Wednesday, 7 December 2016

२०१६ मधील सैराट नंतर अजय गोगावलेचा...

येत्या काही वर्षात मराठी चित्रपटाने कमालीची उंची गाठली आहे. वेगळं कथानक, तगडी स्टार कास्ट, मनाला वेड लावणारी गाणी या सर्व बाबतीत नावीण्य पाहायला मिळत आहे. पुढील नवीन वर्षात मराठी प्रेक्षकांसाठी बऱ्याच नवीन चित्रपटांची मेजवानी घेऊन कलाकार सज्ज आहेत असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटांमध्ये एक नवीन आगळा वेगळा मराठी चित्रपट 'रांजण' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचे नाव जरा हटके असल्यामुळे याचं कथानक नक्की काय असेल हे सांगता येत नाही.
                            नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर हे प्रेक्षकांच्या भेटीस आल आहे. मोशन पोस्टर बघून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल यात शंका नाही. चित्रपटाचं अजून एक वेगळपण म्हणजे या चित्रपटाचं गाणं. सैराट मधील 'सैराट झालं जी' गाण्यानंतर आता अजय गोगावलेने रांजण मधील 'लागीर झालं रं' हे गाणं गाऊन चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.


                            महागणपती एंटरटेनमेंट प्रस्तुत रवींद्र कैलास हरपळे निर्मित प्रकाश जनार्धन पवार लिखित आणि दिग्दर्शित 'रांजण' या चित्रपटाची इतर गाणी ,कथानक, स्टार कास्ट सध्या गुलदस्त्यात आहेत. चित्रपटाचे नाव कुतुहल वाढवणारं असून प्रेक्षकांच्या अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करेल कि नाही हे चित्रपट पाहूनच कळेल.Majja.ooo : Ankita Lokhande

No comments:

Post a Comment