Thursday 16 February 2017

रांजण चित्रपटाचा रिव्ह्यू....वाचा येथे

            उत्सुकता वाढवणारं,मनाला वेड लावणारी गाणी,आणि कलाकारांचा जीव ओतून केलेला अभिनय हा सगळंच योग्य जुळून आलाय तो रंजन या चित्रपटात. सोशल मीडियावर रांजणची खूप चर्चा सुरु होती आणि आता हा चित्रपट १७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
               लहान वयातील हे प्रेम मिळवण्यासाठी प्रतापची चाललेली धडपड त्यातचं त्याला साथ देणारे त्याचे तीन मित्र त्याला मदत करण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढतात आणि तीच कल्पना पूर्ण करण्यासाठी केलेली मेहनत आणि समोर येणार अडथळे हे चार मित्र कसे सोडवतात आणि पुढे काय गम्मत होते हे आहे रांजण चित्रपटाचे कथानक. 
              चित्रपटाची गाणीही प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहेत. गाण्याचा वापर हि ह्या चित्रपटात उत्तम पद्धतीने केला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन हे अगदी उत्तम पद्धतीने झालं आहे.चित्रपटाचे सवांद देखील चांगल्याप्रकारे लिहिले गेले आहेत. चित्रपटात विद्याधर जोशी,भाऊ कदम,भारत गणेशपुरे यांनीही त्यांच्या भूमिका या मज्जेदार पद्धतीने उमटवल्या आहेत. परंतु ह्या तगड्या कलाकारांचा अजून थोडा उपयोग करून घेतला असता तर हा सिनेमा कदाचित वेगळ्या उंचीवर गेला असता. 

               रांजण या चित्रपटाची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ह्यामध्ये शिवाजी महाराजांचं अनिमेशन केलं आहे ते खरंच वाखाण्याजोगं आहे. चित्रपटात केलेला लहान मुलांचा अभिनय देखील मनात घर करून जातो.गौरी कुलकर्णी हिने देखील मधू ची भूमिका अत्यंत योग्य पद्धतीने सांभाळली आहे. 
                  महागणपती एंटरटमेन्ट प्रस्तुत रवींद्र कैलास हरपळे निर्मित प्रकाश जनार्धन पवार लिखित आणि दिग्दर्शित रांजण या चित्रपटाला majja.ooo तर्फे ३.५ स्टार्स.



majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment