Wednesday, 8 March 2017

प्रसाद ओक यांचा अजून एक जबरदस्त चित्रपट - 'हिरकणी'

              आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त  अभिनेता प्रसाद ओक यांनी एक खास सरप्राईस त्यांच्या चाहत्यांसाठी दिले आहे. मालिका,नाटक या सर्व माध्यमांतून प्रसाद नेहमीच आपल्याला दिसतो. त्याचा कच्चा लिंबू हा चित्रपट तयार आहे परंतु आता अजून एक चित्रपट घेऊन प्रसाद ओक सज्ज आहे. शिवाजी महाराजांच्या काळातल्या हिरकणीवर हा चित्रपट आधारित आहे.

आणि चित्रपटाचं नाव आहे 'हिरकणी'... या चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद हे चिन्मय मांडलेकर यांनी केले असून याआधी ज्योतिबा फुले यांच्यावरील मालिकेनंतर चिन्मय-प्रसाद एकत्र ह्या चित्रपटातून एकत्र आले आहे. ह्या चित्रपटातील बरीच माहिती सध्या तरी गुलदस्त्यात आहे. अजून माहितीसाठी थोडी वाट पाहावी लागेल.  
majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment