Thursday, 15 December 2016

प्रवीण कुंवर यांच्या सुरांना भेटणार केतकी माटेगांवकर आणि रोहित राऊत यांच्या सुरांची साथ

                         चित्रपटात बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात मग ते चित्रपटाचं कथानक असो किंव्हा स्टार कास्ट असो हल्ली चित्रपटाचं संगीत हा खूप महत्वाचा घटक बनला आहे. प्रत्येकवेळी वेगळं संगीत देणं हे संगीतकारावर अवलंबून असतं.तसेच ते चांगल्याप्रकारे निभावणं हे गायक गायिकांवर निर्भर असतं.
                         महाराष्ट्रातील उभरती अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर आणि 'स रे गा मा पा' फेम  रोहित राऊत हि जबरदस्त जोडी आपल्याला एका नवीन मराठी चित्रपटात गाताना दिसणार आहे. या चित्रपटाचे संगीतकार प्रवीण कुंवर हे असून त्यांनी याआधी 'पोलीस लाईन','या कोळीवाड्याची शान' या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. केतकी लहानपणापासून गातेय हे आपल्या सर्वाना माहित आहे त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवलं तिचा पहिला गाजलेला सिनेमा म्हणजे शाळा त्यानंतर काकस्पर्श,तानी,टाईमपास,फुंतरू असे अनेक चित्रपट देऊन तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यानंतर प्रियकरा, सुन्या सुन्या,कसा जीव गुंतला यासारखी गाणी गाऊन तिने तिच्या आवाजाची जादू देखील महाराष्ट्रभर पसरवली.    'स रे गा मा पा' नंतर रोहितला मिळालेला पहिला ब्रेक म्हणजे दुनियादारी चित्रपटातील यारा यारा हे गाजलेलं गाणं त्यानंतर कॉफी आणि बराच काही,प्यार वाली लव्ह स्टोरी,गोलू-पोलु या सारख्या चित्रपटांसाठी आवाज दिलाय. आता हि जोडी कोणतं नवीन गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय याची वाट पाहावी लागेल.
                        चित्रपटाचं नाव आणि बऱ्याच गोष्टी सध्या तरी गुलदस्त्यात आहेत.


majja.ooo: Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment