Monday, 27 February 2017

300 गायक गाणार एक गाणे

                  मराठीमध्ये सध्या बायोपिक ला बरंच उधाण आलं आहे... विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर आधारित एक बायोपिक लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रिले सिंगिंग होणार आहे. भारतात प्रथमच रिले सिंगिंग होणार असून ३०० गायकांना विक्रम पार पाडण्यात येणार आहे. प्रसिद्ध गायिका साधना सरगम ह्यांच्या उपस्थितीत हा इव्हेंट पार पडला. सिनेमाच्या प्रमोशनचा एक भाग म्हणून नवा विक्रम भारताच्या नावावर होणार आहे. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे या चित्रपटात डॉ. तात्याराव लहाने यांची भूमिका साकारणार आहे. चक दे प्रोडक्शन निर्मित डॉ. तात्याराव लहाने चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विराग मधुमालती वानखेडे असून एक हिंदुस्थानी या संगीतकाराने हे गाणं कंपोज केलं आहे. ह्या सर्व नवीन प्रयोगांमुळे सर्वांचं लक्ष या सिनेमाकडे लागलं आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment