Saturday 18 February 2017

एक प्रतिभावंत कलाकार.... महेश मांजरेकर

                      महेश वामन मांजरेकर हे नाव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक आदरणीय नाव. हे नाव ज्या सिनेमात असेल त्या सिनेमात काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे नक्की जाणवतं. ह्या कलाकाराने मराठी चित्रपटसृष्टीत एक निराळा बदल घडवून आणला. निर्माता, दिग्दर्शक,गायक,अभिनेता,लेखक ह्या सर्व भूमिकांमधून त्यांनी प्रवास केला. त्यांनी आपल्या कलेची जाण रसिकांना करून दिली. महेश मांजरेकर यांचा जन्म १९५८ साली एका मध्यमवर्ग कुटुंबात मुंबई मध्येच झाला. १९८४ साली त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्यांदाच त्यांनी अफलातून या नाटकामधून केलेला अभिनय रंगभूमीवर बराच गाजला. आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. नंतर त्यांनी निर्मिती क्षेत्रात वाटचाल करायला सुरुवात केली. गिधाडे,ऑल द बेस्ट,डॉक्टर तुम्हीसुद्धा या नाटकांची निर्मिती त्यांनी केली. निर्मिती सोबतच त्यांना दिग्दर्शनातही तितकाच रस होता.
                 १९९० च्या दशकात त्यांनी आई हा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. आणि त्यांचं नशीब इतकं बलवंतर कि ह्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीकडून हिंदी चित्रपट सृष्टीत झेप घेतली. निदान या सिनेमाचं दिग्दर्शन करत असताना या सिनेमामध्ये पाहुणे कलाकार म्हणीन ज्याने अभिनय केला त्या संजय दत्तला वास्तव या चित्रपटाची कथा ऐकवली. आणि कथा ऐकताच संजय दत्त या सिनेमासाठी तयार झाला. आणि १९९९ मध्ये वात्सव हा चित्रपट प्रदर्शितहि झाला. त्यांच्या ह्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर बरीच कमाई केली. आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर नावारूपाला आले. नंतर त्यांनी एका गंभीर विषयात हात घालून अस्तित्व हा चित्रपट तयार केला. आणि ह्या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर कधीच त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. एका मागोमाग एक हिंदी चित्रपट बनवत असताना काही यशस्वी तर काही असफल झाले. तरीसुद्धा ते खचले नाही. नंतर संजय गुप्ता च्या कांटे या सिनेमात अभिनय करायची संधी महेश मांजरेकरांना भेटली. नेगेटिव्ह शेड असलेली भूमिका त्यांनी विनोदी पद्धतीने साकारली. आणि अभिनेता म्हणून त्यांचं खूप कौतुक झालं. मराठी आणि हिंदी सोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही त्यांनी झेप घेतली. त्यांनी खलनायकाच्या अनेक भूमिका त्यांनी केल्या. असं म्हणतात सलमानच्या ज्या चित्रपटात महेश मांजरेकर असतील तर तो चित्रपट सुपरहिट होतोच. वॉन्टेड,दबंग,रेडी,बॉडीगार्ड,जय हो,असे बरेच सिनेमे त्यांनी सलमान सोबत केले. ह्याव्यतिरिक्त ओ माय गॉड,हिम्मतवाला,शूटआऊट ऍट वडाला,वन्स अपॉन या टाइम इन मुंबई अगेन,सिंघम रिटर्न्स,बाजीराव मस्तानी या सारख्या बिग बजेट चित्रपटातही त्यांनी अभिनय केला.

                    हिंदी मध्ये काम करत असताना त्यांनी कधी मराठी चित्रपट सृष्टीला दुय्यम स्थान दिले नाही. मराठीमधले कलाकार हिंदी मध्ये नावारूपाला यावे म्हणून त्यांनी   प्राण जाये पर शान ना जाये ह्या चित्रपटात बहुतांशी मराठी कलाकार घेतले. तसेच हिंदी मधल्या अस्तित्व ह्या चित्रपटाचा इंग्लिश रिमेक सुश्मिता सेन हिला घेऊन बनवला आणि त्या चित्रपटाचं नाव होत it was raining that night. ह्या सर्व भूमिकांसोबत त्यांनी संकलन क्षेत्रातही काम केलं. त्यासोबतच त्यांना गाणंही छान जमत.विशेष म्हणजे त्यांनी मराठी पुरस्कार सोहळ्याचं रूप पालटलं. आणि स्थापित केला मिफ्टा पुरस्कार सोहळा. १९९५ साली आई या चित्रपटाच्या वेळेस एका मुलीशी त्यांची भेट झाली. आणि ती नायिका म्हणजेच मेधा मांजरेकर. तसेच त्यांना दोन मुलं देखील आहेत अश्वमी आणि सत्या तसेच मेधा मांजरेकरांना घेऊन त्यांनी अनेक मराठी चित्रपट बनवले निदान,काकस्पर्श,नटसम्राट,दे धक्का अश्या अनेक चित्रपटतमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. आणि ह्या जोडप्याने बांध नायलॉन चे या चित्रपटात प्रथमच एकत्र काम केलं.
                      महेश मांजरेकर ह्यांनी खूप दर्जेदार चित्रपट बनवले अनेक कलाकारांना नावारूपाला आणलं. आणि मराठी चित्रपटसृष्टी श्रीमंत होतेय अशी प्रचिती सर्वाना झाली. मातीच्या चुली,शिक्षणाच्या आईचा घो,लालबाग परळ,मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशे वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले. नटसम्राट ह्या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत सर्वानीच पाहिली. ह्या चित्रपटाने घमघमीत यश तर मिळवलेच पण बॉक्स ऑफीस वर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. अभिनेता,दिग्दर्शक,निर्माता,गायक,संकलनकार अशा अनेक अनेक भूमिकांमधून प्रवास करणाऱ्या प्रतिभावंत कलाकार महेश मांजरेकर ह्यांना पुढच्या वाटचालीसाठी majja.ooo तर्फे हार्दिक शुभेच्छा.




majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment