Saturday, 21 January 2017

प्रतिभावंत अभिनेत्री.... स्मिता पाटील

                  चित्रपट,दूरचित्रवाणी किव्हा नाटक या सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुणे येथे झाला. वडील शिवाजीराव पाटील मंत्री आणि आई विद्याताई पाटील समाजसेविका ह्या अश्या घराण्यात स्मिता पाटील यांचा जन्म झाला. त्यांच्या शालेय शिक्षणानंतर त्यांनी अभिनयासाठी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थान मध्ये प्रवेश घेतला. स्मिता पाटील यांचा पहिल्यांदा संबंध आला तो दूरदर्शन वाहिनी वरील वृत्तनिवेदिका म्हणून. स्मिता पाटील यांचा चेहरा खूपच फोटोजेनिक होता त्यामुळे त्यांच्यावर नजर पडली ती दूरदर्शन वाहिनीचे मुख्य श्री. कृष्ण मूर्ती यांची आणि स्मिता पाटील यांची  हिंदी वृत्तनिवेदिका म्हणून वर्णी लागली.नंतर दिग्दर्शक श्याम बेनेगर ह्यांनी स्मिता पाटील ला त्यांच्या चित्रपटात काम करायची संधी दिली आणि १९७० च्या दशकात स्मिता ह्यांच्या कारकिर्दीची उड्डाण घेतली. चरणदास चोर,निशांत ह्या सारख्या चित्रपटातुन त्यांनी छोट्यामोठ्या भूमिका केल्या नंतर त्यांना मुख्य नाटिका म्हणून  चित्रपटात काम करायची संधी मिळाली. मंथन या चित्रपटात साकारलेली तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि अखेर स्मिता पाटील ह्या स्पॉटलाईट मध्ये आल्या. भारतीय अभिनेत्री हौसा वाडकर ह्यांच्या कल्पित आत्मचरित्रावर आधारित भूमिकेने स्मिता पाटील ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आणि तो चित्रपट होता १९७७ चा भूमिका हा चित्रपट. स्मिता पाटील ह्यांनी त्यांच्या अभिनयाच्या या प्रवासात बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. सद्गती,चिदंबरम ह्या सारख्या चित्रपटातील भूमिकेने त्यांच्या अभिनयाला एक उंची मिळवून दिली.


प्रत्येक भूमिकेमध्ये त्या स्वतःला समर्पित करायच्या प्रत्येक भूमिकेमध्ये स्वतःला वाहून घेण्याची त्यांची क्षमता त्यांना नैसर्गिकच होती. त्यांनी मराठी नव्हे तर बंगाली आणि गुजराती ह्या भाषेच्या चित्रपटातून देखील काम केलं. त्यांची प्रत्येक भूमिका हि लक्षात ठेवण्यासारखी होती. जब्बार पटेल ह्यांच्या जैत रे जैत या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नायिका का पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं असून ह्या चित्रपटाची गाणीही खूप लोकप्रिय झाली. समाजाबद्दल काहीतरी करून दाखवायची जिद्द ती तळमळ असणारी भूमिका त्यांनी उंबरठा ह्या चित्रपटात खूब गाजवली. त्यांच्या अभिनयाची ताकद हेच त्यांच्या अभिनयाची ओळख बनली. अक्लेर संधानी ह्यांच्या बंगाली चित्रपटातील त्यांची भूमिका आणि अभिनय कमालीचा ठरला. केतन मेहता दिग्दर्शित भवानी भवाई ह्या गुजराती चित्रपटासाठी देखील त्यांची नेमणूक झाली. चक्र या भूमिकेच्या वेळेत भूमिकेला वाव देण्यासाठी स्मिता पाटील ह्यांनी मुंबईमधील सर्व झोपडपट्टी वस्तीना भेट दिली आणि तिथलं निरीक्षण आपल्या अभिनयातून व्यक्त केलं आणि परिणाम असा झाला कि पुन्हा एकदा राष्ट्रीय पदकावर त्यांनी आपली मोहोर उमटवली. १९८० च्या काळात प्रत्येक निर्माता दिग्दर्शन त्यांना आपल्या चित्रपटात घेऊ पाहत होता. अमिताभ सोबतच्या नामक हलाल मधील आज लपट जाये तो ह्या गाण्यामध्ये त्यांचा वेगळा अंदाज पाहायला भेटला. रमेश सिप्पी दिग्दर्शित ह्यांच्या शक्ती ह्या चित्रपटात त्यांनी अमिताभ सोबत काम केलं. राजेश खन्ना ह्यांच्या आखिर क्यू,अमृत,नजराणा हे चित्रपट देखील त्यांच्या वाटेला आले. अर्ध सत्य,आज कि आवाज,गुलामी ह्यांसारख्या चित्रपटात त्यांनी साहायक नायिका म्हणून भूमिका साकारली. मंडी आणि सुबह यांसारख्या वास्तववादी चित्रपटात देखील तिने काम केलं. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ उतार येत असतात आणि प्रेम कलाकार त्यांना सामोरे जातो असच काहीतरी झालं स्मिता पाटील ह्यांच्या आयुष्यात. त्यांनी विवाहित असलेल्या राज बब्बर ह्यांच्याशी लग्न केलं तरीही त्या केतन मेहता ह्यांच्या मिर्च मसाला ह्या चित्रपटात झळकल्या पण तो चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच स्मिता पाटील ह्यांना हे जग सोडावं लागलं. १३ डिसेंबर १९८६ ला अकाली मृत्यू झाला.त्यांची चित्रपटाची कारकीर्द हि कमी काळाची ठरली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकूण ८० चित्रपट केले. १९८५ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील नावाजण्यात आलं. चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या चैतन्यशाली व्यक्तिमत्वाला  majja.ooo कडून मानाचा मुजरा.





majja.ooo : Ankita Lokhande.

Wednesday, 18 January 2017

प्रियांका चोप्राचा नवीन मराठी चित्रपट...

             २०१६ च्या व्हेंटिलेटर या हिट चित्रपटानंतर प्रियांका चोप्रा २०१७ मध्ये अजून एक धमाकेदार चित्रपट घेऊन येत आहे. ह्या चित्रपटाचं नाव आहे "काय रे रास्कला "... चित्रपटाचं नाव बघता या चित्रपटाला साऊथ चा टच असेल का असा अंदाज बांधता येतो. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. बॉलीवूड,हॉलिवूड आणि आता मराठी मधला दुसरा चित्रपट प्रियांका तिच्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहे. चित्रपटाचं नाव बघता कथानक काय असेल याचे कुतुहूल वाढते.



                     बाप आणि मुलाच्या नात्याला हळुवार स्पर्श करणारा व्हेंटिलेटर हा चित्रपट बराच गाजला त्यालाच लक्षात घेऊन आता प्रियांका दुसरा चित्रपटाची निर्मिती करत आहे. पर्पल पेबेल पिक्चर्स प्रस्तुत "काय रे रास्कला" ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरिधरण स्वामी हे असून गौरव घाटणेकर आणि अजून बहुचर्चित स्टार मंडळी या चित्रपटात झळकणार आहे.प्रियांकाच्या या नवीन प्रयोगसाठी शुभेच्छा.






majja.ooo : Ankita Lokhande.

रांजण चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज...

                 ज्या चित्रपटाची प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट बघत आहे  तो रांजण चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या १७ फेब्रुवारी २०१७ ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजय गोगावलेच्या आवाजाने रंगलेलं लागीर झालं रं गाणं सोशल मीडियावर प्रचंड उत्साहात गाजतंय. मराठीमध्ये प्रेम,मैत्री,समाज या विषयांवर नेहमीच चित्रपट येतात परंतु रांजण हा चित्रपट या तिन्ही घटकांनी परिपूर्ण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. चित्रपटामध्ये दिसणारी यश आणि गौरी यांची फ्रेश जोडी देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

                 हा चित्रपट सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा असणार आहे. लहान वयातील प्रेम आणि ह्याच प्रेमातून सामाजिक संदेश या चित्रपटात देण्यात आला आहे. चित्रपटाचं कथानक कुतुहूल वाढवणारं आहे.चित्रपटाचं दिग्दर्शन हे अतिशय उत्तम पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. लहान कलाकारांचा अभिनय नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही. चित्रपटाची इतर गाणी अजूनतरी गुलदस्त्यात आहेत हि इतर गाणीही तितकीच जबरदस्त असतील आणि रांजण चित्रपटाचा स्थर अजून उंचावेल अशी आशा.
                . श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ‘रांजण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.






majja.ooo : Ankita Lokhande.

Tuesday, 17 January 2017

प्रियदर्शन जाधव आणि सोनाली कुलकर्णी एकत्र...

                     सध्या मराठी मध्ये प्रत्येकवेळी नविन विषय घेऊन चित्रपट निर्माण करता येतात. नवीन विषय नवीन जोडी असं काही असलं कि चित्रपटाला हमखास प्रेक्षकांचा प्रतिसाद भेटतो. आता असाच एक चित्रपट घेऊन दिग्दर्शक प्रकाश कुंटे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. & जरा हटके,कॉफी आणि बरंच काही ह्या चित्रपटांमध्ये वेगळे विषय दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी सहज मांडले आहेत. आता या नवीन चित्रपटात कोणता नवीन विषय आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. या चित्रपटाची जोडी देखील एकदम फ्रेश आणि नवीन असणार आहे. प्रियदर्शन जाधव आणि नटरंग फेम सोनाली कुलकर्णी या चित्रपटात झळकणार आहे.


तसेच छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी जोडी ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी देखील दिसणार आहे. सोनाली आणि प्रियदर्शन जाधव हि जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचं शूटिंग कर्नाटक येथील हंपी येते करण्यात आले आहे. नवीन लोकेशन नवीन जोडी नवीन विषय हे सर्व एकाच चित्रपटात आपल्याला बघायला भेटणार आहे.रोमँटिक कॉमेडी असणाऱ्या ह्या चित्रपटाचं नाव देखील गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या अधिक माहितीसाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल.  




majja.ooo : Ankita Lokhande.

Monday, 16 January 2017

पुष्कर श्रोत्री वळणार आता दिग्दर्शनाकडे....

                   मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बहुरूपी अभिनेता म्हणून ओळखला जाणारा कलाकार म्हणजे पुष्कर श्रोत्री. त्यांचा अभिनय आपण बऱ्याच चित्रपटांमधून बघत आलो आहोत. मराठीमध्ये तर त्यांनी अभिनयाचे कौशल्य दाखवलेच आहे त्यासोबत हिंदी मध्येही त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे.  त्यांच्या हजरजबाबी पणा आणि विनोदाच्या परफेक्ट टायमिंग साठी ते ओळखले जातात. आपल्याला ते अभिनेता म्हणून तर परिचित आहेतच परंतु आता त्यांनी दिग्दर्शनाचा विडा  उचलला आहे. त्यांचा पहिला दिग्दर्शित केलेला चित्रपट 'उबंटू' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


ह्या चित्रपटाचं नाव जरा हटके असून ह्याच कथानक नक्की काय असेल हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. चित्रपटाचा पोस्टर बघता लहानमुलांच्या शालेय आयुष्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल अशी आशा व्यक्त करता येते. ह्या चित्रपटाचं लेखन,दिग्दर्शन आणि निर्मिती पुष्कर श्रोत्री याने केली आहे.

 १४ जानेवारी ला हा चित्रपट सांगली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला प्रदर्शित करण्यात आला त्यानंतर १५ जानेवारीला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला प्रदर्शित करण्यात आला होता... ह्या चित्रपटाच्या अधिक माहितीसाठी आपल्याला अजून थोडी वाट बघावी लागेल.




majja.ooo : Ankita Lokhande.

Sunday, 15 January 2017

'मांजा' चित्रपटाचं टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला...

‘मांजा’ हा आगळावेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचं नाव जरा वेगळं असल्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष याकडे वेधलं जात आहे. नुकतंच रिलीझ झालेल्या टिझर पोस्टरमुळे प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद ह्या चित्रपटाला मिळत आहे. अश्विनी भावे ह्या  चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी एक वेगळा मराठी चित्रपट त्या लवकरच घेऊन येत आहे.
                   हा सिनेमा २१ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नवीन वर्षाची सुरवात अश्विनी भावेंच्या मांजा या  चित्रपटाने खूप जोरदार होणार आहे.


'इंडिया स्टोरीज' निर्मित मांजा या चित्रपटाची निर्मिती त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या निर्मात्यांनी केली आहे.‘मांजा’ चित्रपटाची कथा, पटकथा, आणि दिग्दर्शन हे जतिन वागळे यांनी केलं आहे. अश्विनी भावे सोबत या चित्रपटात रोहित फाळके आणि सुमेध मुद्गलकर झळकणार आहे.
                  चित्रपटाची बरीच माहिती सध्या गुलदस्त्यात आहे.




majja.ooo : Ankita Lokhande.




Saturday, 14 January 2017

एक अष्टपैलू अभिनेता...सचिन पिळगावकर

                     सचिन पिळगावकर एक असा अभिनेता ज्याने मराठी चित्रपटसृष्टीचा मान त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आणखी उंचावला.  सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ ला मुंबई मध्येच झाला. आपल्या आयुष्यातील ५० वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीला अर्पण केली.  मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी दिवस आणणारा असा कलाकार आहे ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांना चांगले दिवस आणले. अवघ्या ४ वर्षापासून सचिन अभिनय करत आहे ४ वर्षाच्या वयात त्याने १९६२ साली हा माझा मार्ग एकला ह्या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केलं. ह्या चित्रपटातील अभिनयाने चित्रपटातील त्याच्या ह्या प्रवासाला उंची गाठून दिली. ह्या भूमिकेसाठी सचिनला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर १९६७ चा सचिनचा पहिला चित्रपट म्हणजे मंजली दीदी हा होता. ह्या चित्रपटामध्ये धर्मेंद्र आणि मीनाकुमारी ह्यांची प्रमुख भूमिका होती. ऋषिकेश जोशीने दिलेल्या संधीच सचिनने सोनं केलं आणि सचिनचं नशीब त्याच्या अभिनयासारखं उजळू लागलं. ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी ह्यांच्या सहवासात सचिन हिंदी आणि उर्दू शिकले. सचिन पिळगावकर यांनी जवळपास ६५ चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. देवानंद च्या ज्वेल थेफ,प्रेम पुजारी या चित्रपटात तसेच संजीव कपूरच्या चंदा और बिजली फिरोज खान यांच्या मेला आणि शम्मी कपूरच्या ब्रह्मचारी या चित्रपटात सचिन पिळगावकर झळकले.
                 श्री कृष्णा लीला या चित्रपटातील कृष्णाची त्यांची भूमिका  विशेष लक्षात राहते. राजश्री प्रोडक्शन च्या गीत गाता चल ह्या चित्रपटाने बॉलीवूड ला एक नवीन चेहरा दिला. प्रमुख नायक म्हणून सचिन सर्व चित्रपटात गाजत होता. मराठी आणि हिंदी भाषेवर त्याच प्रभुत्व तर होतच त्या सोबत त्यांनी भिजपुरी भाषेचा हि अभ्यास केला. तसेच सचिन ने सहाय्यक अभिनेता म्हणून देखील बऱ्याच चित्रपटात काम केलं. १९७५ च्या  शोले या गाजलेल्या चित्रपटासाठी सचिन ने अहमद ची छोटी तरीही महत्वपूर्ण भूमिका केली. अवतार,सूर सरगम,सत्ते पे सत्ता,जुदाई,राम तेरे कितने नाम असे अनेक चित्रपट सचिन ने केले.


                मराठी मध्ये सचिन ने अष्टविनायक हा चित्रपट केला. आणि तो बराच गाजला. मायबाप हा त्याचा मराठी मध्ये दिग्दर्शन केलेला पहिलाच चित्रपट होता. १९८४ साली आणखी एक सिनेमा आला तो म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला. ह्या चित्रपटामुळे सुप्रिया सचिन ची एक जोडी प्रेक्षकांना भेटली.आणि हि जोडी अवघ्या काही दिवसातच लोकप्रिय झाली. हि जोडी १९८५ मध्ये विवाहबंधनात अडकली. आणि ह्या जोडीने मराठी प्रेक्षकांना अनेक गाजलेले चित्रपट दिले. माझा पती करोडपती,नवरा माझा नवसाचा,आम्ही सातपुते असे अनेक चित्रपट करून सचिन पिळगावकर ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. १९८८ मध्ये आलेला अशी हि बनवाबनवी हा चित्रपट जबरदस्त गाजला. ह्या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला विनोदी तसेच कलाकारांनी परिपूर्ण असा एक सिनेमा दिला. सचिन पिळगावकर हे अभिनेता गायक पटकथाकार दिग्दर्शक निर्माता अश्या अनेक भूमिकांमधून नावारूपाला आले. त्यांनी त्यांच्या बऱ्याच चित्रपटांसाठी पार्शवगायन केले. तसेच छोट्या पडद्यावरील मालिकेसाठी देखील पार्शवगायन केले. तसेच दिग्दर्शक म्हणून त्यांची तू तू मैं मैं हि मालिका बरेच वर्ष गाजली. चलती का नाम अंताक्षरी या मालिकेचे त्यांनी सूत्रसंचालन केले. एका पेक्षा एक या डान्सिंग रिऍलिटी शो ची निर्मिती करून महागुरू नावारूपाला आले. आपल्या अभिनयाची ५० वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी ऑटोबाओग्राफी लिहिली. हाच माझा मार्ग.
                 आत्मविश्वासाच्या  जोरावर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवली त्या अष्टपैलू कलाकाराला majja.ooo तर्फे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.





majja.ooo : Ankita Lokhande.