Friday 3 March 2017

रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर हि सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र..

                   मराठीसह हिंदी  गाजवणारी सचिन खेडेकर आणि रेणुका शहाणे हि जोडी तब्बल २० वर्षानंतर एकत्र काम करताना पाहायला भेटणार आहे. रेणुका शहाणे बरेच काळ रुपेरी पडद्यापासून लांब राहिल्या  आता त्या सचिन खेडेकरांसोबत नक्की काय नवीन घेऊन येत आहे याची बरीच उत्सुकता त्यांच्या चाहते मंडळींना आहे.

नव्वदच्या दशकात या जोडीने सैलाब या छोट्या पडद्यावरील मालिकेत एकत्र काम केलं होत. आता पुन्हा एकदा ते एकत्र काम करणार याची बातमी रेणुका शहाणे यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली. शॉर्ट आणि स्वीट असं नक्की ते काय घेऊन येतील यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.





majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment