Wednesday, 19 April 2017

सयाजी शिंदे भ्रष्ट आमदाराच्या भूमिकेत !!

                  अलीकडे मराठी चित्रपटांतील कथांमध्ये आलेले वैविध्य हे कमालीचे लक्षणीय आहे. आजवर अनेक 
मराठी, हिंदी तसेच साऊथच्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने घराघरात पोहचलेले अष्टपैलू अभिनेते सयाजी शिंदे आगामी "शूर आम्ही सरदार" या चित्रपटात एका भ्रष्ट आमदाराची भूमिका साकारली आहे.  
दहशवादाविरोधात एकत्र आलेले हे तीन तरूण काय करतात, त्यांना दहशवादाविरोधात काम करण्यात यश येतं का या आशयसूत्रावर हा चित्रपट आधारित आहे. गणेश लोके यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, अभिनय व निर्मिती योग्यप्रकारे निभावली आहे. प्रकाश जाधव हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. इंडो ऑस एंटरटेन्मेंट, झुमका फिल्म्स, सासा प्रॉडक्शनच्या डॉ. प्रज्ञा दुगल, श्वेता देशपांडे आणि गणेश लोके यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात सयाजी शिंदे यांच्यासह शंतनू मोघे,संजय  मोने, भारत गणेशपुरे व गणेश लोके ह्यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत गणेश लोके यांनी जेव्हा मला या चित्रपटाची कथा ऐकवली त्यावेळी मी लगेच होकार दिला. एका भ्रष्ट आमदाराची भूमिका मी साकारली असून या भूमिकेला साजेशी विनोदी छटाही यात मी रंगवली आहे. ऑस्ट्रेलिया स्थित गणेश लोके यांचे देशावरील प्रेम आणि चित्रपट निर्मितीबाद्द्ल असलेले पॅशन कमालीचे असून येत्या २१ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment