीमुर्ती नागरिकांना विनामुल्य पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. 

             फळे आणि भाज्या  काआर्व्हिंगमध्ये देवव्रत यांनी कौशल्य विकसित करून ती आपली खासियत बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेततर मार्जरीन शिल्पकलेतदेखील सुवर्णपदक पटकावले आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१२ साली जर्मनीमध्ये झालेल्या कलनरी ऑलिम्पिकमध्ये  देवव्रत यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. महालासकट सिंड्रेलाची संपूर्ण कथा दर्शविणारी कलाकृती देवव्रत यांनी मार्जरीनमध्ये साकारली होती. महत्त्वाचे म्हणजे विविध देशातून मोठ्याप्रमाणात भाग घेण्या-या  स्पर्धकांच्या यादीत या स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणारे देवव्रत हे एकमेव शेफ होते.  देवव्रत दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमातून लोकांसमोर येत असूनत्यांनी  पुस्तक लिखाणवृत्तपत्रीय लेखन देखील केले आहे. त्यामुळे त्यांना काआर्व्हिंग मास्टर असे देखील संबोधले जाते. देवव्रत यांची मार्जरीन काआर्व्हिंगची हि अद्भुत कला मुंबईकरांना'याची देही याची डोळापाहायला मिळत असूनकेवळ स्थानिकांसाठी नव्हे तर देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठीदेखील हि एक मोठी पर्वणी ठरत आहे.




majja.ooo : Ankita Lokhande.

Wednesday 22 February 2017

‘रुबिक्स क्यूब’.. चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च साठी सलमान खानची हजेरी

           महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘रुबिक्स क्यूब’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचं नाव बघता आणि एकूणच चित्रपटाचा तामझाम बघता आणखी एक प्रयोग मराठी मध्ये  होणार आहे असं दिसून येतेय. नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लाँच हा सोहळा वरळी येथे पार पडला. या कार्यक्रमात मराठी तसेच हिंदी कलाकारांनी हजेरी लावली. तसेच या कार्यक्रमात हिंदी अभिनेता सलमान खान देखील हजर होता.

                 या सोबतच महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर ह्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. ह्या चित्रपटाच्या अधिक  माहिती साठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल.









Majja.ooo : Ankita Lokhande.

Sunday 19 February 2017

मराठीमध्ये एक नवीन रॅप सॉन्ग..

             मराठीमध्ये हटके प्रयोग करणे काही नवीन नाही. संगीत क्षेत्रातही बऱ्याच प्रमाणावर नवीन नवीन प्रयोग करण्यात आलेत आता ह्या रांगेत अजून गाणं उभं राहतंय ते म्हणजे मराठी रॅप सॉन्ग.मराठमोळा श्रेयस जाधव घेऊन येतोय एक संपूर्ण रॅप सॉन्ग. आणि हे रॅप सॉन्ग आधारित असणार आहे पुणेकरांच्या आयुष्यावर. 'आम्ही पुणेरी....' असे ह्या गाण्याचे बोल असणार आहे. ऑनलाईन बिनलाईन या चित्रपटात 'oh ho काय झालं...' या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता म्हणूनच आता एक संपूर्ण रॅप सॉन्ग घेऊन श्रेयस पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

पुणेरी बाणा आणि खास शैली असणाऱ्या पुणेकरांसाठी हा रॅप मोठी पर्वणी ठरणार आहे.संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईला हे गाणे ठेका धरण्यास भाग पाडेल, असा श्रेयसचा विश्वास आहे.  विशेष म्हणजे यात आपल्याला शनिवार वाड्याचे भव्य रूपही बघायला मिळणार आहे.

 या रॅप सॉन्ग चे बोल वैभव जोशी याचे असून याला संगीतबद्ध केलंय ह्रिषीकेश,सौरभ,आणि जसराज यांनी. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि गणराज प्रोडक्शन या बॅनरखाली हे रॅप सॉन्ग प्रसिद्ध होणार आहे. गाण्याची एक छोटी झलक पाहण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा : https://www.youtube.com/shared?ci=uNElO2zl05I





majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday 18 February 2017

एक प्रतिभावंत कलाकार.... महेश मांजरेकर

                      महेश वामन मांजरेकर हे नाव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक आदरणीय नाव. हे नाव ज्या सिनेमात असेल त्या सिनेमात काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे नक्की जाणवतं. ह्या कलाकाराने मराठी चित्रपटसृष्टीत एक निराळा बदल घडवून आणला. निर्माता, दिग्दर्शक,गायक,अभिनेता,लेखक ह्या सर्व भूमिकांमधून त्यांनी प्रवास केला. त्यांनी आपल्या कलेची जाण रसिकांना करून दिली. महेश मांजरेकर यांचा जन्म १९५८ साली एका मध्यमवर्ग कुटुंबात मुंबई मध्येच झाला. १९८४ साली त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्यांदाच त्यांनी अफलातून या नाटकामधून केलेला अभिनय रंगभूमीवर बराच गाजला. आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. नंतर त्यांनी निर्मिती क्षेत्रात वाटचाल करायला सुरुवात केली. गिधाडे,ऑल द बेस्ट,डॉक्टर तुम्हीसुद्धा या नाटकांची निर्मिती त्यांनी केली. निर्मिती सोबतच त्यांना दिग्दर्शनातही तितकाच रस होता.
                 १९९० च्या दशकात त्यांनी आई हा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. आणि त्यांचं नशीब इतकं बलवंतर कि ह्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीकडून हिंदी चित्रपट सृष्टीत झेप घेतली. निदान या सिनेमाचं दिग्दर्शन करत असताना या सिनेमामध्ये पाहुणे कलाकार म्हणीन ज्याने अभिनय केला त्या संजय दत्तला वास्तव या चित्रपटाची कथा ऐकवली. आणि कथा ऐकताच संजय दत्त या सिनेमासाठी तयार झाला. आणि १९९९ मध्ये वात्सव हा चित्रपट प्रदर्शितहि झाला. त्यांच्या ह्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर बरीच कमाई केली. आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर नावारूपाला आले. नंतर त्यांनी एका गंभीर विषयात हात घालून अस्तित्व हा चित्रपट तयार केला. आणि ह्या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर कधीच त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. एका मागोमाग एक हिंदी चित्रपट बनवत असताना काही यशस्वी तर काही असफल झाले. तरीसुद्धा ते खचले नाही. नंतर संजय गुप्ता च्या कांटे या सिनेमात अभिनय करायची संधी महेश मांजरेकरांना भेटली. नेगेटिव्ह शेड असलेली भूमिका त्यांनी विनोदी पद्धतीने साकारली. आणि अभिनेता म्हणून त्यांचं खूप कौतुक झालं. मराठी आणि हिंदी सोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही त्यांनी झेप घेतली. त्यांनी खलनायकाच्या अनेक भूमिका त्यांनी केल्या. असं म्हणतात सलमानच्या ज्या चित्रपटात महेश मांजरेकर असतील तर तो चित्रपट सुपरहिट होतोच. वॉन्टेड,दबंग,रेडी,बॉडीगार्ड,जय हो,असे बरेच सिनेमे त्यांनी सलमान सोबत केले. ह्याव्यतिरिक्त ओ माय गॉड,हिम्मतवाला,शूटआऊट ऍट वडाला,वन्स अपॉन या टाइम इन मुंबई अगेन,सिंघम रिटर्न्स,बाजीराव मस्तानी या सारख्या बिग बजेट चित्रपटातही त्यांनी अभिनय केला.

                    हिंदी मध्ये काम करत असताना त्यांनी कधी मराठी चित्रपट सृष्टीला दुय्यम स्थान दिले नाही. मराठीमधले कलाकार हिंदी मध्ये नावारूपाला यावे म्हणून त्यांनी   प्राण जाये पर शान ना जाये ह्या चित्रपटात बहुतांशी मराठी कलाकार घेतले. तसेच हिंदी मधल्या अस्तित्व ह्या चित्रपटाचा इंग्लिश रिमेक सुश्मिता सेन हिला घेऊन बनवला आणि त्या चित्रपटाचं नाव होत it was raining that night. ह्या सर्व भूमिकांसोबत त्यांनी संकलन क्षेत्रातही काम केलं. त्यासोबतच त्यांना गाणंही छान जमत.विशेष म्हणजे त्यांनी मराठी पुरस्कार सोहळ्याचं रूप पालटलं. आणि स्थापित केला मिफ्टा पुरस्कार सोहळा. १९९५ साली आई या चित्रपटाच्या वेळेस एका मुलीशी त्यांची भेट झाली. आणि ती नायिका म्हणजेच मेधा मांजरेकर. तसेच त्यांना दोन मुलं देखील आहेत अश्वमी आणि सत्या तसेच मेधा मांजरेकरांना घेऊन त्यांनी अनेक मराठी चित्रपट बनवले निदान,काकस्पर्श,नटसम्राट,दे धक्का अश्या अनेक चित्रपटतमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. आणि ह्या जोडप्याने बांध नायलॉन चे या चित्रपटात प्रथमच एकत्र काम केलं.
                      महेश मांजरेकर ह्यांनी खूप दर्जेदार चित्रपट बनवले अनेक कलाकारांना नावारूपाला आणलं. आणि मराठी चित्रपटसृष्टी श्रीमंत होतेय अशी प्रचिती सर्वाना झाली. मातीच्या चुली,शिक्षणाच्या आईचा घो,लालबाग परळ,मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशे वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले. नटसम्राट ह्या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत सर्वानीच पाहिली. ह्या चित्रपटाने घमघमीत यश तर मिळवलेच पण बॉक्स ऑफीस वर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. अभिनेता,दिग्दर्शक,निर्माता,गायक,संकलनकार अशा अनेक अनेक भूमिकांमधून प्रवास करणाऱ्या प्रतिभावंत कलाकार महेश मांजरेकर ह्यांना पुढच्या वाटचालीसाठी majja.ooo तर्फे हार्दिक शुभेच्छा.




majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday 16 February 2017

थुक्रटवाडीत कंगना राणावत ची हजेरी..

              चला हवा येऊ द्या हा एक असा मंच झाला आहे जो सर्वाना खळखळून हसवतो आणि त्याच सोबत नवीन येणाऱ्या चित्रपटाची आणि नाटकांची पुरेपूर माहिती देतो. आणि ह्या मंचाचे आकर्षण हे मराठी कलाकारांना तर आहेसच त्यासोबत हे आकर्षण बॉलिवूड मध्ये हि वाढत चालले आहे. आतापर्यंत बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी ह्या मंचावर आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी केली. आता बॉलिवूड क्वीन कंगना राणावत देखील ह्या मंचावर झळकणार आहे. तिच्या आगामी रंगून ह्या चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी तिने थुक्रटवाडीत हजेरी लावली. येत्या सोमवारी म्हणजेच २० फेब्रुवारीला रात्री ९;३० वाजता हा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या एका एका चित्रपटाची थुक्रटवाडीने केलेली आवृत्ती बघुन कंगना खळखळून हसली.


                हिंदी प्रेक्षकांसोबत मराठी प्रेक्षकही हिंदी चित्रपटाच्या यशासाठी तेवढाच महत्वाचा असतो हे यावरून लक्षात येते. रंगून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.विशाल भारद्वाज दिग्दर्शित ह्या चित्रपटात सैफ अली खान आणि शाहिद कपूर देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कंगना प्रथमच मराठी कार्यक्रमात हजर झाली.या भागातल्या गमतीजमती बघण्यासाठी चला हवा येऊ द्या बघायला विसरू नका.



majja.ooo : Ankita Lokhande.

केतकी माटेगावकरचा तिच्या जळगावच्या चाहत्यांवर संताप

             अभिनेत्री किव्हा अभिनेता म्हंटल कि आले त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे चाहते.आपल्या स्टार्सची एक झलक जरी दिसली कि त्यांना आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटतं. परंतु  कधीकधी चाहत्यांमुळे  कलाकारांना त्रास सहन करावा लागला तर..? हो बरोबर... असाच काहीसा प्रकार घडलाय तो अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिच्यासोबत. केतकी ला जळगाव येथील तिच्या चाहत्यांचा मनस्ताप सहन करावा लागला. त्यावर तिने तिची नाराजीही व्यक्त केली आहे. बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घनासाठी केतकीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते परंतु तिथे पोहोचताच तिथल्या स्थानिक रहिवाश्यांच्या तिच्या अवती भवती गर्दी केली आणि त्या गर्दीतून निघणे तिला कठीण झाले शेवटी तेथील महिलांनी केतकीला त्या गर्दीच्या बाहेर काढले. यावर केतकीच्या वडिलांनी पोलीस महासंचालकांना पात्र लिहून तक्रार केली आहे. आयोजकांवरही त्यांनी भरभरून टीका केली आहे. कार्यक्रमासाठी सुरक्षा रक्षक नेमलेच नव्हते असा दावा केतकीच्या वडिलांनी केला आहे. परंतु ह्यासाठी केतकीने आधीच खबरदारी घेतलीं असती तर तिला हा त्रास सहन करावा लागलाच नसता.



           चाहते जर आपल्या आवडत्या कलाकारांना भेटायला गर्दी करतात तर इथे आयोजकांची आणि चाहत्यांची काय चूक आहे हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो..
            https://www.youtube.com/watch?v=y4iworP0nHo अधिक माहितीसाठी लिंक वर क्लीक करा आणि आम्हाला कळवा चुकी कोणाची.


majja.ooo : Ankita Lokhande.

रांजण चित्रपटाचा रिव्ह्यू....वाचा येथे

            उत्सुकता वाढवणारं,मनाला वेड लावणारी गाणी,आणि कलाकारांचा जीव ओतून केलेला अभिनय हा सगळंच योग्य जुळून आलाय तो रंजन या चित्रपटात. सोशल मीडियावर रांजणची खूप चर्चा सुरु होती आणि आता हा चित्रपट १७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
               लहान वयातील हे प्रेम मिळवण्यासाठी प्रतापची चाललेली धडपड त्यातचं त्याला साथ देणारे त्याचे तीन मित्र त्याला मदत करण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढतात आणि तीच कल्पना पूर्ण करण्यासाठी केलेली मेहनत आणि समोर येणार अडथळे हे चार मित्र कसे सोडवतात आणि पुढे काय गम्मत होते हे आहे रांजण चित्रपटाचे कथानक. 
              चित्रपटाची गाणीही प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहेत. गाण्याचा वापर हि ह्या चित्रपटात उत्तम पद्धतीने केला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन हे अगदी उत्तम पद्धतीने झालं आहे.चित्रपटाचे सवांद देखील चांगल्याप्रकारे लिहिले गेले आहेत. चित्रपटात विद्याधर जोशी,भाऊ कदम,भारत गणेशपुरे यांनीही त्यांच्या भूमिका या मज्जेदार पद्धतीने उमटवल्या आहेत. परंतु ह्या तगड्या कलाकारांचा अजून थोडा उपयोग करून घेतला असता तर हा सिनेमा कदाचित वेगळ्या उंचीवर गेला असता. 

               रांजण या चित्रपटाची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ह्यामध्ये शिवाजी महाराजांचं अनिमेशन केलं आहे ते खरंच वाखाण्याजोगं आहे. चित्रपटात केलेला लहान मुलांचा अभिनय देखील मनात घर करून जातो.गौरी कुलकर्णी हिने देखील मधू ची भूमिका अत्यंत योग्य पद्धतीने सांभाळली आहे. 
                  महागणपती एंटरटमेन्ट प्रस्तुत रवींद्र कैलास हरपळे निर्मित प्रकाश जनार्धन पवार लिखित आणि दिग्दर्शित रांजण या चित्रपटाला majja.ooo तर्फे ३.५ स्टार्स.



majja.ooo : Ankita Lokhande.

Wednesday 15 February 2017

कनिका लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला..

               मराठीमध्ये जवळ जवळ सर्वच विषय चित्रपटाच्या माध्यमाने मांडण्यात आले. मग ती मैत्री असो प्रेम असो किव्हा इतर विषय असो..परंतु मराठीमध्ये हॉरर, थ्रिलर,सस्पेन्स असे चित्रपट फारच कमी बघायला मिळतात. असाच एक हॉरर चित्रपट कनिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे..सेव्हेन वंडर्स मोशन ची निर्मिती असलेला कनिका हा चित्रपट 31 मार्च ला प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे.
              पुष्कर मनोहर हे दिग्दर्शक म्हणून प्रथमच पदार्पण करत आहेत.अभिनेते शरद पोंक्षे, स्मिता शेवाळे, चैत्राली गुप्ते,कमलाकर सातपुते,आनंदा कारेकर,फाल्गुनी रजनी हि स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे.हा चित्रपट नक्कीच एक वेगळा विषय घेऊन येईल असा अंदाज बांधता येतो.संदीप मनोहर या चित्रपटाची निर्मिती  करणार आहेत.
             आता हि कनिका कोण असेल काय असेल हि थरारक गोष्ट... ३१ मार्च ला बघायला विसरू नका..




majja.ooo : Ankita Lokhande,

२०१७ मधील प्रथमेश परबचे हटके लुक बघा इथे...

             टाईमपास या चित्रपटातून नावारूपाला आलेला आणि प्रत्येक घराघरात पोहोचलेला आपल्या सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच प्रथमेश परब याला आपण सगळेच ओळखतो. त्याने साकारलेली दगडू ची भूमिका असो किव्हा बालक पालक मधली विशूची भूमिका असो प्रथमेश ने चित्रपटाचा हिरो असा हि असतो हे प्रत्येकालाचं दाखवून दिले. अंगाने बारीक दिसायला सामान्य मुलासारखा परंतु मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर आज हाच चेहरा अवघ्या महाराष्ट्राचा लाडका प्रथमेश परब ऍक्टिंग आयकॉन झाला.प्रथमेश प्रत्येक वेळेस त्याच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन घेऊन आलाय. मग तो एखादा चित्रपट असो किंव्हा एखाद गाणं प्रथमेश च्या चाहत्यांमध्ये नेहमीच त्याच्या प्रोजेक्टला घेऊन उत्सुकता असते. नुकतंच झी युवा वर 'प्रेम हे' त्याचे गाणं लाँच होऊन सध्या ते खूप गाजतंय !

                त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे नुकतंच प्रथमेशचं डिजिटल कॅलेंडर लॉन्च झालंय.साधा भोळा दिसणाऱ्या प्रथमेशचं ह्या फोटोशूट मध्ये एक वेगळंच रूप आपल्याला दिसणार आहे. ह्या नवीन फोटोशूट मध्ये प्रथमेश कोणत्या बॉलीवूड हिरो पेक्षा कमी दिसत नाहीये हे तितकंच खर. आणि ह्या फोटोची जादू केलीये फोटोग्राफर प्रदिप इंगळे यांनी. आणि ह्या  डिजिटल कॅलेंडर फोटोशूटचं दिग्दर्शन केलंय विवेक माणगावकर यांनी.
              हा इव्हेन्ट 'द ग्रिल हाऊस' ठाणे येथे पार पडला. ह्या इव्हेंटला कांचन पगारे,आशिष पाटील,सुकन्या काळन,आणि चिराग पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. तुम्हाला प्रथमेश चे हे हॉट फोटोशूट पाहण्यासाठी  www.pprathameshparab.com ह्या लिंक वर क्लिक करा. आणि हे डिजिटल कॅलेंडर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा.




majja.ooo : Ankita Lokhande.

Monday 13 February 2017

व्हॅलेंटाइन डे निमित्त....

             "प्रे" म्हणजे प्रेरणा तुझी "म" म्हणजे मन माझं.. सगळ्यांसाठी प्रेमाची परिभाषा वेगळी वेगळी असते.१४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन डे आपल्या आवडत्या व्यक्तीकडे आपल्या भावना आपलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस .

                 व्हॅलेंटाइन डे म्हणजे एक असा दिवस ज्या दिवसाची अनेकजण आतुरतेने वाट पाहात असतात. अर्थात या अनेकजणांमध्ये वयाची, जाती धर्माची, रंगवर्णाची अशी कोणतीही मर्यादा नसते हेच खरं. प्रेमाचा उत्साह, प्रेमाचा रंग आणि एका वेगळ्याच जगताची सुखद अनुभूती देणारा हा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. प्रत्येकाच्या जीवनात एकदातरी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात, वचनांची देवाणघेवाण होते आणि थोडेसे रुसवे फुगवेही असतातच. तुमच्या आमच्याप्रमाणेच कलाकारांच्या प्रेमाचेही असेच काहीसे किस्से आणि तारखांमध्ये गुंतलेल्या प्रेमाच्या आठवणी आहेत.
                 सेलिब्रिटींच्या याच काही सुरेख आणि अविस्मरणीय आठवणींचा ठेवा आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने यंदा सेलिब्रिटींच्या प्रेमाच्या गावी एक फेरफटका मारायलाच हवा… चला तर मग साजरा करुया उत्साह प्रेमाचा.





             अशाच काही  गोड जोड्यांचे फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.




majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday 11 February 2017

प्रतिभावंत अभिनेत्री....उषा नाडकर्णी

                 उषा नाडकर्णी म्हणजेच बिंदास्त,मोकळ्या मनाची,आणि स्पष्ट व्यक्ती अभिनेत्री. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतून कलाकारांची कधी आई तर कधी सासू बनून भूमिका बजावल्या. १३ सप्टेंबर १९४६ रोजी उषा ताईंचा जन्म कर्नाटक येथे झाला परंतु आई वडील मूळचे मुंबईचे असल्यामुळे त्याचं संपूर्ण शिक्षण मुंबई मध्येच झालं. त्यांची आई शिक्षिका असल्यामुळे उषा ताईंची भाषा स्वच्छ होती. ४० वर्ष चित्रपटसृष्टीत काम करून त्यांनी रसिकप्रेक्षकांची मन जिंकली. त्यांना अभिनयाची आवड लहानपणापासून होती. गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन त्यांना अभिनय करण्याची प्रेरणा मिळाली. अभिनयक्षेत्रात आपण काहीतरी योगदान द्यावं असं त्यांना वाटू लागलं. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हा त्या अभिनयापासून थोड्या दुरावल्या कारण त्यांना मुलांची भयंकर भीती वाटत होती पण उषा ताईंच्या बोलण्याचा परिणाम असा झाला कि नंतर मूळ त्यांना घाबरायची. हौशी रंगमंचापासून स्पर्धा मध्ये नंतर व्यावसायिक रंगभूमीवर त्यांच आगमन झालं. आणि त्यांचं पाहिलंच नाटक राज्य नाटक स्पर्धेत तुफान गाजलं. त्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. बिरला क्रीडामध्ये अनेक नाटकांच्या तालमी रंगायच्या त्यावेळेस अनेक कलावंतांकडून त्यांनी अभिनयाचे धडे शिकायला मिळाले.
                त्यांनी जेव्हा आपलं करियर याचं क्षेत्रात करायचे ठरवले तेव्हा त्यांच्या आईने ह्या गोष्टीला विरोध केला. हे क्षेत्र मुलींसाठी बरोबर नाही असा त्यांचा समज होता परंतु घाबरून न जाता उषा ताईंनी एका नाटकामुळे त्यांच्या आई वडिलांचा विश्वास संपादित केला. त्या नाटकाचे वर्षभरात बरेच प्रयोग झाले आणि त्या एका नाटकाच्या भूमिकेने त्यांना वर्षभरात ७ पारितोषिक मिळाली. नंतर त्यांची खऱ्या अर्थाने अभिनयाची वाटचाल सुरु झाली अनेक बड्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. रमेश पवार लिखित गुरु या नाटकातील भूमिका बरीच गाजली. १९७९ साली डॉ जब्बार पटेल दिग्दर्शित सिहांसन हा पहिला चित्रपट त्यांच्या वाटेला आला  यात शांताबाईंची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी साकारली. आणि त्यांच्या सोबत होते अभिनेते निळू फुले. पूर्ण सत्य,प्रतिभा,धुमाकूळ हे गाजलेले चित्रपट त्यांच्या वाटेल आले. पुरुष या नाटकातून त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी आली. नाना पाटेकरांसोबत छोटी पण महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली. याव्यतिरिक्त महासागर,आमच्या या घरात यांसारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी अभिनय केला.

                  १९९० च्या दशकातल्या माहेरची साडी हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातला एक म्हह्त्वपूर्ण चित्रपट ठरला. या सिनेमामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली.त्यानंतर त्यांना  आई आणि सासू ह्या भूमिकेसाठी बऱ्याच भूमिका मिळाल्या. त्यांच्या पहिला हिंदी चित्रपट होता गुंडाराज त्यानंतर अनेक हिंदी चित्रपट त्यांच्या वाटेल चालून आले. महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव या चित्रपटातील भूमिका उषा ताईंनी साकारली. कोणतीही भूमिका करताना जीव ओतून काम करायचं हे त्यांचं नेहमीच तत्व. त्यामुळे त्यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच लक्षात राहतात. नंतर त्यांनी छोट्या पडद्यावर देखील आगमन केलं. दूरदर्शनच्या ज्ञानदीप हि त्यांची पहिली मालिका नंतर आडोस पडोस ह्या हिंदी मालिकेमुळे त्यांनी हिंदीच्या छोट्या पडद्यावरही छाप पाडली. त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा चित्रपट म्हणजे 'नशीबवान'... त्या त्यांची मोलकरणीची भूमीका सर्वाना इतकी आवडली कि त्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्यशासनाचा विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ये तेरा घर ये मेरा घर,कृष्ण कॉटेज,वन टू थ्री यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून त्यांनी छोट्यामोट्या भूमिका साकारल्या.    
                          अगडबम,देऊळ,येलो,वक्रतुंड,महाकाय,पक पक पकाक या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही लक्षात राहतात. उतारवयात हि  त्यांना अनेक सिनेमांमध्ये संधी मिळाली. भूतनाथ रिटर्न,आर राजकुमार,ग्रेट ग्रँड मस्ती,रुस्तम या चित्रपटातही उषाताई झळकल्या. पवित्र रिश्ता हीं त्यांची मालिका बरीच चालली ह्या मालिकेमुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांनी अनेक मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका केल्या. खुलता कळी खुलेना हि त्यांची मालिका सध्या बरीच गाजतेय. ४० वर्ष आपल्या भूमिका जिवंत ठेवणाऱ्या या व्यक्तिमत्वाला त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी majja.ooo तर्फे शुभेच्छा.  






majja.ooo : Ankita Lokhande.

नागराज मंजुळे सोबत बिग बी अमिताभ बच्चन......

          सैराट हे नाव जरी ऐकलं तरी आठवतो नवीन कलाकारांचा जिवंत अभिनय सुंदर दिग्दर्शन आणि मनाला वेड लावून टाकणारी गाणी....आजही झिंगाट  गाणं लागलं की पाय आपोआप थिरकू लागतात..आणि याचं श्रेय जात सर्वांचे चाहते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना.. नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.मराठीच नव्हे तर हिंदी कलाकारांना हि ह्या चित्रपटाचा मोह आवरला नाही.स्वतः बिग बी ने देखील चित्रपट बघून नागराज मंजुळे यांना शुभेच्छा दिल्या.आणि आता असं ऐकायला येतंय कि बिग बि आणि नागराज मंजुळे हे आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे आणि हा चित्रपट वेगळा नसून सैराट चा हिंदी रिमेक आहे.

          काही दिवसांपूर्वी करण जोहर सैराट चा हिंदी रिमेक करतोय अशी बातमी आली होती आणि ह्या चित्रपटात रिंकू राजगुरूच्या जागी श्रीदेवी ची मुलगी जान्हवी कपूर आणि आकाश ठोसर च्या जागी शाहिद कपूरचा भाऊ ईशान हि जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे . ह्या चित्रपटात बिग बी कोणती भूमिका सकारतायत हे अजूनतरी समजलेलं नाही.आता कारण जोहर आणि नागराज मंजुळे  दिग्दर्शक एकत्र येऊन कोणता नवीन प्रयोग करतील याची उत्सुकता तुमच्या सारखी आम्हालाही आहे.




majja.ooo : Ankita Lokhande.

Friday 10 February 2017

दिल दोस्ती दोबाराचा न्यू लुक....

    रासीकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका दिल दोस्ती दुनियादारी च्या दुसऱ्या पर्वासाठी प्रत्येकजण उत्सुक होता.. आता दुसरं पर्व अखेर येतंय हे हि आपल्या लक्षात आलंच असेल परंतु ह्यावेळी हि मित्रमंडळी माजघरात नाहीतर चक्क एका हॉटेल मध्ये कल्ला करणार आहेत. आणि ह्या हॉटेल च नाव हि तसेच हटके आहे.'खयाली पुलाव'...नाव ऐकून तुम्हाला कळलंच असेल ह्यात काय धम्माल येणार आहे .
          एक फ्रेश गोष्ट एक हटके कथानक घेऊन हे सर्वजण पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात मनोरंजनाचा अर्धा तास घेऊन येत आहेत.जेव्हा दिल दोस्ती दोबारा फर्स्ट लुक आला होता तेव्हा आपल्याला कळलंच होत कि काय गोंधळ उडणार आहे जेव्हा हे सर्व अतरंगी कलाकार एकत्र एक हॉटेल चालवतील तेव्हा काय गोंधळ उडेल.. ह्यांची हि अशी मज्जा मस्ती एका वेगळ्या रूपात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे .
विशेष म्हणजे आपण ह्या सर्वाना सुजय ऍना मीनल कैवल्य आशु रेशमा ह्या नावानी ओळखतो परंतु ह्या नवीन पर्वात ह्या सर्वांच्या भूमिका आणि नाव सुद्धा बदलली आहेत.साहिल,गौरव,पप्या,मुक्ता,आनंदी,परी अशी ह्या भूमिकांची नावं असणार आहेत.

           रविवारी 19 तारखेला दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता हि मज्जेदार गोष्ट खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे.म्हणजे रवीवारपासूनच आपल्याला ह्या मालिकेची नव्याने ओळख होणार आहे.
            मालिकेचे निर्माते संतोष काणेकर यांचे असणार असून दिग्दर्शक अद्वैत दादरकरआणि स्वप्निल मुरकर सांभाळणार आहेत.कथा आणि संवाद सुदीप मोडक आणि अभिषेक खणकर करणार आहेत.




majja.ooo : Ankita Lokhande.

फुगे चित्रपटाचा रिव्ह्यू....

                  महाराष्ट्रभर ज्या सिनेमाची चर्चा होतेय असा हा फुगे चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला. दोन जिवलग मित्रांची हि गोष्ट आहे. ह्रिषीकेश आणि आदित्य. लहानपणापासून एकत्र वाढलेले धम्माल मज्जा मस्ती सर्व एकत्र केलेलं असे हे मित्र. जेव्हा एखादी मुलगी आयुष्यात येते आणि आपला मित्र दुरावला जाणार आणि म्हणून फिरायला म्हणून गोवा या ठिकाणी गेलेले हे मित्र खूप दारू पितात आणि त्या नशेमध्ये ह्यांच्या सोबत काय काय घडतं आणि त्या रात्री घडलेल्या एका घटनेमुळे त्यांचं आयुष्य कसं बदलतं. हे सर्व या फुगे चित्रपटाचं कथानक आहे. सुबोध आणि स्वप्नील हि जोडी ह्या कथानकासाठी साजेशी वाटत नाही. सुबोधला पाहिजे तेवढी ह्रिषीकेश कि भूमिका वटवता आली नाही.

        प्रार्थना बेहेरे आणि निथा शेट्टी ह्या दोन्ही अभिनेत्रीची कामं यथातथा वाटतात. चित्रपटात बऱ्यापैकी विनोदनिर्मिती होताना दिसते. मोहन जोशी ची भूमिका हि ह्या चित्रपटात पाहण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्याला विनोदनिर्मिती होताना दिसते. दिग्दर्शनाच्या बाबतीत हा चित्रपट थोडासा मागे पडलेला दिसून येतो.  चित्रपटाची गाणीही इतकीशी मनात उतरत नाही. एकच फाईट आणि वातावरण टाईट सगळेच बोलतात भैरप्पा लयं वाईट असा धडाकेबाज डायलॉग घेऊन जेव्हा निशिकांत कामत खलनायक या भूमिकेत चित्रपटात झळकतात तेव्हा हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर जातो. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात निशिकांत कामत यांनी साकारलेला हा खलनायक रसिकांसाठी सरप्राईज पॅकेज ठरणार आहे.  स्वप्नील सुबोधचे चाहते असाल तर तुम्ही हा चित्रपट बघू शकता. फुगे ह्या चित्रपटाला चित्रपटाला majja.ooo तर्फे 2 स्टार.




majja.ooo : Ankita Lokhande.

Wednesday 8 February 2017

मराठी कलाकार थेट हॉलिवूडमध्ये....

हिंदी कलाकार मराठी मध्ये काम करतात मराठी कलाकार हिंदी मध्ये काम करतात परंतु आता मराठी कलाकारांनी थेट हॉलिवूड ची मजल गाठली आहे . हॉलिवूड मध्ये हि आता मराठीचा झेंडा रोवला जाईल हे खरंच कौतुकास्पद आहे.

श्रुती मराठे,जयवंत वाडकर, आणि महेश मांजरेकर ह्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे हे कलाकार लवकरचं एका हॉलिवूड चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात काही भारतीय कलाकारांचा देखील सहभाग आहे .या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू असून शूटिंग दरम्यानची काही फोटोस श्रुतीने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या चित्रपटात अभिनेता दिलीप राव हा देखील झळकणार आहे .



मराठी कलाकारांनी अजून एक पाऊल उचलले आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ह्या सर्व कलाकारांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.



majja.ooo : Ankita Lokhanade.

Tuesday 7 February 2017

ये दोस्ती हम नहीं तोडेंगे.... स्वप्ना-स्वप्नील

             एखाद्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी हिट झाली कि प्रेक्षकांना त्यांना परत एकत्र बघायला खूप आवडते  अशीच एक मराठी चित्रपट सृष्टीतील हिट दिग्दर्शक  अभिनेत्याची जोडी म्हणजे दिग्दर्शिका स्वप्ना जोशी वाघमारे आणि  स्वप्नील जोशी.  मितवा या चित्रपटापासूनची त्यांची जोडी अगदी घट्ट आहे. हे दोघे अगदी सख्या भावाबहिणी प्रमाणे वावरताना दिसतात. हे दोघे एकत्र आले कि एका सुपरहिट चित्रपटाची निर्मिती होते. सेटवर धम्माल मस्ती करण्या सोबतच नवख्या कलाकारांना टार्गेट करण्याची एकही संधी सोडत नाही. 
          ह्यांच्या जोशीगिरीचा सामना करावा लागला तो प्रार्थना बेहेरे हिला. तसेच लाल इष्क च्या सेटवर अंजना सुखानी हिला देखील या दोघांनी असाच त्रास दिला होता. त्यामुळे फुगे या चित्रपटातून प्रथमच मराठी मध्ये प्रवेश करणारी निथा शेट्टी त्यांच्या तावडीतून वाचू शकली नाही.


          या दोघांनी तिला डीओपी प्रसाद भेंडेच्या पाया पडून त्याला १०१ रुपयाची दक्षिणा देण्याची मराठीत रीत असल्याचे सांगितले, नीताने देखील ते खरे मानत तसे केले देखील! कहर म्हणजे प्रसादने देखील स्वप्ना-स्वप्नीलच्या या कारस्थानात भाग घेत, तिला आशीर्वाद देऊन, दक्षिणा देखील घेतली. एवढेच नव्हे, तर  सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकरविषयीचे तिचे अज्ञान लक्षात आल्यावर, या दोघांनी तिला अगदी भांबावून सोडले होते. स्वप्नाने तर स्वप्नील बांदोडकरला समजलेय, आता तो तुझ्यावर रागावणार, असे काही बोलत तिला घाबरून सोडले होते.मात्र हा सारा मस्करीचा भाग असल्याचे तिला समजताच तिने देखील ते हसण्यावारी घेतले.
             या जोडीचा आणखी एक नवीन चित्रपट फुगे हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ऑफस्क्रिन असलेली धम्माल आता आपल्याला ऑनस्क्रिन आहे. आणि जोशीगिरीचा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल
            इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 



majja.ooo : Ankita Lokhande.

Monday 6 February 2017

नंदेश उमप ह्यांच्या आवाजात सजलं रांजण चित्रपटातील गाणं

         सध्या ज्या चित्रपटाची गाणी सर्वांच्याच तोंडावर आहेत असा रांजण चित्रपटातील अजून एक धडाकेबाज गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. बऱ्याच दिवसापासून आपण  चित्रपट सामाजिक संदेश देणारा असणार आहे यात मैत्री दाखवली आहे प्रेम आहे परंतु लख लख ह्या गाण्यामध्ये शिवाजी महाराज देखील आपल्याला दिसतात. शिवाजी महाराज या चित्रपटात कोणती भूमिका बजावतात ह्याची उत्सुकता तुमच्या प्रमाणे आम्हाला हि आहे आणि विशेष म्हणजे या टीम ने एक वेगळा प्रयोग केला आहे.चित्रपटात शिवाजी महाराजांचं जे ग्राफिक्स बनवले आहेत ज्या प्रकारे ऍनिमेशन झालं आहे ते खरंच सुरेख आहे. महाराजांच्या गाण्यामुळे हा चित्रपट एक वेगळ्या उंचीवर गेला आहे.लख लख हे गाणं नंदेश उमप ह्यांच्या आवाजात सजलं आहे

           येत्या १७ फेब्रुवारी २०१७ ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ‘रांजण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.


majja.ooo : Ankita Lokhande.

गौरीचं चित्रपट सृष्टीतील पदार्पण...

       मराठी चित्रपटसृष्टीत कोणीही गॉडफादर नसताना केवळ आपल्या टॅलेंटच्या जोरावर जिने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली ती अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे. मालिका ते चित्रपट ह्या प्रवासात गौरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
        भारतीय विद्यापीठ मुंबई मधून गौरीने तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. अभिनय आणि नृत्याची आवड गौरीला लहानपणापासून होती.  शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन तिने तिचा अभिनयाचा पाया मजबूत केला. बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊन आणि फक्त अभिनयाच्या जोरावर तिने या अभिनय क्षेत्रातील तिच्या वाटचालीला सुरुवात केली.
          अवघाचि संसार या मालिकेमधून गौरी नावारूपाला आली. त्या नंतर स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेत वैदेही ची भूमिका साकारून गौरी घराघरांत पोहोचली. या दोन मालिकेनंतर प्रेक्षकांनी गौरीला भरभरून प्रेम दिले आणि मग गौरीने कधी मागे वळून पहिले नाही.



            छोट्या पडद्यावरून गौरीने थेट रुपेरीपडद्यावर तिच्या अभिनयाची झलक दाखवली. स्वप्नील जोशी आणि सचित पाटील सोबत फ्रेंड्स हा पहिला मोठा मराठी चित्रपट गौरीच्या वाटेला आला. त्यानंतर कान्हा आणि फॅमिली कट्टा या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका करून गौरीने तिचे पाय या क्षेत्रात घट्ट रोवले.आता सध्या गौरी Absolute नावाचं एक करतेय. या नाटकाचे लेखक युगंधर देशपांडे असून दिग्दर्शक मंदार देशपांडे आहेत. गौरीने पहिल्यांदाच रंगभूमीवर प्रवेश केला आहे. यापुढेही नाटक करण्याची संधी आली तर मी आवडीने करेन असं ती म्हणते.
             आपल्या अभिनयासाठी ती माधुरी दीक्षित ला फॉलो करते. मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर ह्या तिच्या आवडत्या अभिनेत्री आहेत.एक महत्वाची गोष्ट म्हणजे गौरी रोज योगा करते. स्वतःला मेंटेन ठेवणं तिला आवडतं. विशेष म्हणजे ती तिच्या कामात इतकी परफेक्ट आहे कि ऍक्टिंग करताना गौरी रिटेक करत नाही.. आणि तिची हीच सवय सर्वाना खूप आवडते.. अश्याच विनम्र आणि मेहनती गौरी नलावडे ला तिच्या पुढच्या वाटचाली साठी majja.ooo तर्फे शुभेच्छा.





majja.ooo : Ankita Lokhande.

Sunday 5 February 2017

नवीन प्रयोगांनी परिपूर्ण असा प्रेमाय नमः चित्रपट....

       हल्ली चित्रपट प्रदर्शनासाठी बरेच नवीन नवीन प्रयोग केले जातात.हटके कथानक सिनेमाची हटके नाव या सर्व बाबतीत आपल्याला नाविन्य बघायला मिळत.असाच एक नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे चित्रपटाचं नाव आहे प्रेमाय नमः.. प्रेमाची एक नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट असणार आहे. एका अनोख्या प्रेम कथेवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटात देवेंद्र आणि रुपाली हे नवीन फ्रेश चेहरे दिसणार आहे. ह्या चित्रपटाचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ट्रेलर बघता चित्रपटातील लोकेशन आणि ऍक्शन यावर बरीच मेहनत घेतली असल्याचे दिसून येते. ह्या संपूर्ण टीमने चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी बरेच नवीन आणि हटके प्रयोग केले आहेत.

   मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच एका संपूर्ण गाण्याची शूटिंग पाण्याखाली करण्यात आली असून ह्या चित्रपटाचे प्रमोशन मालवणी किनापट्टीवर समुद्रात स्कुबा डायविंगच्या माध्यमातून करण्यात आले. आणि महत्वाची बाब म्हणजे ह्या टीम अजून एक प्रयोग करून दाखवला आहे तो म्हणजे  हया टिमने मराठीत पहिल्यांदाच Google Play Android Game आणला आहे.आता हा गेम कसा असेल याची उत्सुकता तुमच्यासारखी आम्हालाही आहे.चित्रपटाचं इतकं हटके आणि जबरदस्त प्रमोशन अजूनतरी कोणी केलं नाही. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक जगदीश वाठारकर असून संगीतकार के.संदीप आणि चंद्रशेखर जनवाडे आहेत. तसेच धनाजी यमकर हे कॅमेरा मॅन आहेत. प्रेमाय नमः हा चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीला येणार आहे.तेव्हा हा चित्रपट पाहायला जरूर जा आणि चित्रपटात अजून काय काय प्रयोग केले आहेत त्याचा अनुभव घ्या.




majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday 4 February 2017

ज्येष्ठ अभिनेते....सदाशिव अमरापूरकर

                 चित्रपटात खलनायकाची चोख भूमिका निभावणारे सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे  अमरापूरकर. ११ मे १९५० रोजी अहमदनगरच्या व्यवसाय करणाऱ्या ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. लहान पानापासून सदाशिव अमरापूरकर यांना तात्या या नावाने संबोधलं जायचं. शाळा कॉलेज पासूनच तात्यांना अभिनयाची आवड होती. पुणे युनिव्हर्सिटी मध्ये इतिहास या विषयात पदवी असताना रंगभूमीवरचं त्यांचं आकर्षण अनेकांनी पाहिलं. नगर कॉलेजमध्ये असताना  एकांकिका केल्या. पेटलेली अमावस्या या एकांकिकेमधला त्यांचा अभिनय  वाखाणण्याजोगा होता. याच काळात काका किशाचा, भटाला दिली ओसरी या नाटकांमधून रंगभूमीवर त्यांनी त्यांच्या अभिनयाचं दर्शन दिलं. त्यानंतर त्यांनी अल्टिमेट थिएटर आणि नाट्यपराग या संस्थेची स्थापना अहमदनगर  येथे केली.
     उपजत गुणवत्ता लाभलेला कलाकार रंगभूमीशी प्रामाणिक राहिला. १९८२-१९८२ याकाळात हँडसॅप नाटकात कमाल केली अविनाश मसुरकर आणि भक्ती बर्वे इनामदार यांच्या सोबत त्यांनी त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी केली. सुप्रसिद्ध कलाकार गोविंद निलानी हे सदाशिव अमरापूरकर यांच्या अभिनयाने इतके  प्रभावित झाले कि त्यांनी १९८३ साली अर्धसत्य साठी खलनायक म्हणून सदाशिव अमरापूरकर यांची निवड केली आणि फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. त्यानंतर   पुराना मंदिर,फरिश्ते,मोहरे,हुकूमत यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. खलनायक म्हणून त्यांची संवादफेक निराळी आणि लक्षवेधी होती. १९९१ मध्ये महेश भट्ट यांनी त्यांना महाराणी हि आव्हानात्मक भूमिका दिली आणि त्यांनी या भूमिकेला उत्तम न्याय दिला. याचवर्षापासून फिल्मफेअर हा पुरस्कार त्यांना बहाल  करण्यात आला. १९९० साली हि सहाय्यक कलाकाराच्या भूमिकाही सदाशिव अमरापूरकर यांनी साकारल्या. त्यांच्या  भूमिकाही लोकांच्या फारच पसंतीस पडल्या.
  आँखे,इष्क,कुली नं.१,गुप्त,आंटी नं.१,हम हे कमाल के,खुलामखुल्ला प्यार करेंगे या चित्रपटात विनोदी भूमिका केल्या. २००० नंतर हिंदी सिनेमांमध्ये क्वचित झळकू लागले. २०१३ मध्ये ४ शॉर्टसफिल्म्स असलेल्या bombay talkies या सिनेमामध्ये अभिनय केला. त्याचसोबत त्यांची मराठी सिनेसृष्टीची कारकीर्द वाखाणण्याजोगी होती. आमरस हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. २२ जुने १९९७,दोघी,खतरनाक या चित्रपटात विविध भूमिका साकारताना दिसले. तहान,वास्तुपुरुष,सावरखेड एक गाव या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विविध प्रकारच्या होत्या. जिंदगी आणि भारत एक खोज या टी.व्ही मालिका मधून देखील त्यांनी अभिनय केला. १९७३ साली माध्यमिक शिक्षण घेताना जिच्यावर प्रेम जडलं सुनंदा करमरकर हिच्याशी विवाह केला. अमरापूरकरांची मुलगी हिंदी मराठी मध्ये दिग्दर्शिका म्हणून कार्यरत आहे. सदाशिव अमरापूरकर यांनी हिंदी,मराठी,बंगाली,ओरिया,हरियाणवी अश्या विविवध भाषांमध्ये एकूण ३०० हुन अधिक चित्रपट केले.


अभिनय क्षमता दर्शवणारा हा कलाकार सामाजिक जाणीव जपणारा होता. अंधश्रद्धा निर्मूलन समिती,स्नेहालय या संस्था मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. वयाच्या ६४ वर्षी ३ नोव्हेंबर २०१४ मध्ये पहाटे पाऊणे तीनच्या सुमारास या कलाकाराने शेवटचा श्वास घेतला. या चतुरस्थ आणि हुरहुन्नरी अभिनेत्याला majja.ooo चा सलाम.      





majja.ooo : Ankita Lokhande.

Friday 3 February 2017

निलेश साबळेंच्या जागेवर आता प्रियदर्शन जाधव...

         कसे आहात मंडळी हसताय ना ? हा आवाज कानावर पडला कि नकळत चेहऱ्यावर हसू उमटतं. हाच प्रश्न विचारणारा महाराष्ट्राचा लाडका निलेश साबळे आता काही दिवसांपुरती आपल्याला चला हवा येऊ द्या मध्ये दिसणार नाही. गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणाऱ्या आणि हि टीम एकत्र बांधून ठेवण्याचं काम निलेशने अगदी चोख पार पाडलं आहे. दिग्दर्शन,अभिनय आणि लेखन ह्या सर्व बाबतीत अग्रेसर असलेल्या निलेशने महाराष्ट्राला मनोरंजनाचा एक मज्जेदार कार्यक्रम दिला. सोमवार मंगळवार ९;३० ते १०;३० या मंडळींनी आपल्याला खूप हसवलं,पोस्टमन काकांच्या पत्रांनी रडवलं कधी समाजाची जाणीव करून दिली असा परिपूर्ण असलेला कार्यक्रमाची धुरा निलेश साबळे याने सांभाळली आहे.
         मराठीच नाहीतर बॉलीवूड चे कलाकार हि चला हवा येऊ द्या मध्ये आवर्जून येतात.झी वाहिनीचा चेहरा बनलेला डॉ निलेश साबळे प्रकृती अस्वस्थ्यामुळे काही आठवडे विश्रांती घेणार आहे. पण तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही निलेश साबळे नाही तोपर्यंत आपल्या सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच प्रियदर्शन जाधव सूत्रसंचालनाची सूत्रे सांभाळणार आहे.

           हे सर्व करत असताना मागच्या काही दिवसांपासून निलेशला प्रकृती अस्वस्थ्याचा त्रास जाणवत होता. यामुळेच निलेशने वैद्यकीय सल्यानुसार काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही विश्रांती थोड्याच दिवसांची असून लवकरच तो या कार्यक्रमात पुन्हा हजेरी लावेल.




majja.ooo : Ankita Lokhande.

बघतोस काय मुजरा कर...

        महाराष्ट्राचं वैभव म्हणून ज्यांचा सर्वप्रथम उल्लेख होतो ते म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले. महाराष्ट्रातील किल्ले जपण्यासाठी बरेच जण भाषणं ठोकतात आपल्या आपल्या परीने मिरवणुका काढतात परंतु होत मात्र काहीच नाही. ह्या किल्ल्यावर आजही दारू पिऊन नाचणे,कचरा करणे आणि गडाच्या भितींवर लिहिणाऱ्यांची संख्या कमी नाही. हाच नाजूक विषय अगदी सोप्प्या शब्दात आणि योग्य पद्धतीने मांडून दाखवला आहे बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाने.
          चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं या चित्रपटाचं कथानक आहे. प्रथमच हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.जितेंद्र जोशी,अक्षय टंकसाळे आणि अनिकेत विश्वासराव यांनी आपल्या भूमिका खूप सुरेख उभ्या केल्या आहेत. अनिकेत विश्वासराव याने आवाज बदलून त्याच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. नेहा जोशी,रसिका सुनील आणि पर्ण पेठे यांची भूमिका हि चित्रपटानंतर लक्षात राहते. त्यासोबतच आनंद जोग आणि विक्रम गोखले यांची भूमिका देखील लक्षात राहण्यासारखी आहे. श्रेयस तळपदे आणि सोनाली कुलकर्णी यांची एन्ट्री देखील चित्रपटाला एक वेगळं वळण देते.सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटात बऱ्यापैकी विनोद निर्मिती होताना देखील दिसते.

         चित्रपटाची गाणी तितकीशी मनात उतरत नाही. काही गाण्याची गरज नसताना देखील ती चित्रपटात दाखवली गेली आहे. 'घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास तुझ्या गडांची ही व्यथा आता राजा, कळू दे साऱ्या जगास ' हे शब्द अगदी अंगावर काटा आणून सोडतात. हे गड आणि किल्ले यांचे खूप सुंदर चित्रीकरण ह्या चित्रपटात केले आहे. सामाजिक माणसांना भेडसावणारे प्रश्न त्यांच्याकडून नकळत होणाऱ्या चुका ह्या सर्वांचं उत्तर म्हणजे बघतोस काय मुजरा कर हा चित्रपट. तुम्हाला वेळ असेल तेव्हा हा चित्रपट एकदा जरूर पहा आणि स्वतःच्या फायद्यासाठी शिवाजी महाराजांचे नाव कोणाला वापरू देऊ नका. बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाला majja.ooo कढून ३ स्टार्स.



majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday 2 February 2017

दोन विनोदवीरांसोबत झळकणार एक खलनायक...

                 रांजण या चित्रपटाची सगळीकडे प्रसिद्धी होताना आपण बघतंच आहोत. चित्रपटाची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. लगीर झाल रं आणि लय वळवळतंय या गाण्यांना प्रचंड मिळत आहे . तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची सर्वानाच उत्सुकता आहे. या चित्रपटात तीन ओळखीचे चेहरे पाहायला मिळतात ते म्हणजे विद्याधर जोशी,भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे.दोन विनोदवीरांसोबत एक खलनायक रांजण या चित्रपटात झळकणार आहे.विद्याधर जोशी ह्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.भाऊ कदम,भारत गणेशपुरे हे कलाकार नेहमीप्रमाणे प्रेक्षकांना हसवण्याची धुरा सांभाळणार असे दिसून येतंय.

                  सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा हा चित्रपट विनोदी पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा करणार आहे. चित्रपटाचं कथानक कुतुहूल वाढवणारं आहे.चित्रपटाचं दिग्दर्शन हे अतिशय उत्तम पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ‘रांजण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.




majja.ooo : Ankita Lokhande.

रिचा अग्निहोत्री सध्या काय करते...?

                आपल्या नृत्याच्या जोरावर घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे नृत्यांगना रिचा अग्निहोत्री. अवघ्या १९ व्या वयात रिचाने तिच्या मेहनतीने बरंच यश संपादन केलं आहे.    
                 नृत्याचं प्रचंड वेड असलेल्या रिचाने वयाच्या पाचव्या वर्षा पासून कथ्थक शिकायला सुरुवात केली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर ती कथ्थक विशारद झाली आहे. तिची आई वैष्णवी अग्निहोत्री ह्या तिच्या पहिल्या गुरु आहेत असं ती म्हणते. त्यानंतर तिची पुढची वाटचाल गुरु सौ. मंजिरी श्रीराम देव यांच्या मार्गदर्शनाने झाली. कथ्थक सोबतच लावणी,हिप-हॉप,बेली सालसा,बॉलीवूड आणि अश्या बऱ्याच प्रकारचे डान्स रिचा अगदी सहज करते.
                २०१४च्या महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं तिने पारितोषिक मिळवले. 'फेस ऑफ कलर्स मराठी' हा किताब देखील तिने तिच्या नावावर केला आहे. 'ढोलकीच्या तालावर' या गाजलेल्या डान्स शो मध्ये रिचाने टॉप ५ स्पर्धकांमध्ये जागा पटकावली. इतकच नाहीतर अमिताभ बच्चन ह्यांना  ट्रिब्युट म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमात रिचाने आपल्या नृत्याने सर्वांची मनं जिंकली.


           एवढ्यावरच रिचा थांबली नाही तिने दाक्षिणात्य डान्स शो किक मध्येही मराठीचा झेंडा रोवला आहे. तिथेही ती टॉप ५ स्पर्धकांमध्ये होती. रुचिता राम आणि शिवराज कुमार हे मान्यवर ह्या शो चे परीक्षक होते. नृत्यासोबत रिचाला अभिनयाची देखील आवड आहे. तिने अभिनेत्री म्हणून काम केलेली डॉक्युमेंट्री दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी पाठवण्यात आली होती. लवकरच रिचा आपल्याला नवीन चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. भविष्यात तिला अभिनय करायला आवडेल असं ती म्हणाली. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या रिचाला majja.ooo तर्फे पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.






majja.ooo :Ankita Lokhande.