Tuesday, 31 January 2017

'रांजण' ह्या चित्रपटाचं ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला....ट्रेलर रिव्ह्यू वाचा येथे

             सर्व आतुरतेने वाट बघत असलेल्या 'रांजण' ह्या चित्रपटाचं ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. ह्या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत असताना दिसून येतंय. अजय गोगावले यांच्या आवाजातील लागीर झालं रं गाणं सध्या खूप गाजतंय. ट्रेलर बघता चित्रपटातील बऱ्याच नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. गौरी आणि यश ह्या लहान कलाकारांची मेहनत ट्रेलर पाहतां दिसून येते. तसेच भाऊ कदम,भारत गणेशपुरे,आणि विद्याधर जोशी हि स्टार मंडळी ह्या चित्रपटात झळकणार आहे. ह्या चित्रपटात शिवाजी महाराजांचे दर्शन देखील आपल्याला होणार आहे. चित्रपटात शिवाजी महाराजांचं जे ग्राफिक्स बनवले आहेत ज्या प्रकारे ऍनिमेशन झालं आहे ते खरंच वाखाण्याजोगं आहे.एक महत्वाची बाब म्हणजे अवधूत गुप्ते ह्यांच्या रांगड्या आवाजातून रंगलेलं लय वळवळतंय गाण्याचं हॉलिवूड च्या रिओ ह्या चित्रपटासोबत म्याशप खूप सुंदर पद्धतीने करण्यात आलं आहे.

       
             सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात शिवाजी महाराज कोणती भूमिका साकारणार आहे हा प्रश्न कुतुहूल वाढवणारा आहे. चित्रपटाचं नाव त्याच कथानक आणि चित्रपटातील बऱ्याच गोष्टी अजूनतरी गुलदस्त्यात आहेत. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मेजवानी असेल असं बोललं तर वावघ ठरणार नाही. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी खूप नवीन नवीन प्रयोग करून हा चित्रपट प्रेक्षकांमसमोर ठेवला आहे. येत्या १७ फेब्रुवारी २०१७ ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
              श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ‘रांजण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.  





majja.ooo : Ankita Lokhande.

Monday, 30 January 2017

चाहत्यांकडून होतेय फुगे चित्रपटाची प्रसिद्धी..

   खूप दिवस प्रेक्षकवर्ग आतुरतेने ज्या चित्रपटाची वाट बघत होता तो धम्माल विनोदी चित्रपट "फुगे" १० फेब्रुवारीला परीक्षकांच्या भेटीस येणार आहे.पार्टी दे हे मज्जेदार गाणंही सोशल मीडियावर जोरदार गाजत आहे.सुबोध आणि स्वप्नीलच्या चाहत्यांमध्ये ह्या चित्रपटाला घेऊन प्रचंड उत्साह असून त्यांनी त्यांच्या परीने फुगेचं प्रमोशन करायला सुरुवात केली आहे. मराठीचा रोमँटिक हिरो म्हणून आपण स्वप्नीलला ओळखतो त्याच्या काही महिला फॅन्स ने फुगे नावाची मेहेंदी आपल्या हातावर काढून प्रोमोशन केलं आहे. तर एकीने १० फेब्रुवारी 'फुगे' असे नाव कोरलेली संत्री बाजारात विकायला ठेवली आहेत. स्वप्नीलची फॅन असलेल्या एका शिक्षिकेने पार्टी दे ह्या गाण्यावर डान्स बसवून तो सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. याहून कमालीची बाब म्हणजे एका तरुणाने चक्क कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचा अभिषेक केला. याआधी कोणत्याही मराठी सिनेमाची इतकी प्रसिद्धी झालेली आठवत नाही.





            तगडी स्टार कास्ट जबरदस्त गाणी हटके कथानक हे सगळं आपल्याला फुगे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे शिवाय सुबोध आणि स्वप्नीलची एक वेगळीच भूमिका आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
          इंदर राज कपूर प्रस्तुत आणि  एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी निर्मित हा सिनेमा स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. फॅन्सच्या इतक्या प्रतिसादानंतर हा चित्रपट नक्की सुपरहिट होईल यात काही शंका नाही. मग पाहायला विसरू नका १० फेब्रुवारीला फुगे हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.




majja.ooo : Ankita Lokhande.

Sunday, 29 January 2017

दिल दोस्ती दोबारा...

  ज्या मालिकेची सर्व आतुरतेने वाट बघत होते त्या मालिकेचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आता पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी हे माजघर सज्ज झालं आहे. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो बाहेर आला आहे. प्रोमो बघता दिल दोस्ती दोबारा हि मालिका नवीन काहीतरी घेऊन येत आहे असं दिसतंय.  
                 माजघर परत एकदा येऊन त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शक अद्वैत दादरकर आहेत.गीतकार अभिषेक कणखर हे असून समीर साप्तीस्कर शीर्षकगीताच दिग्दर्शन करणार आहे.. सुदीप मोडक आणि अंबर हडप हे ह्या मालिकेची कथा पटकथा यांची धुरा सांभाळणार आहे.

       
      दोस्तांच्या दुनियादारीचा ढंग न्यारा, येत आहे एक फ्रेश मालिका 'दिल दोस्ती दोबारा'  १८ फेब्रुवारी पासून सोम-शनि रात्री १०:३० वाजता. पाहायला विसरू नका.



majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday, 28 January 2017

अष्टपैलू कलाकार...अशोक सराफ

             मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारे मराठमोळे अभिनेते म्हणजेच आपले सर्वांचे लाडके मामा अशोक सराफ.. अशोक मामा मूळ बेळगावचे त्यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. लहानपणापासूनच अभिनय आणि रंगभूमीची आवड असणाऱ्या मामांनी सन १९६० आंतर बँक एकांकिका स्पर्धेमध्ये नाटकात सहभाग घेऊन रसिकप्रेक्षकांची मन जिंकली आणि त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. त्यानंतरची ५ दशकं त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवली. त्यानंतर त्यांनी शिरवाळकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातून विदुषकाची भूमिका करून व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. गजानन  जहांगीरदार यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका साकारली. १९७१ पासूनचा हा प्रवास खरंच उल्लेखनीय आहे. नाटक,चित्रपट,हिंदी चित्रपट,किव्हा दूरचित्रवाणीच्या मालिका असो अशोक मामांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केलं आणि रसिकप्रेक्षकांची मनं काबीज केली. हा त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु असताना त्यांना साथ लाभली ती दिग्गज कलाकार दादा कोंडके यांची आणि याचं सहवासातून पांडू हवालदार हा सवोत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आणि याच चित्रपटाने महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार अशोक सराफ यांना मिळवून दिला. १९७७ ला आलेला राम राम गंगाराम या चित्रपटाने फिल्मफेअर चा पुरस्कार अशोक मामांना बहाल केला. अबोध,फुलवारी,येस्स बॉस,जागृती असे हिंदी चित्रपट करून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत मराठीचा झेंडा रोवला.

विनोदी भूमिकांमध्ये मामा आपल्या सर्वानाच माहित आहे परंतु गंभीर तसेच खलनायक असलेल्या भूमिकाहि ते चोख पार पडतात. माझी माणसं आणि आत्मविश्वास या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहाते. वजीर चित्रपटात राजकारणी व्यक्तिरेखा तसेच चौकटराजा मध्ये अतिशय भाबडी व्यक्तिरेखा साकारून ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ८० च्या दशकात त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांची साथ लाभली आणि या जोडीने मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी दिवस आणले. हि जोडी ज्या चित्रपटात असेल तो चित्रपट हिट होईलच यात काही शंकाच नव्हती. अशी हि बनवा बनवी,धुमधडाका,चंगू मंगू,एका पेक्षा एक,असे चित्रपट देऊन धम्माल उडवली.अशी हि बनवा बनवी ने अशोक सराफ यांना वेगळीच ओळख दिली. हिंदी मध्ये  करण अर्जुन,कोयला,जोडी नं १ यासारखे अनेक उल्लेखनीय चित्रपट केले. त्यांची नाट्यसृष्टीही बरीच गाजवली. नंतर निवेदिता सराफ यांच्यासारखी एक सच्ची जोडीदार त्यांना लाभली, निवेदिता सराफ यांनी अनेक अडचणीच्या काळात अशोक सराफ याना मोलाची साथ दिली. निवेदिता सराफ यांच्या सोबत त्यांनी निर्मिती संस्था चालू केली आणि या संस्थेच्या अंतर्गत त्यांनी अजून एका चित्रपटाची निर्मिती केली तो म्हणजे एक डाव धोबीपछाड़. हम पाच या मालिकेने ५ वर्ष रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवलं. रंजना सोबत अशोक सराफ यांनी बरेच गाजलेले चित्रपट केले. गोंधळात गोंधळ आणि गुपचूप गुपचूप या चित्रपटांनी अशोक मामांना फिल्मफेअर मिळवून दिला. शब्दांचे खेळ करून संवाद फेक करणे हि मामांची खासियत आहे. २१ शतकातही त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट केले आम्ही सातपुते,आयडियाची कल्पना,एकुलती एक,आंधळी कोशिंबीर, असे अनेक चित्रपट केले. अशोक मामांच्या या प्रवासात त्यांनी एकूण २२६ चित्रपट,६ नाटकं आणि १० मालिका करून रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली.अस्खलित विनोद करून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अशोक सराफ यांना majja.ooo तर्फे हार्दिक शुभेच्छा.





majja.ooo : Ankita Lokhande.

Friday, 27 January 2017

"माणूस एक माती" चित्रपटाचा फर्स्ट लुक

  "माणूस एक माती" चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नेहमी कॉमेडी भूमिकांमधून सर्वाना हसवणारा सिद्धार्थ जाधव ह्या चित्रपटात मात्र वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं पोस्टर बघता कथानक नक्की काय असेल ह्याचा अंदाज बांधता येत नाही. सिद्धार्थ जाधव सोबत या चित्रपटात गणेश यादव,स्वप्नील रसेकर,विलास उजवणे,रुचिता जाधव,हर्षा गुप्ते हि स्टार मंडळी झळकणार आहे. "माणूस एक माती".... कारण अजून बरंच काही करायचं आहे. या वाक्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाला घेऊन उत्साह निर्माण झाला आहे.



             शिवम सहेली परिवार प्रस्तुत शिवम एंटरटमेन्ट इंडिया लिमिटेड निर्मित "माणूस एक माती" या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सुरेश शंकर झाडे यांनी केलं आहे. हा जबरदस्त चित्रपट २४ मार्च पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.





majja.ooo : Ankita lokhande.

Wednesday, 25 January 2017

उमेश आणि तेजश्री एकत्र... कशासाठी..?

              सध्या एक नवीन जोडी आपल्याला बघायला भेटत आहे ती म्हणजे उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची.उमेश कामतने बरेच सुपरहिट चित्रपट देऊन रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नुकताच झालेला ती सध्या काय करते ह्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सिडणारी तेजश्री सर्वांच्याच लक्षात राहते.चित्रपट असो किव्हा एखादी मालिका हे दोघे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. उमेश कामत सध्या एका प्रोजेक्टसाठी वर्कशॉप घेत असून त्यांनी एक फोटो सोशल मीडिया वर टाकला होता या फोटोमध्ये तेजश्री प्रधान आणि सुश्रुत भागवत हे सुद्धा दिसून आलेत.


आता हि जोडी एकत्र कशासाठी आली आहे हे अजूनही उगढ झालेलं नाही. हि नवीन जोडी प्रेक्षकांसाठी एखादी मालिका घेऊन येतेय कि चित्रपट यासाठी थोडी वाट बघावी लागेल. आता हि जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल कि नाही हा येणारा त्यांचा प्रोजेक्टचं सांगेल.







majja.ooo : Ankita Lokhande.

Tuesday, 24 January 2017

तेजसच्या कॅलेंडरमधून सैनिकांना सलामी...

                  देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाची पर्वा न करता जवान आपलं रक्षण करत असतात. त्यांच्यासाठी काहीतरी करावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. ह्यावेळेस मराठी कलाकारांनी आपल्या जवानांना सलाम म्हणून एक कॅलेंडर फोटोशूट केलं आहे. तेजस नेरूरकर याने सैनिकांवर थिम घेऊन २०१७ साठी कॅलेंडर केलं आहे. तेजस नेरुरकर नेहमीच सेलिब्रिटींचे फोटोशूट करत असतो पण ह्यावेळेस त्याने काहीतरी हटके असे करून दाखवले आहे. आपल्या रक्षणकर्त्या सैनिकांना सलाम म्हणून काही तरी करणे आवश्यक आहे असं तेजसचं म्हणणं आहे. आणि त्याच्या ह्या कल्पनेसाठी त्याला पाठिंबा मिळाला तो मराठी कलाकारांचा . आपल्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून ह्या कलाकारांनी हे शूट केलं आहे आणि विशेष बाब म्हणजे ह्यासाठी कोणत्याच प्रकारचं मानधन स्वीकारण्यात आलेलं नाही. ह्या कार्यात उमेश कामत, प्रिया बापट,उर्मिला कोठारे,आदिनाथ कोठारे,सई ताम्हणकर,सुबोध भावे, पूजा सावंत ,वैभव तत्ववादी,जितेंद्र जोशी ,श्रिया पिळगावकर,नेहा पेंडसे,सिद्धार्थ जाधव ह्यांनी हातभार लावला.

               आपलं हे एक स्वप्न पूर्ण झालं असं तेजस म्हणतो. प्रत्येक सेलिब्रिटी ला आपल्या कॅमेरा मधून टिपणाऱ्या तेजसने आपल्या सैनिकांसाठी काहीतरी करावं हि भन्नाट कल्पना शोधून काढली. या उपक्रमातून मिळणारा निधी QMTI या संस्थेद्वारे सैनिकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. नवीन वर्षाची सुरवात हि एका चांगल्या कामासाठी होतेय. त्यासाठी तेजस नेरुरकरला majja.ooo तर्फे शुभेच्छा.







majja.ooo : Ankita Lokhande.