Wednesday 8 March 2017

दहशदवादावर आधारित 'शूर आम्ही सरदार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

      ऑस्ट्रेलियास्थित गणेश लोके यांनी पुढाकार घेऊन दहशतवादावर आधारित शूर आम्ही सरदार हा चित्रपट केला आहे. गणेश लोके यांनी या चित्रपटात लेखन,प्रमुख भूमिका,सहदिग्दर्शन आणि निर्मिती अशी चौफेर भूमिका साकारली आहे. दहशतवादावर आधारित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


तसेच या चित्रपटाची  इतर स्टार कास्ट  तगडी आहे. अभिनेते सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे,संजय मोने,शंतनू मोघे, हि स्टार मंडळी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.इंडो ओस इंटरटाइनमेंट,झुमका फिल्म्स, सासा प्रोडक्शन च्या डॉ.प्रज्ञा दुगल,श्वेता देशपांडे,आणि गणेश लोके यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.. देशावर आधारित हा चित्रपटातील अजून बरीच माहिती गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट नक्की प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आशा.




majja.ooo : Ankita Lokhande   

No comments:

Post a Comment