Monday 20 March 2017

चव्हाण पुन्हा रंगभूमीवर.....

               चार दशकाहून अधिककाळ विविध रंगभूमिका करून रसिकांना खदखदून हसायला लावणारा एक चतुरस्त नट म्हणजेच विजय चव्हाण. त्यांनी रंगभूमीवर अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिका करताना त्या भूमिकेला योग्य न्याय कसा मिळेल याचाही पुरेपूर विचार केला. रंगभूमीवरील त्यांची प्रत्येक भूमिका खूप गाजली. त्यांनी रंगभूमीवर सादर केलेली मोरूची मावशी,टूर टूर,श्रीमंत दामोदर पंत हि नाटक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
               कामाला प्रथम प्राधान्य देणाऱ्या विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण याने "तुमचं आमचं सेम नसतं" या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. आपल्या वडिलांच्या नावाचा फायदा न घेता वरद ने अजूनही चांद रात आहे,मंगळसूत्र यांसारख्या मालिका आणि ऑन ड्युटी २४ तास,खो-खो,धनगरवाडा,वात्सल्य यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता नुकतंच १०० डेज हि मालिका त्याने केली. तसेच वरद आता माणूस एक माती या चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे
.

                 नितीन कांबळे दिग्दर्शित तुमचं आमचं सेम नसतं हे धम्माल विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला. या नाटकाचा पुढील प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. २१ मार्चला रात्री ८ वाजता गडकरी रंगायतन ,ठाणे येथे हा प्रयोग पार पडणार आहे. जर चव्हाण पुन्हा रंगभूमीवर तुम्हाला अनुभवायचे असतील तर हे नाटक पाहायला विसरू नका. वरद सोबत या नाटकात सिद्धार्थ पगारे,आदित्य भालेराव,गौरी जोगळेकर,कविता मगरे,नितीन कुर्लेकर,आणि अभिजित दुलगज हे नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. कलावंताचा दमदार अभिनय आणि योग्यवेळी होणारी विनोद निर्मिती हे सर्व आपल्याला ह्या नाटकात अनुभवायला मिळतं. ह्या नाटकाचा प्रयोग म्हणजे नाट्यरसिकांसाठी एक मेजवानी असेल असे बोलायला काही हरकत नाही.
              वरद चव्हाण आणि ह्या नाटकाच्या संपूर्ण टीम ला majja.ooo तर्फे खूप शुभेच्छा....


वरद चव्हाण आणि विजय चव्हाण यांची काही छायाचित्रे:







majja.ooo : Ankita Lokhande.

2 comments: