मराठी स्टार आता हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकत आहे यात काही नवल नाही.. सुप्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर यांनी मराठी तसेच हिंदी मध्ये त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे."लई भारी ","खो -खो ",तसेच हिंदी मध्ये "बर्फी ","रॉकी हँडसम "," मदारी "यातल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतात... तसेच छोट्या पडद्यावरती त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या आहेत "जुळून येति रेशीमगाठी "यामधील बाबाजी ची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहते..

मालिका व चित्रपट यात काय फरक जाणवला हे विचारले असता ते म्हणतात " मला व्यक्तिशः मालिका आणि चित्रपट यात फार फरक जाणवत नाही, चित्रपटांच्या तुलनेत मालिकांमध्ये अधिक पैसे व प्रसिद्धी आहे,दोन्ही माध्यम वेगळी आहे चित्रीकरणाची पद्धत वेगळी आहे".
उदय टिकेकरांच्या हा प्रवास असाच सुरु राहूदे हि आमच्याकडून सदिच्छा....

