Saturday 4 February 2017

ज्येष्ठ अभिनेते....सदाशिव अमरापूरकर

                 चित्रपटात खलनायकाची चोख भूमिका निभावणारे सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे  अमरापूरकर. ११ मे १९५० रोजी अहमदनगरच्या व्यवसाय करणाऱ्या ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. लहान पानापासून सदाशिव अमरापूरकर यांना तात्या या नावाने संबोधलं जायचं. शाळा कॉलेज पासूनच तात्यांना अभिनयाची आवड होती. पुणे युनिव्हर्सिटी मध्ये इतिहास या विषयात पदवी असताना रंगभूमीवरचं त्यांचं आकर्षण अनेकांनी पाहिलं. नगर कॉलेजमध्ये असताना  एकांकिका केल्या. पेटलेली अमावस्या या एकांकिकेमधला त्यांचा अभिनय  वाखाणण्याजोगा होता. याच काळात काका किशाचा, भटाला दिली ओसरी या नाटकांमधून रंगभूमीवर त्यांनी त्यांच्या अभिनयाचं दर्शन दिलं. त्यानंतर त्यांनी अल्टिमेट थिएटर आणि नाट्यपराग या संस्थेची स्थापना अहमदनगर  येथे केली.
     उपजत गुणवत्ता लाभलेला कलाकार रंगभूमीशी प्रामाणिक राहिला. १९८२-१९८२ याकाळात हँडसॅप नाटकात कमाल केली अविनाश मसुरकर आणि भक्ती बर्वे इनामदार यांच्या सोबत त्यांनी त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी केली. सुप्रसिद्ध कलाकार गोविंद निलानी हे सदाशिव अमरापूरकर यांच्या अभिनयाने इतके  प्रभावित झाले कि त्यांनी १९८३ साली अर्धसत्य साठी खलनायक म्हणून सदाशिव अमरापूरकर यांची निवड केली आणि फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. त्यानंतर   पुराना मंदिर,फरिश्ते,मोहरे,हुकूमत यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. खलनायक म्हणून त्यांची संवादफेक निराळी आणि लक्षवेधी होती. १९९१ मध्ये महेश भट्ट यांनी त्यांना महाराणी हि आव्हानात्मक भूमिका दिली आणि त्यांनी या भूमिकेला उत्तम न्याय दिला. याचवर्षापासून फिल्मफेअर हा पुरस्कार त्यांना बहाल  करण्यात आला. १९९० साली हि सहाय्यक कलाकाराच्या भूमिकाही सदाशिव अमरापूरकर यांनी साकारल्या. त्यांच्या  भूमिकाही लोकांच्या फारच पसंतीस पडल्या.
  आँखे,इष्क,कुली नं.१,गुप्त,आंटी नं.१,हम हे कमाल के,खुलामखुल्ला प्यार करेंगे या चित्रपटात विनोदी भूमिका केल्या. २००० नंतर हिंदी सिनेमांमध्ये क्वचित झळकू लागले. २०१३ मध्ये ४ शॉर्टसफिल्म्स असलेल्या bombay talkies या सिनेमामध्ये अभिनय केला. त्याचसोबत त्यांची मराठी सिनेसृष्टीची कारकीर्द वाखाणण्याजोगी होती. आमरस हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. २२ जुने १९९७,दोघी,खतरनाक या चित्रपटात विविध भूमिका साकारताना दिसले. तहान,वास्तुपुरुष,सावरखेड एक गाव या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विविध प्रकारच्या होत्या. जिंदगी आणि भारत एक खोज या टी.व्ही मालिका मधून देखील त्यांनी अभिनय केला. १९७३ साली माध्यमिक शिक्षण घेताना जिच्यावर प्रेम जडलं सुनंदा करमरकर हिच्याशी विवाह केला. अमरापूरकरांची मुलगी हिंदी मराठी मध्ये दिग्दर्शिका म्हणून कार्यरत आहे. सदाशिव अमरापूरकर यांनी हिंदी,मराठी,बंगाली,ओरिया,हरियाणवी अश्या विविवध भाषांमध्ये एकूण ३०० हुन अधिक चित्रपट केले.


अभिनय क्षमता दर्शवणारा हा कलाकार सामाजिक जाणीव जपणारा होता. अंधश्रद्धा निर्मूलन समिती,स्नेहालय या संस्था मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. वयाच्या ६४ वर्षी ३ नोव्हेंबर २०१४ मध्ये पहाटे पाऊणे तीनच्या सुमारास या कलाकाराने शेवटचा श्वास घेतला. या चतुरस्थ आणि हुरहुन्नरी अभिनेत्याला majja.ooo चा सलाम.      





majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment