Monday, 6 February 2017

गौरीचं चित्रपट सृष्टीतील पदार्पण...

       मराठी चित्रपटसृष्टीत कोणीही गॉडफादर नसताना केवळ आपल्या टॅलेंटच्या जोरावर जिने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली ती अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे. मालिका ते चित्रपट ह्या प्रवासात गौरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
        भारतीय विद्यापीठ मुंबई मधून गौरीने तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. अभिनय आणि नृत्याची आवड गौरीला लहानपणापासून होती.  शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन तिने तिचा अभिनयाचा पाया मजबूत केला. बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊन आणि फक्त अभिनयाच्या जोरावर तिने या अभिनय क्षेत्रातील तिच्या वाटचालीला सुरुवात केली.
          अवघाचि संसार या मालिकेमधून गौरी नावारूपाला आली. त्या नंतर स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेत वैदेही ची भूमिका साकारून गौरी घराघरांत पोहोचली. या दोन मालिकेनंतर प्रेक्षकांनी गौरीला भरभरून प्रेम दिले आणि मग गौरीने कधी मागे वळून पहिले नाही.



            छोट्या पडद्यावरून गौरीने थेट रुपेरीपडद्यावर तिच्या अभिनयाची झलक दाखवली. स्वप्नील जोशी आणि सचित पाटील सोबत फ्रेंड्स हा पहिला मोठा मराठी चित्रपट गौरीच्या वाटेला आला. त्यानंतर कान्हा आणि फॅमिली कट्टा या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका करून गौरीने तिचे पाय या क्षेत्रात घट्ट रोवले.आता सध्या गौरी Absolute नावाचं एक करतेय. या नाटकाचे लेखक युगंधर देशपांडे असून दिग्दर्शक मंदार देशपांडे आहेत. गौरीने पहिल्यांदाच रंगभूमीवर प्रवेश केला आहे. यापुढेही नाटक करण्याची संधी आली तर मी आवडीने करेन असं ती म्हणते.
             आपल्या अभिनयासाठी ती माधुरी दीक्षित ला फॉलो करते. मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर ह्या तिच्या आवडत्या अभिनेत्री आहेत.एक महत्वाची गोष्ट म्हणजे गौरी रोज योगा करते. स्वतःला मेंटेन ठेवणं तिला आवडतं. विशेष म्हणजे ती तिच्या कामात इतकी परफेक्ट आहे कि ऍक्टिंग करताना गौरी रिटेक करत नाही.. आणि तिची हीच सवय सर्वाना खूप आवडते.. अश्याच विनम्र आणि मेहनती गौरी नलावडे ला तिच्या पुढच्या वाटचाली साठी majja.ooo तर्फे शुभेच्छा.





majja.ooo : Ankita Lokhande.

Sunday, 5 February 2017

नवीन प्रयोगांनी परिपूर्ण असा प्रेमाय नमः चित्रपट....

       हल्ली चित्रपट प्रदर्शनासाठी बरेच नवीन नवीन प्रयोग केले जातात.हटके कथानक सिनेमाची हटके नाव या सर्व बाबतीत आपल्याला नाविन्य बघायला मिळत.असाच एक नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे चित्रपटाचं नाव आहे प्रेमाय नमः.. प्रेमाची एक नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट असणार आहे. एका अनोख्या प्रेम कथेवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटात देवेंद्र आणि रुपाली हे नवीन फ्रेश चेहरे दिसणार आहे. ह्या चित्रपटाचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ट्रेलर बघता चित्रपटातील लोकेशन आणि ऍक्शन यावर बरीच मेहनत घेतली असल्याचे दिसून येते. ह्या संपूर्ण टीमने चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी बरेच नवीन आणि हटके प्रयोग केले आहेत.

   मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच एका संपूर्ण गाण्याची शूटिंग पाण्याखाली करण्यात आली असून ह्या चित्रपटाचे प्रमोशन मालवणी किनापट्टीवर समुद्रात स्कुबा डायविंगच्या माध्यमातून करण्यात आले. आणि महत्वाची बाब म्हणजे ह्या टीम अजून एक प्रयोग करून दाखवला आहे तो म्हणजे  हया टिमने मराठीत पहिल्यांदाच Google Play Android Game आणला आहे.आता हा गेम कसा असेल याची उत्सुकता तुमच्यासारखी आम्हालाही आहे.चित्रपटाचं इतकं हटके आणि जबरदस्त प्रमोशन अजूनतरी कोणी केलं नाही. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक जगदीश वाठारकर असून संगीतकार के.संदीप आणि चंद्रशेखर जनवाडे आहेत. तसेच धनाजी यमकर हे कॅमेरा मॅन आहेत. प्रेमाय नमः हा चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीला येणार आहे.तेव्हा हा चित्रपट पाहायला जरूर जा आणि चित्रपटात अजून काय काय प्रयोग केले आहेत त्याचा अनुभव घ्या.




majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday, 4 February 2017

ज्येष्ठ अभिनेते....सदाशिव अमरापूरकर

                 चित्रपटात खलनायकाची चोख भूमिका निभावणारे सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे  अमरापूरकर. ११ मे १९५० रोजी अहमदनगरच्या व्यवसाय करणाऱ्या ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. लहान पानापासून सदाशिव अमरापूरकर यांना तात्या या नावाने संबोधलं जायचं. शाळा कॉलेज पासूनच तात्यांना अभिनयाची आवड होती. पुणे युनिव्हर्सिटी मध्ये इतिहास या विषयात पदवी असताना रंगभूमीवरचं त्यांचं आकर्षण अनेकांनी पाहिलं. नगर कॉलेजमध्ये असताना  एकांकिका केल्या. पेटलेली अमावस्या या एकांकिकेमधला त्यांचा अभिनय  वाखाणण्याजोगा होता. याच काळात काका किशाचा, भटाला दिली ओसरी या नाटकांमधून रंगभूमीवर त्यांनी त्यांच्या अभिनयाचं दर्शन दिलं. त्यानंतर त्यांनी अल्टिमेट थिएटर आणि नाट्यपराग या संस्थेची स्थापना अहमदनगर  येथे केली.
     उपजत गुणवत्ता लाभलेला कलाकार रंगभूमीशी प्रामाणिक राहिला. १९८२-१९८२ याकाळात हँडसॅप नाटकात कमाल केली अविनाश मसुरकर आणि भक्ती बर्वे इनामदार यांच्या सोबत त्यांनी त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी केली. सुप्रसिद्ध कलाकार गोविंद निलानी हे सदाशिव अमरापूरकर यांच्या अभिनयाने इतके  प्रभावित झाले कि त्यांनी १९८३ साली अर्धसत्य साठी खलनायक म्हणून सदाशिव अमरापूरकर यांची निवड केली आणि फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. त्यानंतर   पुराना मंदिर,फरिश्ते,मोहरे,हुकूमत यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. खलनायक म्हणून त्यांची संवादफेक निराळी आणि लक्षवेधी होती. १९९१ मध्ये महेश भट्ट यांनी त्यांना महाराणी हि आव्हानात्मक भूमिका दिली आणि त्यांनी या भूमिकेला उत्तम न्याय दिला. याचवर्षापासून फिल्मफेअर हा पुरस्कार त्यांना बहाल  करण्यात आला. १९९० साली हि सहाय्यक कलाकाराच्या भूमिकाही सदाशिव अमरापूरकर यांनी साकारल्या. त्यांच्या  भूमिकाही लोकांच्या फारच पसंतीस पडल्या.
  आँखे,इष्क,कुली नं.१,गुप्त,आंटी नं.१,हम हे कमाल के,खुलामखुल्ला प्यार करेंगे या चित्रपटात विनोदी भूमिका केल्या. २००० नंतर हिंदी सिनेमांमध्ये क्वचित झळकू लागले. २०१३ मध्ये ४ शॉर्टसफिल्म्स असलेल्या bombay talkies या सिनेमामध्ये अभिनय केला. त्याचसोबत त्यांची मराठी सिनेसृष्टीची कारकीर्द वाखाणण्याजोगी होती. आमरस हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. २२ जुने १९९७,दोघी,खतरनाक या चित्रपटात विविध भूमिका साकारताना दिसले. तहान,वास्तुपुरुष,सावरखेड एक गाव या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विविध प्रकारच्या होत्या. जिंदगी आणि भारत एक खोज या टी.व्ही मालिका मधून देखील त्यांनी अभिनय केला. १९७३ साली माध्यमिक शिक्षण घेताना जिच्यावर प्रेम जडलं सुनंदा करमरकर हिच्याशी विवाह केला. अमरापूरकरांची मुलगी हिंदी मराठी मध्ये दिग्दर्शिका म्हणून कार्यरत आहे. सदाशिव अमरापूरकर यांनी हिंदी,मराठी,बंगाली,ओरिया,हरियाणवी अश्या विविवध भाषांमध्ये एकूण ३०० हुन अधिक चित्रपट केले.


अभिनय क्षमता दर्शवणारा हा कलाकार सामाजिक जाणीव जपणारा होता. अंधश्रद्धा निर्मूलन समिती,स्नेहालय या संस्था मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. वयाच्या ६४ वर्षी ३ नोव्हेंबर २०१४ मध्ये पहाटे पाऊणे तीनच्या सुमारास या कलाकाराने शेवटचा श्वास घेतला. या चतुरस्थ आणि हुरहुन्नरी अभिनेत्याला majja.ooo चा सलाम.      





majja.ooo : Ankita Lokhande.

Friday, 3 February 2017

निलेश साबळेंच्या जागेवर आता प्रियदर्शन जाधव...

         कसे आहात मंडळी हसताय ना ? हा आवाज कानावर पडला कि नकळत चेहऱ्यावर हसू उमटतं. हाच प्रश्न विचारणारा महाराष्ट्राचा लाडका निलेश साबळे आता काही दिवसांपुरती आपल्याला चला हवा येऊ द्या मध्ये दिसणार नाही. गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणाऱ्या आणि हि टीम एकत्र बांधून ठेवण्याचं काम निलेशने अगदी चोख पार पाडलं आहे. दिग्दर्शन,अभिनय आणि लेखन ह्या सर्व बाबतीत अग्रेसर असलेल्या निलेशने महाराष्ट्राला मनोरंजनाचा एक मज्जेदार कार्यक्रम दिला. सोमवार मंगळवार ९;३० ते १०;३० या मंडळींनी आपल्याला खूप हसवलं,पोस्टमन काकांच्या पत्रांनी रडवलं कधी समाजाची जाणीव करून दिली असा परिपूर्ण असलेला कार्यक्रमाची धुरा निलेश साबळे याने सांभाळली आहे.
         मराठीच नाहीतर बॉलीवूड चे कलाकार हि चला हवा येऊ द्या मध्ये आवर्जून येतात.झी वाहिनीचा चेहरा बनलेला डॉ निलेश साबळे प्रकृती अस्वस्थ्यामुळे काही आठवडे विश्रांती घेणार आहे. पण तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही निलेश साबळे नाही तोपर्यंत आपल्या सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच प्रियदर्शन जाधव सूत्रसंचालनाची सूत्रे सांभाळणार आहे.

           हे सर्व करत असताना मागच्या काही दिवसांपासून निलेशला प्रकृती अस्वस्थ्याचा त्रास जाणवत होता. यामुळेच निलेशने वैद्यकीय सल्यानुसार काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही विश्रांती थोड्याच दिवसांची असून लवकरच तो या कार्यक्रमात पुन्हा हजेरी लावेल.




majja.ooo : Ankita Lokhande.

बघतोस काय मुजरा कर...

        महाराष्ट्राचं वैभव म्हणून ज्यांचा सर्वप्रथम उल्लेख होतो ते म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले. महाराष्ट्रातील किल्ले जपण्यासाठी बरेच जण भाषणं ठोकतात आपल्या आपल्या परीने मिरवणुका काढतात परंतु होत मात्र काहीच नाही. ह्या किल्ल्यावर आजही दारू पिऊन नाचणे,कचरा करणे आणि गडाच्या भितींवर लिहिणाऱ्यांची संख्या कमी नाही. हाच नाजूक विषय अगदी सोप्प्या शब्दात आणि योग्य पद्धतीने मांडून दाखवला आहे बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाने.
          चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं या चित्रपटाचं कथानक आहे. प्रथमच हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.जितेंद्र जोशी,अक्षय टंकसाळे आणि अनिकेत विश्वासराव यांनी आपल्या भूमिका खूप सुरेख उभ्या केल्या आहेत. अनिकेत विश्वासराव याने आवाज बदलून त्याच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. नेहा जोशी,रसिका सुनील आणि पर्ण पेठे यांची भूमिका हि चित्रपटानंतर लक्षात राहते. त्यासोबतच आनंद जोग आणि विक्रम गोखले यांची भूमिका देखील लक्षात राहण्यासारखी आहे. श्रेयस तळपदे आणि सोनाली कुलकर्णी यांची एन्ट्री देखील चित्रपटाला एक वेगळं वळण देते.सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटात बऱ्यापैकी विनोद निर्मिती होताना देखील दिसते.

         चित्रपटाची गाणी तितकीशी मनात उतरत नाही. काही गाण्याची गरज नसताना देखील ती चित्रपटात दाखवली गेली आहे. 'घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास तुझ्या गडांची ही व्यथा आता राजा, कळू दे साऱ्या जगास ' हे शब्द अगदी अंगावर काटा आणून सोडतात. हे गड आणि किल्ले यांचे खूप सुंदर चित्रीकरण ह्या चित्रपटात केले आहे. सामाजिक माणसांना भेडसावणारे प्रश्न त्यांच्याकडून नकळत होणाऱ्या चुका ह्या सर्वांचं उत्तर म्हणजे बघतोस काय मुजरा कर हा चित्रपट. तुम्हाला वेळ असेल तेव्हा हा चित्रपट एकदा जरूर पहा आणि स्वतःच्या फायद्यासाठी शिवाजी महाराजांचे नाव कोणाला वापरू देऊ नका. बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाला majja.ooo कढून ३ स्टार्स.



majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday, 2 February 2017

दोन विनोदवीरांसोबत झळकणार एक खलनायक...

                 रांजण या चित्रपटाची सगळीकडे प्रसिद्धी होताना आपण बघतंच आहोत. चित्रपटाची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. लगीर झाल रं आणि लय वळवळतंय या गाण्यांना प्रचंड मिळत आहे . तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची सर्वानाच उत्सुकता आहे. या चित्रपटात तीन ओळखीचे चेहरे पाहायला मिळतात ते म्हणजे विद्याधर जोशी,भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे.दोन विनोदवीरांसोबत एक खलनायक रांजण या चित्रपटात झळकणार आहे.विद्याधर जोशी ह्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.भाऊ कदम,भारत गणेशपुरे हे कलाकार नेहमीप्रमाणे प्रेक्षकांना हसवण्याची धुरा सांभाळणार असे दिसून येतंय.

                  सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा हा चित्रपट विनोदी पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा करणार आहे. चित्रपटाचं कथानक कुतुहूल वाढवणारं आहे.चित्रपटाचं दिग्दर्शन हे अतिशय उत्तम पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ‘रांजण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.




majja.ooo : Ankita Lokhande.

रिचा अग्निहोत्री सध्या काय करते...?

                आपल्या नृत्याच्या जोरावर घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे नृत्यांगना रिचा अग्निहोत्री. अवघ्या १९ व्या वयात रिचाने तिच्या मेहनतीने बरंच यश संपादन केलं आहे.    
                 नृत्याचं प्रचंड वेड असलेल्या रिचाने वयाच्या पाचव्या वर्षा पासून कथ्थक शिकायला सुरुवात केली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर ती कथ्थक विशारद झाली आहे. तिची आई वैष्णवी अग्निहोत्री ह्या तिच्या पहिल्या गुरु आहेत असं ती म्हणते. त्यानंतर तिची पुढची वाटचाल गुरु सौ. मंजिरी श्रीराम देव यांच्या मार्गदर्शनाने झाली. कथ्थक सोबतच लावणी,हिप-हॉप,बेली सालसा,बॉलीवूड आणि अश्या बऱ्याच प्रकारचे डान्स रिचा अगदी सहज करते.
                २०१४च्या महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं तिने पारितोषिक मिळवले. 'फेस ऑफ कलर्स मराठी' हा किताब देखील तिने तिच्या नावावर केला आहे. 'ढोलकीच्या तालावर' या गाजलेल्या डान्स शो मध्ये रिचाने टॉप ५ स्पर्धकांमध्ये जागा पटकावली. इतकच नाहीतर अमिताभ बच्चन ह्यांना  ट्रिब्युट म्हणून आयोजित केलेल्या कार्यक्रमात रिचाने आपल्या नृत्याने सर्वांची मनं जिंकली.


           एवढ्यावरच रिचा थांबली नाही तिने दाक्षिणात्य डान्स शो किक मध्येही मराठीचा झेंडा रोवला आहे. तिथेही ती टॉप ५ स्पर्धकांमध्ये होती. रुचिता राम आणि शिवराज कुमार हे मान्यवर ह्या शो चे परीक्षक होते. नृत्यासोबत रिचाला अभिनयाची देखील आवड आहे. तिने अभिनेत्री म्हणून काम केलेली डॉक्युमेंट्री दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी पाठवण्यात आली होती. लवकरच रिचा आपल्याला नवीन चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. भविष्यात तिला अभिनय करायला आवडेल असं ती म्हणाली. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या रिचाला majja.ooo तर्फे पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.






majja.ooo :Ankita Lokhande.