Thursday 9 March 2017

'प्रेम हे' मालिकेत झळकणार प्रथमेश आणि कृतिकाची फ्रेश जोडी....

        झी युवा वरील प्रेम हे हि मालिका सध्या बरीच गाजत आहे. प्रेम हे मालिकेचं आता तिसरी गोष्ट चालू आहे. ह्या प्रेमाच्या तिसऱ्या प्रवासात प्रथमेश परब आणि कृतिका देव ची फ़्रेश जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे.

बालक-पालक ,टाईमपास आणि टाईमपास २ तसेच उर्फी या चित्रपटामधून प्रथमेश प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तसेच प्राईम-टाइम आणि राजवाडे ऍण्ड सन्स या चित्रपटांमधून कृतिका आपल्याला सर्वानाच माहित आहे. दोघंही सध्या नाटक या क्षेत्रात अग्रेसर आहेत. तसेच कृतिका देव आणि प्रथमेश परब हे दोघंही पहिल्यांदाच एखादी मालिका करत आहेत त्यामुळे प्रेक्षकांचं कौतुक आणि लक्ष त्यांना भरपूर भेटणार आहे. ह्या दोघांना majja.ooo तर्फे त्यांच्या पुढील प्रवासातही खूप शुभेच्छा.




majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment