Thursday 27 April 2017

विठ्ठला चे मधुर सूर !

चित्रपटातील गाणी हा सध्या एक महत्वाचा घटक बनला आहे. ज्या चित्रपटाची गाणी रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात तो चित्रपट नक्कीच एका वेगळ्या उंचीवर जातो. असाच एक दमदार मराठी चित्रपट 'विठ्ठला शप्पथ' आपल्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या नावावरून तुम्हाला कळलंच असलं चित्रपटाचे कथानक विठ्ठलाशी निगडित असेल परंतु या चित्रपटाचे नाव जितके हटके आहे तितकीच ह्या चित्रपटाची गाणीही कमाल आहेत.
               ह्या चित्रपटातील नुकतंच एका गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले.  'ठायी ठायी माझी विठाई' असे सुंदर बोल या गाण्याला लाभले आहेत. गीतकार मंगेश कांगणे ह्यांनी ह्या गाण्याचे बोल लिहिले आहेत. ह्या गाण्यात एकूणच विनवणी आहे आणि विठ्ठलाची स्तुती आहे. मराठी चित्रपटसृष्टीचे सुरांचे जादूगार म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे चिनार-महेश यांनी ह्या गाण्याला एका वेगळ्याच पद्धतीने संगीतबद्ध केले आहे. विठ्ठलावरील गाणी आपण बरीच ऐकतो परंतु अजून एक विठ्ठलावरच गाणं तयार करणं एक नवीन लोकांना आवडेल अशी चाल तयार करण्याचं सुंदर काम चिनार-महेश ह्या जोडीने केले आहे.

             

              चिनार-महेश ह्या जोडीने प्रत्येकवेळी रसिकप्रेक्षकांना आपल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध केले आहे. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन आणि पूर्वी पेक्षा काहीतरी वेगळं घेऊन येत असतात ह्यावेळी सुद्धा असच काहीतरी फ्रेश आणि नवीन ते आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहेत.आणि त्यांच्या ह्या कामात त्यांना एक सुरेल आवाज लाभला तो म्हणजे गायक राहुल देशपांडे ह्यांचा. राहुल देशपांडे ह्यांच्या आवाजाला आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या आवाजातून सादर होणार प्रत्येक गाणं म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असते. विठ्ठला शप्पथ ह्या चित्रपटात एकूणच ४ गाणी आहेत आणि हि चारही गाणी वेगळ्या धाटणीची असून चिनार-महेश यांनी ती संगीत बद्ध केली आहेत.जिथे एवढे सगळे दिग्गज कलाकार एका गाण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यामधून काहीतरी अलौकिक असा अनुभव प्रेक्षकांना येणार हे नक्की. त्यामुळे ह्यावर्षीचे सुपरहिट सॉन्ग घेऊन हि सर्व टीम सज्ज आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
         गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन प्रस्तुत चंद्रकांत पवार दिग्दर्शित 'विठ्ठला शप्पथ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.








majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment