Friday, 13 January 2017

'लागीर झालं रं'...संपूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

                      रांजण ह्या चित्रपटातील अजय गोगावलेच्या आवाजाने रंगलेलं 'लागीर झालं रं' हे गाणं सध्या सोशल मीडियावर भरपूर गाजतंय. प्रेक्षकांची आतुरता आता संपली असून 'लागीर झालं रं' हे पूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. चित्रपटाचं नाव तसं हटके आहे त्यामुळे या चित्रपटासाठी सगळेच फार उत्सुक आहे.
                       पूर्ण गाणं बघता ह्या चित्रपटाचं नक्की कथानक काय असेल हा प्रश्न पडतो.एका बाजूला चार मित्र,त्यांची धम्माल आणि दुसऱ्या बाजूला एक लहानवयातील प्रेम सर्वच अगदी नवीन आणि जरा वेगळं पाहायला भेटतं आहे. नक्की चित्रपटाचं कथानक मैत्रीवर आहे कि प्रेमावर हा प्रश्न विचार करायला भाग पाडतो. नेमके लोकेशन घेऊन दिग्दर्शकाने गाणं शूट केलं आहे. हे लोकेशन अगदी प्रसन्न आणि खरे वाटतात.


                        महागणपती एंटरटेनमेंट प्रस्तुत रवींद्र कैलास हरपळे निर्मित प्रकाश जनार्धन पवार लिखित आणि दिग्दर्शित 'रांजण' या चित्रपटाची इतर गाणी सध्या गुलदस्त्यात आहेत आणि इतर गाणी  'लागीर झालं रं' गाण्यासारखी हिट असतील आणि प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की उतरतील.








majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday, 12 January 2017

मराठी चित्रपट हिरो मधील नवीन हिंदी मराठी फ्युजन सॉन्ग..

               मराठी मध्ये अश्या मोजक्याच अभिनेत्री आहेत ज्या अभिनयासोबत उत्तम डान्स करतात त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे दीपाली सैयद. हिरो हा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ह्या चित्रपटातील एका हिंदी मराठी फ्युजन सॉन्ग साठी दिपाली सैयद आणि शास्त्रीय नृत्यांगना सुखदा खांडकेकर हि जोडी एकत्र थिरकणार आहे.
                          धिनक धिन आग लगा दु में.. ग बाई माझा तोरा नखरेल असे ह्या गाण्याचे बोल असून सर्वांच्या आवडत्या गोड गळ्याच्या गायिका आशा भोसले आणि साधना सरगम ह्यांच्या आवाजातून हे गाणं सजलं आहे. हे फ्युजन गाणं अस्लम सयानी आणि कौस्तुभ पंत यांनी लिहिले असून राजा अली यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध नृत्यांगना फुलवा खामकर यांनी ह्या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. हिरो चित्रपटासाठीचं हे गाणं  असेल आणि  पसंतीस उतरेल.



                           हिरो चित्रपटाची स्टार स्टार कास्ट देखील जबरदस्त आहे. रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, सुखद खांडकेकर, भूषण पाटील,वैष्णवी करमरकर हे स्टार ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
                            R.P.G प्रोडक्शन प्रस्तुत राजश्री गायकवाड निर्मित अनिस मोरब सह-निर्मित हिरो हा चित्रपट N.N. Siddhiqui  ह्यांनी दिग्दर्शित केला आहे.




majja.ooo : Ankita Lokhande.

Wednesday, 11 January 2017

अखेर 'फुगे' प्रदर्शनासाठी सज्ज.....

                     नवीन कोरा मराठी चित्रपट फुगे सध्या सोशल मीडिया बराच गाजत आहे.ज्या चित्रपटाची सर्व आतुरतेने वाट पाहत होते तो चित्रपट फुगे आता प्रदर्शनाला सज्ज झालाय. चित्रपटातील बरीच गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहेत. पार्टी दे गाण्याने तर लोकांना वेड लावून सोडलं आहे. येत्या १० फेब्रुवारी २०१७ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी तसेच सुबोध भावे यांची जोडी प्रथमच आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच प्रार्थना बेहरे आणि निथा शेट्टी देखील झळकणार आहे.
                  या चित्रपटाचे अजून एक वैशिट्य म्हणजे सुबोध भावे यांचा मुलगा मल्हार या चित्रपटात सुबोधच्या लहानपणीची भूमिका स्वीकारताना दिसणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय जिथे बाप लेकाची जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. फुगे या ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं आहे.तसेच ह्या चित्रपटाचे निर्माते अश्विन अंचंन असून सह निर्माते अनुराधा जोशी,अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार आहेत.

                   सर्वांमध्ये उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ ला रिलीज होत आहे.








majja.ooo : Ankita Lokhande.

ध्यानीमनी साठी हिंदी कलाकारांच्या शुभेच्छा...

                    हिंदी चित्रपटसृष्टीमधील कलाकार सध्या मराठी चित्रपटात विशेष रस घेत आहेत. काही चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आलेत चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'ध्यानीमनी ' या चित्रपटासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतले बिग बी अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी शुभेच्छा दिल्या असून फेसबुक आणि ट्विटर द्वारे ह्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.दिग्दर्शक म्हणून आपण महेश मांजरेकर यांचे चित्रपट पाहतो पण ते जेव्हा अभिनेता म्हणून पडद्यावर येतात तेव्हा त्यांच्या अभिनयाच्या कौशल्याने ते चित्रपटाचा स्थर आणखी उंचावतात.
                           या चित्रपटाचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालंय .. ट्रेलर बघता या चित्रपटाचं कथानक काहीस वेगळं आहे. काही संवाद कोड्यात पडायला लावतात कथानक काय असेल किंव्हा हि गोष्ट पुढे कशी वाढेल याची उत्सुकता हे ट्रेलर बघून वाढते.सध्या ह्या ट्रेलरची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. ग्रेट मराठा एंटरटेनमेंट प्रस्तुत ध्यानीमनी या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी केलं असून ह्या चित्रपटाचे निर्माते अनिरूद्ध देशपांडे, मेधा मांजरेकर असून लेखक प्रशांत दळवी आहेत. ह्या चित्रपटाची स्टार कास्ट देखील तगडी आहे...महेश मांजरेकर, अश्विनी भावे, अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडे हि स्टार मंडळी या चित्रपटात झळकणार आहे.
                             २०१७ ची दमदार सुरवात करून 'ध्यानीमनी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असं बोलायला हरकत नाही. १० फेब्रुवारी २०१७ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.





majja.ooo : Ankita Lokhande.

Monday, 9 January 2017

एक नवीन वेब सिरीज......‘योलो’

        मराठीमध्ये आता अजून एक प्रकार सगळीकडे पसरत आहे तो म्हणजे वेब सिरीझचा. बऱ्याच वेब सिरीज मराठी मध्ये चालू आहेत आणि प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरत आहेत. बन मस्का फेम शिवानी–शिवराज हे एका नवीन वेब सिरीज मध्ये पाहायला मिळणार आहेत.  बन मस्का ह्या मालिकेमध्ये ह्या दोघांची केमिस्ट्री खूप छान दाखवली गेली आहे आता वेब सिरीज मध्ये देखील काही बोल्ड सिन देऊन ह्या दोघांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

‘योलो’ असं या वेब सिरीजचं नाव असणार आहे. सोशल मीडियावर सध्या हा विडिओ गाजत आहे.
               विशेष म्हणजे साई ताम्हणकर हि देखील ह्या वेब सिरीज मध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ऋतुराज शिंदे, आनंद इंगळे तसेच अजून ओळखीचे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहे.
‘योलो’ हि वेब सिरीज ११ जानेवारीपासून चालू होत असून दर बुधवारी प्रेक्षकांना ही वेब मालिका पाहायला मिळणार आहे. आता प्रेक्षक हि मालिका कशी स्वीकारत आहेत यासाठी वाट पाहावी लागेल.






majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday, 7 January 2017

न झालेला बोभाटा...

                    अनुप जगदाळे दिग्दर्शित साईनाथ राजाध्यक्ष निर्मित 'झाला बोभाटा 'हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपटाचा इतका बोभाटा होत होता कि या चित्रपटात नक्की काय आहे ह्याचं सर्वांनाच कुतुहूल होतं . पण या चित्रपटात नवीन असं काहीच नाही सरळ साधं कथानक आणि तेच तेच सवांद यापलीकडे चित्रपटात नवीन असं काहीच नाही. चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये जो गोंधळ बघायला मिळतो तोच गोंधळ आपल्याला या चित्रपटात दिसतो. तसेच मयुरेश पेम आणि मोनालिसा बागुल यांची गरज नसतानाही लव्हस्टोरी दाखवली गेली आहे.

दिलीप प्रभावळकर सारख्या दिग्गज अभिनेत्यासाठी करण्यासारखे असे काहीच नव्हते. चित्रपटाची गाणीही यथातथा वाटतात. बॉलीवूड अभिनेत्री रीना अग्रवाल हिच्या ग्लॅमरस लुकचा काही वापर करता आला नाही. चित्रपट पाहून असे कळते की चित्रपटाने हवा तसा बोभाटा केला नाही .




majja.ooo : Ankita Lokhande.

'ती सध्या काय करते'

                       'ती सध्या काय करते' ह्या चित्रपटाचा गेला एक महिना खूप गाजावाजा होता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. प्रत्येकाच्या मनात कुठेतरी लपून बसलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर सतीश राजवाडे यांनी त्यांच्या पद्धतीने चित्रपटात मांडलं आहे. सतीश राजवाडे यांच्या 'ती सध्या काय करते' ह्या चित्रपटामुळे मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन रोमँटिक असा सिनेमा मिळाला असं बोलायला हरकत नाही. गोष्ट आहे अन्या आणि तन्वीच्या प्रेमाची. लहानपणापासून एकमेकांसोबत असलेले हे दोघे हळू हळू एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि गोष्टीला सुरुवात होते. भूतकाळ आणि वर्तमानकाळ हे योग्य पद्धतीने चित्रपटात दाखवण्यात आले आहे. चित्रपटात कुठेही गोंधळ उडत नाही अंकुश चौधरीने दिलेल्या आवाजामुळे चित्रपट बघण्यात विशेष गम्मत वाटते.

                  तेजश्री प्रधान ने नेहमी प्रमाणे आपली भूमिका चोख बजावली आहे परंतु अंकुशची आणि तेजश्रीची जोडी विशेष लक्ष वेधून घेत नाही. अंकुशचा अभिनय उत्तम आहे. नवीन जोडी म्हणजेच अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर यांनी काही ठिकाणी बरा अभिनय केलाय पहिलाच चित्रपट असल्यामुळे दोघे जरा अवघडलेली वाटली. खरी मज्जा आणलीये ती लहानपणीचे तन्वी आणि अन्या म्हणजेच निर्मोही आणि हृदितने. अत्यंत समजून आणि जीव ओतून केलेला त्यांच्या अभिनय चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. सुकन्या कुलकर्णी, संजय मोने, तुषार दळवी, अनुराधा राजाध्यक्ष यांचा अभिनय बऱ्यापैकी वेगळा आहे. चित्रपटांची गाणी सुरेख आहेत तसेच दिग्दर्शन उत्तम झालंय.हा चित्रपट बघताना मनात दडून राहिलेल्या प्रश्नांना उत्तर नक्की मिळेल. प्रेमाचा एक वेगळा चित्रपट अनुभवायचा असेल तर हा चित्रपट नक्की बघा.




majja.ooo : Ankita Lokhande.