Friday, 3 February 2017

निलेश साबळेंच्या जागेवर आता प्रियदर्शन जाधव...

         कसे आहात मंडळी हसताय ना ? हा आवाज कानावर पडला कि नकळत चेहऱ्यावर हसू उमटतं. हाच प्रश्न विचारणारा महाराष्ट्राचा लाडका निलेश साबळे आता काही दिवसांपुरती आपल्याला चला हवा येऊ द्या मध्ये दिसणार नाही. गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणाऱ्या आणि हि टीम एकत्र बांधून ठेवण्याचं काम निलेशने अगदी चोख पार पाडलं आहे. दिग्दर्शन,अभिनय आणि लेखन ह्या सर्व बाबतीत अग्रेसर असलेल्या निलेशने महाराष्ट्राला मनोरंजनाचा एक मज्जेदार कार्यक्रम दिला. सोमवार मंगळवार ९;३० ते १०;३० या मंडळींनी आपल्याला खूप हसवलं,पोस्टमन काकांच्या पत्रांनी रडवलं कधी समाजाची जाणीव करून दिली असा परिपूर्ण असलेला कार्यक्रमाची धुरा निलेश साबळे याने सांभाळली आहे.
         मराठीच नाहीतर बॉलीवूड चे कलाकार हि चला हवा येऊ द्या मध्ये आवर्जून येतात.झी वाहिनीचा चेहरा बनलेला डॉ निलेश साबळे प्रकृती अस्वस्थ्यामुळे काही आठवडे विश्रांती घेणार आहे. पण तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही निलेश साबळे नाही तोपर्यंत आपल्या सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच प्रियदर्शन जाधव सूत्रसंचालनाची सूत्रे सांभाळणार आहे.

           हे सर्व करत असताना मागच्या काही दिवसांपासून निलेशला प्रकृती अस्वस्थ्याचा त्रास जाणवत होता. यामुळेच निलेशने वैद्यकीय सल्यानुसार काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही विश्रांती थोड्याच दिवसांची असून लवकरच तो या कार्यक्रमात पुन्हा हजेरी लावेल.
majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment