Tuesday 7 March 2017

ती... तिच्यासाठी आज काहीतरी खास

                ती... आजचा दिवस तिच्यासाठी... मुळात आजचा नाहीतर सगळेच दिवस तिच्यासाठी...तिची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे चांगली पीढ़ी निर्माण करणे.... हे काम करण्यासाठी लागणारी त्याग, प्रेम, चिकाटी, सहनशीलता या गुणांची देण जेवढी स्त्री कड़े आहे तेवढी पुरूषाकडे नाही.

 तसं बघायला गेलं तर प्रत्येक स्त्री हि तिच्या निवडलेल्या क्षेत्रात ग्रेट आहे परंतु आज मुद्दाम बोलूया ते चित्रपट सृष्टीतील स्त्रियांबद्दल.. मुद्दाम कारण 'ती हिरोईन आहे तिला काय सगळं भेटत असेल..तिच्यासाठी सगळं सोपं आहे'हे सगळं त्यांना ऐकवलं जातं परंतु अभिनेत्री होण्याआधी ती एक स्त्री आहे आणि ती हि त्याच संकटाना सामोरी जाते ज्या संकटाना इतर स्त्री जाते. आता फरक आला तो फक्त तिला लाखो लोक ओळखतात आणि आपल्याला हातावर मोजण्याइतपत. असो, बोलण्याचा उद्देश हाच कि सोपं काही नसतं,आपल्या आवडत्या क्षेत्रात जर काही करायचं असेल तर अडचणी ह्या येतातचं.. अन विशेष म्हणजे जर तुम्हाला अभिनेत्री हवायचं असेल तर बऱ्याच अडचणी येतात.. घरातले,नातेवाईक मंडळी आणि हा समाज.. 'समाज' यांना सई ताम्हणकर,राधिका आपटे हिंदी चित्रपटात बघायला आवडतात पण त्याच जर मराठी चित्रपटात बिकनी घालत असतील तर यांच्या भुवया उंचावतात. ९ ते ९;३० यांना सायली संजीव मालिकेत बघायला आवडते पण तीच सायली जर तुमच्या बिल्डिंग मध्ये राहायला आली तर नाही आवडत. समाज हा बऱ्याच बाजूने बोलतो परंतु हे सगळं सहन करून आपल्या पायावर भक्कम पणे उभ्या राहून एखाद्या अभिनेत्याच्या खांद्याला खांदा लावून ह्याच स्त्रिया मराठी तसेच हिंदी मध्ये हि जाऊन पोहोचल्या.

तुम्हाला मराठी मध्ये कोणती जोडी आवडते हा प्रश्न विचारला असता आम्हाला स्वप्नील-सई ची जोडी खूप आवडते,अंकुश-मुक्ता एकत्र किती छान दिसतात...अहो पण स्वप्नील सई शिवाय कुठे पूर्ण आहे..? मुक्ता शिवाय झाला असता का डबल सीट..? २४ तासांचं शूटिंग करून देखील आपल्या चाहत्यांसाठी वेळ ह्याच अभिनेत्री काढतात.. किती थकलेल्या असतील तरीही जेव्हा आपल्या चाहते मंडळींना भेटतात तेव्हा चेहऱ्यावर स्मितहास्य असतंच ना ? 'आमचे चाहते म्हणून आम्ही' असे हि त्या ठामपणे सांगतात. चाहते म्हणून आपण पण त्यांच्या योग्य तो आदर करूया आणि त्यांच्या प्रत्येक भूमिकेला स्वीकारुया. अश्याच तमाम स्त्री वर्गाला majja.ooo तर्फे शुभेच्छा.




majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment