Monday, 10 April 2017

                मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा विविध स्तरावरील कलाकृतींचा आणि कलावंतांना गौरविणाऱ्या संस्कृती कलादर्पणचा नुकताच मोठ्या दिमाखात नाट्यसोहळा पार पडला. ८ ते १० एप्रिल दरम्यान माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात पार पडलेल्या या महोत्सवाची सांगता 'कोडमंत्र'' या नाटकाद्वारे झाली. तत्पूर्वी ८ एप्रिलला सुरु झालेल्या या नाट्यमहोत्सवाला उपस्थित असणा-या मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला होता. यंदाचे संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून, सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील नाट्यरसिकांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला. यावर्षीच्या १७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी नाट्यसोहळ्यात रेखा सहाय, प्रमोद पवार, सविता मालपेकर, प्राजक्ता कुलकर्णी, मिलिंद गवळी, उदय धुरन, सुप्रिया पाठारे, रमेश मोरे आणि संजिव देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते. यंदा नाट्यविभागातून अंतिम फेरीसाठी सात नाटकांची निवड झाली असून, यात साखर खाल्लेला माणूस (एकदंत निर्मित), कोडमंत्र (अनामिका निर्मित), ह्या गोजिरवाण्या घरात (वेद प्रॉडक्शन), छडा(अवनीश प्रॉडक्शन), यु टर्न २ (जिव्हाळा निर्मित), तीन पायांची शर्यत(सुयोग /झेलू निर्मित), के दिल अभी भरा नही (वेद प्रॉडक्शन)  या नाटकांचा समावेश आहे.  एकूण २४ नाटकांनी यात सहभाग घेतला होता. नाट्यपरिक्षण विभागातील कांचन अधिकारी, प्राजक्ता कुलकर्णी आणि प्रमोद पवार यांनी यंदाच्या नाट्यस्पर्धेच्या परिक्षणाची धुरा सांभाळली आहे.  
 
या महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक निवड झालेल्या कलाकृतीच्या कलाकार मंडळीसोबत अगदी माफक दरात नाटकांचे प्रयोग पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे यंदा प्रेक्षकांसाठी सेल्फी कॉर्नर ही स्पर्धादेखील राबविण्यात येत असून, यात विजेते ठरलेल्या निवडक प्रेक्षकांना ७ मे रोजी होणाऱ्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१७ च्या पुरस्कार सोहळ्याचे पास मिळणार आहे.  तसेच लवकरच चित्रपट विभागातील पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वोकृष्ट १० चित्रपटांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती संस्कृती कलादर्पण अध्यक्ष -संस्थापक चंद्रशेखर सांडवे आणि अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी दिली. 




Friday, 7 April 2017

"हुंटाश" एक नवीन मराठी चित्रपट

             मराठीत हल्ली उत्तम कथानक असलेले चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. त्या रांगेत अजून एक चित्रपट उभा राहतोय तो म्हणजे "हुंटाश"...चित्रपटाचं नाव हटके असलेल्या ह्या चित्रपटाचं कथानक देखील इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळं आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे चित्रपटातील स्टार कास्ट देखील खूप तगडी आहे. किशोर नांदलस्कर,विजय चव्हाण,अरुण नलावडे,उषा नाडकर्णी,संजिवनी जाधव,निला गोखले,अंकुश ठाकूर,प्रियांका पुलेकर हे कलाकार "हुंटाश" या चित्रपटात झळकणार आहेत.


            नक्षत्र मुव्हीज प्रस्तुत अच्युत नावलेकर आणि अपर्णा प्रमोद निर्मित अंकुश ठाकूर लिखित आणि दिग्दर्शित "हुंटाश" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या अजून बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत.



majja.ooo : Ankita Lokhanade.

Thursday, 6 April 2017

पियुष प्रथमच साकारणार खलनायकाची भूमिका..........

                  ती देते तो देतो सगळे देतात.... " शिव्या"... अगदी वेगळं कथानक आणि एका वेगळ्याच धाटणीवर आधारित असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संस्कृती आणि भूषण यांना आपण एकत्र काम करताना पहिलेच आहे. परंतु ह्या चित्रपटात प्रथमच पियुष रानडे हा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. आपण पियुष ला अनेक भूमिकांमध्ये पहिले आहे परंतु खलनायक म्हणून हि त्याची पहिलीच वेळ आहे. झी मराठी वरील लज्जा या मालिकेने तो महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. त्यानंतर झी मराठीवरील अस्मिता या गाजलेल्या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.


                  तो पहिल्यांदाच आपल्याला खलनायकाच्या भूमिकेत पाहायला भेटणार आहे. त्याची हि भूमिका प्रेक्षकांना किती आवडते हे शिव्या हा चित्रपट बघूनच कळेल. हा चित्रपट नक्कीच आपल्याला एक वेगळा अनुभव देऊन जाईल हे नक्की. मग पाहायला विसरू नका २१ एप्रिल रोजी शिव्या चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.







majja.ooo : Ankita Lokhande.

Wednesday, 5 April 2017

जय मल्हार मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप...

             "येळकोट येळकोट जय मल्हार" हा आवाज २ वर्षे झाले दर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता महाराष्ट्राच्या घराघरांतून ऐकू येतो. महाराष्ट्राच्या या कुलदैवताबद्दल बरीच माहिती ह्या मालिकेने प्रेक्षकांना मिळवून दिली. झी मराठीवरील हि मालिका खूप गाजली. हि मालिका १८ मे २०१४ ला सुरु झाली आणि ह्या मालिकेने बघता बघता ९०० एपिसोड पूर्ण केले. ह्या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकांना खर आणि जवळच वाटू लागलं. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी म्हणजे हि मालिका लवकरच संपुष्टात येत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हि मालिका बंद करण्याचा निर्णय ह्या मालिकेने घेतला आहे.


                    दिग्दर्शक महेश कोठारे देवदत्त नागे,सुरभी हांडे,इशा केसकर हि आणि अशी ह्या मालिकेतील निगडित बरीच मंडळी प्रेक्षकांच्या नंतरही लक्षात राहतील. ह्या मालिकेचं शेवटचं शूटिंग १५ एप्रिल ला होणार आहे. तोपर्यंत हि मालिका एन्जॉय करा आणि बघत राहा सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता जय मल्हार फक्त झी मराठीवर.





majja.ooo : Ankita Lokhande. 

Monday, 3 April 2017

‘शिव्या’ चित्रपटाचं म्युझिक लाँच!

                   'ती देते, तो देतो, ते देतात, सगळेच देतात शिव्या" शिव्या तुम्ही देता का.. ?  हटके नाव हटके कथानक आणि असे बरेच हटके प्रयोग घेऊन दिग्दर्शक साकार राऊत २१ एप्रिल रोजी शिव्या चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लाँच करण्यात आलं. चित्रपटाची स्टार कास्ट या कार्यक्रमाला हजर होती.

          निलेश लोटणकर यांनी ह्या चित्रपटाचं टायटल साँग लिहिले आहे आणि श्रीरंग उर्हेकर यांनी ते संगीत बद्ध केले असून गायक अनिरुद्ध जोशी ने हे गाणं गायलं आहे. चित्रपटात एकूण २ गाणी आहेत. संस्कृती बालगुडे आणि भूषण प्रधान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच पियुष रानडे देखील या चित्रपटात झळकणार आहेत यासोबतच विद्याधर जोशी, उदय सबनीस, शुभांगी लाटकर हे कलाकार देखील झळकणार आहे.
                 हा चित्रपट नक्कीच आपल्याला एक वेगळा अनुभव देऊन जाईल हे नक्की. मग पाहायला विसरू नका २१ एप्रिल रोजी शिव्या चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.
म्युझिक लाँच ची काही छायाचित्रे : 














majja.ooo : Ankita Lokhande.

'छोट्यांची अदाकारी... लै भारी'....लवकरचं

               कलर्स मराठी वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर या मालिकेचे दोन्ही पर्व बरेच गाजले. बहारदार लावण्या सादर करून अनेक नृत्यांगनांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. पहिले पर्व हे अभिनेत्रींचे होते आणि दुसरे पर्व हे आगामी लावण्यवतींसाठी होते आता हे तिसरे पर्व छोट्या कलाकारांसाठी असणार आहे. हे तिसरे पर्व घेऊन कलर्स मराठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १५ वर्षांच्या आतील मुलींसाठी हे पर्व असणार आहे. या मालिकेचं टिझर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.




'छोट्यांची अदाकारी... लै भारी' हि टॅग लाईन असलेल्या ढोलकीच्या तालावर चे हे पर्व देखील खूप गाजेल यात काहीच शंका नाही. ह्या नवीन पर्वासाठी ह्या छोट्या कलाकारांना खूप शुभेच्छा.




majja.ooo : Ankita Lokhande.

नेहाचे हटके फोटोशूट

नेहाचे 'रॉयल' फोटो शूट 


सौंदर्य आणि अभिनय क्षमतेच्या जोरावर मराठी सिनेजगतात आपली विशेष ओळख निर्माण करणारी नेहा महाजन या अभिनेत्रीने नुकताच एक हटके फोटोशुट केला आहे. गडद निळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेल्या फोटोशूटमध्ये नेहाचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार दिसत असून, नेहाचा हा 'रॉयल' लुक तिच्या चात्यांसाठी देखील विशेष ठरत आहे. आतापर्यत विविधांगी भूमिकेतून  लोकांसमोर आलेल्या नेहाचा या रॉयल फोटोशूटला सोशल साईटवर भरभरून प्रतिसाददेखील मिळत असल्याचे दिसून येत आहे. 






majja.ooo : Ankita Lokhande.