प्रेक्षकांच्या आवडीचा विषय चित्रपटात आला कि चित्रपट हिट होतोच. येत्या पुढील वर्षात असे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील यात शंका नाही. हल्ली चित्रपटांची नावं जरा हटके ठेवण्याची प्रथा सुरु झाली आहे, व्हेंटिलेटर,घंटा,फुगे या चित्रपटांची नावं हटके असल्यामुळे प्रेक्षकांचं विशेष लक्ष या चित्रपटांकडे वळतं. या सर्व चित्रपटांच्या रांगेत एक नवीन कोरा मराठी सिनेमा 'स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी ' प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला अभिनेता स्वप्नील जोशी आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे त्या सोबतच रुचा इनामदार,सयाजी शिंदे,मिलिंद शिंदे, हे सुद्धा या चित्रपटात झळकणार आहे.नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त.J.W.marriott मुंबई येथे झाला. यामध्ये अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ यांनी खास उपस्थिती दर्शवली होती. गीतकार आणि कथानक हे गुरु ठाकूर यांनी केलं असून मिलिंद वामखेडेकर आणि विशाल यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटाची प्रसिद्धी हि दर्शन मुसळे करत आहेत.
मी मराठी फिल्म एंटरटेनमेंट प्रस्तुत गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार निर्मित गणेश आचार्य दिग्दर्शित 'स्वामी तिन्ही जगाचा...भिकारी ' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी कोणता नवीन विषय घेऊन येतोय यासाठी पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल.
Majja.ooo : Ankita Lokhande

No comments:
Post a Comment