Friday 10 February 2017

फुगे चित्रपटाचा रिव्ह्यू....

                  महाराष्ट्रभर ज्या सिनेमाची चर्चा होतेय असा हा फुगे चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला. दोन जिवलग मित्रांची हि गोष्ट आहे. ह्रिषीकेश आणि आदित्य. लहानपणापासून एकत्र वाढलेले धम्माल मज्जा मस्ती सर्व एकत्र केलेलं असे हे मित्र. जेव्हा एखादी मुलगी आयुष्यात येते आणि आपला मित्र दुरावला जाणार आणि म्हणून फिरायला म्हणून गोवा या ठिकाणी गेलेले हे मित्र खूप दारू पितात आणि त्या नशेमध्ये ह्यांच्या सोबत काय काय घडतं आणि त्या रात्री घडलेल्या एका घटनेमुळे त्यांचं आयुष्य कसं बदलतं. हे सर्व या फुगे चित्रपटाचं कथानक आहे. सुबोध आणि स्वप्नील हि जोडी ह्या कथानकासाठी साजेशी वाटत नाही. सुबोधला पाहिजे तेवढी ह्रिषीकेश कि भूमिका वटवता आली नाही.

        प्रार्थना बेहेरे आणि निथा शेट्टी ह्या दोन्ही अभिनेत्रीची कामं यथातथा वाटतात. चित्रपटात बऱ्यापैकी विनोदनिर्मिती होताना दिसते. मोहन जोशी ची भूमिका हि ह्या चित्रपटात पाहण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्याला विनोदनिर्मिती होताना दिसते. दिग्दर्शनाच्या बाबतीत हा चित्रपट थोडासा मागे पडलेला दिसून येतो.  चित्रपटाची गाणीही इतकीशी मनात उतरत नाही. एकच फाईट आणि वातावरण टाईट सगळेच बोलतात भैरप्पा लयं वाईट असा धडाकेबाज डायलॉग घेऊन जेव्हा निशिकांत कामत खलनायक या भूमिकेत चित्रपटात झळकतात तेव्हा हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर जातो. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात निशिकांत कामत यांनी साकारलेला हा खलनायक रसिकांसाठी सरप्राईज पॅकेज ठरणार आहे.  स्वप्नील सुबोधचे चाहते असाल तर तुम्ही हा चित्रपट बघू शकता. फुगे ह्या चित्रपटाला चित्रपटाला majja.ooo तर्फे 2 स्टार.




majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment