Saturday 25 February 2017

पद्मश्री पुरस्कार प्राप्त कलावंत...डॉ श्रीराम लागु.

             आपल्या अभिनयाचा झेंडा उंच फडकविणारे एक अभिनय संपन्न कलावंत म्हणजे डॉ श्रीराम लागु. रंगभूमीवरचा एक असा नटसम्राट ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात अभिनयाचं विद्यापीठ सामावलं आहे. श्रीराम लागू हे रंगकर्मी नाहीतर रंगधर्मी आहेत. एक चिंतनशील अभिनेता म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर असले तरी ते हाडाचे कलावंत आहे. १९ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा मध्ये त्यांचा जन्म झाला. पण त्यांचे बालपण पुण्यातच गेले. पुण्याच्या भावे हायस्कूल मध्ये त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेतील गॅदरिंग मध्ये त्यांनी पहिल्यांदाच नाटकात सहभाग घेतला. तेव्हा त्यांना प्रचंड घाम फुटला त्यांनी कसाबसा तो प्रयोग पूर्ण केला. पण तेव्हा त्यांनी ठरवलं यापुढे नाटकाच्या आजूबाजूला देखील फिरकणार नाही. परंतु काही काळानुसार त्यांची नाटकातली आवड वाढली.

पाचवी सहावी पासून त्यांना नाटकांची,वाचनाची आणि सिनेमा पाहण्याचे वेड लागले होते. त्यावेळेस ते मराठी नाटक चोख पाठ करायचे. आणि हॉलिवूड कलाकारांच्या पद्धतीने ते सवांद बोलून पाहायचे,हा जणू त्यांना छंदच जडला होता. त्यानंतर त्यांनी फग्युर्सन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. आर्टस् स्कुल मधून चित्रकला शिकावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु वडलांच्या हट्टामुळे वैद्यकीय व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलं. १९४६ साली पुण्याच्या बी.जे मेडिकल कॉलेज मध्ये ते दाखल झाले. ५ वर्षाच्या शैक्षणिक प्रवासामध्ये त्यांनी ५ मोठी नाटक केली आणि अनेक एकांकिका केल्या. तेव्हाच त्यांनी लग्नाची बेडी हे नाटक केलं आणि ह्या नाटकातील डॉ. कांचन ची भूमिका त्यांना पारितोषिक मिळवून देणारी ठरली. शिक्षण घेत असताना त्यांना त्यांचं पाहिलं प्रेम लाभलं. आणि त्यांचं आयुष्य उजाळले ते डॉ. मालती रेगे ह्यांच्या रूपानं. हे विवाहबद्ध झाले तेव्हा ते M.B.B.S होते. त्यावेळेस त्यांनी अनेक नाटकात अभिनय केलाच पण आचार्य अत्रेच्या उद्याचा संसार या नाटकासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाले. दूरचे दिवे हे नाटक करत असताना तात्यासाहेब शिरवाडकर यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. आणि त्याच भेटीत ते प्रचंड भारावून गेले.
           जग्गनाथचा रथ ह्या नाटकातल्या त्यांच्या ७ वेगळ्या भूमिका आपण कधीच विसरू शकत नाही. व्यावसायिक रंगभूमीशी त्यांचं एक निराळंच नातं निर्माण झालं. वसंत कानेटकरांच्या वेड्याचं घर उन्हात या नाटकातला दादासाहेब रंगभूमीवर डॉ. लागूंच्या रूपात अवतरला. त्यांना पारितोषिक तर मिळालीच पण खूप प्रसिद्धी देखील मिळाली. या काळात त्यांच्या वाचनात आणि विचारणा चांगली शिस्त लाभली. मर्ढेकरांकाढून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. पाश्चिमात्य रंगभूमीवरचे नाटक त्यांनी अगदी जवळून पहिली. जून १९६२ मध्ये ते पुण्यात परतले आणि ताराचंद हॉस्पिटल मध्ये सर्जन म्हणून रुजू झाले. पण तेव्हा त्यांना रंगभूमी देखील पुन्हा एकदा खुणावू लागली. नंतर त्यांना रंगायन मध्ये काम करण्याची ऑफर मिळाली. मादी,मी जिंकलोमी हरलो,एक होती राणी,अशा अनेक नाटकांमधून त्यांनी अभिनय केला. तेव्हा त्यांनी विजय तेंडुलकरांची भेट झाली ह्या लेखकाचं एक वादळी नाटक आलं गिधाडे नावाचं. जे असभ्य भाषेवर आधारित होत. त्यामुळे हे नाटक करायला कोणीच तयार नव्हतं. पण अपवाद होता तो श्रीराम लागु यांचा.या नाटकाला बराच विरोध झाला. किमान ७ ते ८ वर्ष हे नाटक काही होईना. श्रीराम लागू यांनी या नाटकात अभिनय नव्हे तर दिग्दर्शन देखील केलं. तेव्हा त्यांना साथ लाभली ती अमोल पालेकरांची.
              वसंत कानेटकरांच्या इथे ओशाळला मृत्यू या नाटकात त्यांची संभाजीची भूमिका अद्भुत ठरली. पुढे तात्यासाहेब शिरवाडकर हे त्यांच्या आयुष्याला वळण देणारे व्यक्तिमत्व ठरले. त्यांनी श्रीराम लागू ह्यांना नजरे समोर ठेऊन नटसम्राट हे नाटक लिहिले. हे नाटक रंगभूमीवर साकारताना अप्पा साहेब बेलवलकरांच्या रूपात डॉ श्रीराम लागू रंगभूमीवर अशी काही कमाल करून गेले कि अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले. प्रत्येक भूमिकेचा बारीक अभ्यास करून मगच ते रंगभूमीवर उतरवणं हा त्यांचा स्वभाव होता. तनुजा सोबत केलेला लग्नाची बेडी,सुंदर मी होणार,आणि प्रेमाची गोष्ट या नाटकातील त्यांचा अभिनय आजही लक्षात राहतो. नाटकासोबत छोट्या आणि रुपेरी पडद्यावर त्यांनी आपला अभिनय सुरुच ठेवला.      
               पिंजरा,सामना,सिंहासन,मुक्ता,झाकोळ,खिचडी यांसारखे चित्रपट करणाऱ्या मराठमोळ्या कलाकाराने हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये देखील अनेक लक्षवेधी भूमिका केल्या. मराठी सिनेमा पेक्षा हिंदी चित्रपटातील त्यांचा वावर हा कायम लक्षात राहण्यासारखा आहे. घरोंदा ह्या हिंदी चित्रपटासाठी त्यांना फिल्म फेअर अवॉर्ड देखील मिळाले. एखादा कलावंत समाजाचं देखील देणं लागतो हि गोष्ट त्यांनी जाणली आणि सामाजिक  कार्यात त्यांनी सहभाग घेतला. हा कलावंत महाराष्ट्रात जन्माला आला हे महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीला majja.ooo तर्फे शुभेच्छा.  




majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment