Monday 27 March 2017

विविध प्रयोगांनी नटलेलं एक धम्माल विनोदी नाटक

                  मराठी रंगभूमीकडे सध्या प्रेक्षकवर्ग बऱ्याच प्रमाणात रस घेत आहेत असं बोलायला काहीच हरकत नाही. मराठी रंगभूमी हि नेहमी प्रमाणे वेगळे वेगळे विषय प्रेक्षकांसमोर मांडत आली आहे. असच एक वेगळ्या धाटणीचं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे नाटकाचे नाव आहे ' तुमचं आमचं सेम नसतं '... खूप वेगळा विषय आणि एक निराळा पण पटणारा असा विचार या नाटकातून आपल्याला अनुभवायला मिळतो. प्रेम म्हणजे प्रेम असत.. पण तुमचं आमचं कधीच सेम नसतं अश्याच काही कथानकावर आधारित हे नाटक आहे. नाटक म्हंटल कि प्रेक्षकांना लागतो तो ओळखीचा चेहरा परंतु दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी नवीन चेहऱ्यांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

                    ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांनी रंगभूमीवरील अनेक नाटक गाजवली आता त्यांचा सुपुत्र वरद चव्हाण देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन स्वतःच नाव या चित्रपटसृष्टीत निर्माण करत आहे. वरद व्यतिरिक्त या नाटकात अनेक नवीन चेहरे आपल्याला  पाहायला भेटतात. उत्तम अभिनय आणि भूमिकेची जाण योग्य पद्धतीने हाताळून हे सर्व रंगभूमीवर काम करताना दिसतात. सिद्धार्थ पगारे,आदित्य भालेराव,गौरी जोगळेकर,कविता मगरे,अभिजित दुलगज आणि नितीन कुर्लेकर हे नवीन कलाकार आपल्याला ह्या नाटकात बघायला भेटतात.

              अजून एक विशेष म्हणजे ह्या नाटकात तीन उत्कृष्ट अशी गाणी देखील पाहायला मिळतात. ह्या सुंदर गाण्यांना संगीत बद्ध केले आहे तृप्ती चव्हाण यांनी. साईराम अय्यर,तृप्ती चव्हाण आणि करण यांच्या आवाजाने ह्या गाण्याची शोभा अजून वाढवली आहे. ह्या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केले आहे.यश क्रिएशन आणि परीस प्रोडक्शन प्रस्तुत आणि के.प्रतिमा व सौ.अर्चना निलेश चव्हाण निर्मित विविधतेने नटलेल्या ह्या नाटकाचा पुढील प्रयोग मंगळवार ४ एप्रिल दुपारी ४;३० वाजता सावित्रीबाई फुले,डोंबिवली  येथे असणार आहे. एका वेगळ्या नाटकाचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ह्या नाटकाचा प्रयोग चुकवू नका.







majja.ooo : Ankita Lokhande.

1 comment: