Thursday, 12 January 2017

मराठी चित्रपट हिरो मधील नवीन हिंदी मराठी फ्युजन सॉन्ग..

               मराठी मध्ये अश्या मोजक्याच अभिनेत्री आहेत ज्या अभिनयासोबत उत्तम डान्स करतात त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे दीपाली सैयद. हिरो हा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ह्या चित्रपटातील एका हिंदी मराठी फ्युजन सॉन्ग साठी दिपाली सैयद आणि शास्त्रीय नृत्यांगना सुखदा खांडकेकर हि जोडी एकत्र थिरकणार आहे.
                          धिनक धिन आग लगा दु में.. ग बाई माझा तोरा नखरेल असे ह्या गाण्याचे बोल असून सर्वांच्या आवडत्या गोड गळ्याच्या गायिका आशा भोसले आणि साधना सरगम ह्यांच्या आवाजातून हे गाणं सजलं आहे. हे फ्युजन गाणं अस्लम सयानी आणि कौस्तुभ पंत यांनी लिहिले असून राजा अली यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध नृत्यांगना फुलवा खामकर यांनी ह्या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. हिरो चित्रपटासाठीचं हे गाणं  असेल आणि  पसंतीस उतरेल.                           हिरो चित्रपटाची स्टार स्टार कास्ट देखील जबरदस्त आहे. रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, सुखद खांडकेकर, भूषण पाटील,वैष्णवी करमरकर हे स्टार ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
                            R.P.G प्रोडक्शन प्रस्तुत राजश्री गायकवाड निर्मित अनिस मोरब सह-निर्मित हिरो हा चित्रपट N.N. Siddhiqui  ह्यांनी दिग्दर्शित केला आहे.
majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment