Saturday, 7 January 2017

दादा कोंडके एक अष्टपैलू कलाकार...

                                मराठी चित्रपटसृष्टीला खदखदून हसवणारे अष्टपैलू अभिनेते म्हणजे दादा कोंडके.  दादा कोंडके यांचे खरे नाव म्हणजे कृष्णा कोंडके. मराठमोळे अभिनेते ज्यांनी मराठी चित्रपटांतून अभिनय केला आणि ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. दादांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ झाला. आपण काहीतरी वेगळं करावं असं त्यांना प्रत्येक वेळेस वाटत असायचं म्हणून त्यांनी एका बँड पथकामध्ये सहभाग घेतला आणि तिथे सगळे सगळे त्यांना बँडवाले दादा म्ह्णून ओळखायला लागले. माझ्यावर एकतरी नाटक करा असं ते प्रत्येकवेळी म्हणायचे तेव्हाच वसंत सबनीसांनी दादांना घेऊन विच्छा माझी पुरी करा हे नाटक केलं. या नाटकाचे १५०० हुन अधिक झाले आणि हाच दादांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. दादा अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी राज्यभर दौरे केले लोकांची बदलत जाणारी भाषा तसेच भाषांचे प्रकार ह्याचा त्यांनी अभ्यास केला आणि चित्रपट निर्मिती चा विडा उचलला. त्यांच्या सवांदफेकीमुळे त्यांच्या सर्व भूमिका महाराष्ट्रात लोकप्रिय झाल्या आणि पडत्या काळात मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले.
                    त्यांची संवादफेक म्हणजे बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्या. लोकांना त्यांची हि कला बऱ्यापैकी पटली. त्यांच्या नेमक्या ठिकाणी पॉंझ घेण्याच्या स्टाईल ने लोकांना वेड लावून सोडले. तांबडी माती या चित्रपटात त्यांना प्रथमच मोठ्या पडद्यावर काम करायला मिळाले. त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे सोंगाड्या. सोंगाड्या चित्रपटात काम करून त्यांनी त्यांच्या अभिनयाचे कौशल्य जगभरात दाखून दिले. सुरवातीला सोंगाड्या ह्या चित्रपटाला बरेच विरोध आले नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशावरून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि तो सुपरहिट झाला. दादांनी नंतर स्वतःची निर्मिती संस्था सुरु केली ती म्हणजे कामाक्षी पिक्चर्स. दादांच्या चित्रपटांना नेहमीच सेन्सर च्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असत. त्यामुळे त्यांची नेहमी वाद्ग्रस्थ विषयांमध्ये चर्चा असायची त्यांचे बरेच चित्रपट सेन्सर बोर्ड ने अडवले.


                        त्यांचे सलग ९ चित्रपट २५ आठवडे सुपरहिट ठरले आणि सिल्वर जुबली झालेल्या या सर्व चित्रपटांमुळे मराठमोळ्या दादांचं नाव गिनीज बुक मध्ये नोंदवण्यात आलं. दुअर्थी विनोदाकडे झुकणाऱ्या संवादामुळे त्यांच्या चित्रपटांना प्रसिद्धी मिळाली. काही लोकांना त्यांचे हे विनोद पटण्यासारखे नव्हते परंतु बाकी प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर उचलून धरलं. त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील काम केलं त्या चित्रपटांची नावं जरा हटके असायची तेरे मेरे बीच मे,अंधेरी रात मी दिया तेरे हाथ मे,आगे कि सोच,खोल दे मेरी जुबान यांसारखे चित्रपट दर्जेदार ठरले. त्यांनी पांडू हवालदार या त्यांच्या चित्रपटाचं त्यांनी हिंदी मध्ये रूपांतर करून गुजराती मध्ये नंदू जमादार हा चित्रपट प्रसिद्ध केला. दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांनी                                 अभिनेता,निर्माता,गायक,गीतकार,कथाकार,पटकथाकार,दिग्दर्शक,आणि संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून प्रवास केला.
                           अखेर १४ मार्च १९९८ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दादांची प्राणज्योत मावळली. प्रेक्षकांना हसवून सोडणाऱ्या मराठी चित्रपटांचं नावं  अजरामर करणाऱ्या आणि दोन दशक अधिपत्य गाजवलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्याला majja.ooo चा मनाचा मुजरा.





majja.ooo : Ankita Lokhande.

Friday, 6 January 2017

मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा रंगमंचावर....

                       महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निस्वार्थी हेतूने काम करणाऱ्या आणि अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणजेच मकरंद अनासपुरे. "नाम" या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यात रमलेले मकरंद अनासपुरे हे लवकरच रंगमंचावर झळकणार आहेत. सुयोग संस्थेच्या माध्यमातून ते नाटकात काम करणार आहे. मकरंद अनासपुरे हे बरेच महिने रंगमंचापासून लांब आहेत त्यांचं रंगमंचावर पुन्हा एकदा पदार्पण हि त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास भेट असणार आहे. सुधीर भट यांच्या सुयोग्य या संस्थेचा १ जानेवारी रोजी ३२ वा वर्धापन होता या नवीन वर्षात सुयोग्य ५ नवीन नाटकं घेऊन येणार असून त्यापैकी एका नाटकामध्ये  मकरंद अनासपुरे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेपथ्यकार प्रदीप मुळे दिग्दर्शक म्हणून प्रथमच नाटकातून पुढे येणार आहेत. त्याचसोबत ते नेपथ्य,प्रकाश,आणि वेषभूषाही सांभाळणार आहेत.

               
                          सामाजिक विनोदी असलेलं हे नाटक मार्च महिन्यात रंगमंचावर येणार आहे.





majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday, 5 January 2017

राजन चित्रपटात झळकणार दुर्गा पाटील हिचा चेहरा...

                  छोटा राजन याच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट 'राजन' हा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर राजनच्या भूमिकेत दिसणार आहे. संतोष सोबत एक नवीन चेहरा आपल्याला दिसणार आहे तो म्हणजे दुर्गा पाटील हिचा. अवघ्या १९ वर्षात एवढ्या मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी भेटणं हि दुर्गासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं ती म्हणते. चौदावीमध्ये शिकत असलेल्या दुर्गाला रग्बी खेळ खेळायची आवड आहे. भारतामध्ये रग्बीला पाहिजे तेवढं महत्त्व दिले जात नसून दुर्गा रग्बी नॅशनल प्लेअर आहे. तसेच तिने मार्शल आर्टस् मध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे.
                    रंगमंचाची भीती दुर्गा मध्ये कधीच नव्हती. लहानपणापासून दुर्गाला नृत्याची प्रचंड आवड आहे ती इंटरनॅशनल डान्स अकॅडमी मध्ये डान्स इंस्ट्रक्टर सुद्धा होती. राजन चित्रपटातील राणी या भूमिकेसाठी जेव्हा तिची निवड झाली तेव्हा २३० मुली होल्डवर होत्या या सर्वांमधून जेव्हा दुर्गाची ची निवड झाली ती फक्त तिच्यातील अभिनयाच्या आवडीमुळे आणि रंगमंचावरील प्रेमामुळे. जेव्हा दुर्गाची निवड झाली तेव्हा तिच्या देहबोली आणि भाषाशैली वर विशेष मेहनत घेण्यात आली चित्रपटातील राणी या भूमिकेसाठी दिग्दर्शक भरत सुनंदा यांना कठोर,प्रेमळ आणि नाजूक अशी मुलगी हवी होती खेळाडूवृत्ती असलेल्या दुर्गाला ह्या भूमिकेसाठी तयार करताना ६ महिन्यांचा कालावधी गेला. पहिल्यांदाच संतोष जुवेकर सोबत काम करण्याच्या अनुभव वेगळाच होता असं ती म्हणते. तिने खेळामध्ये खूप काही केलं असून आता तिला फक्त अभिनयाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. या सर्व प्रवासात तिचे बाबा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी तिला महत्वाची साथ दिली. 'या चित्रपटामुळे माझ्यात खूप बदल झालाय.माझी देहबोली बदलली आहे आणि हा बदल मला आवडतोय,मला अभिनयात अजून रस आलाय ' असं दुर्गा म्हणते.
                   ध्येय पूर्ण करण्याची  जिद्द माणसाला कधीतरी चुकीच्या मार्गावर घेऊन जाते आणि आयुष्यात कशा प्रकारचे बदल होतात असे काहीसे कथानक या चित्रपटाचे असणार आहे. चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील   असून सह-निर्माते दीप्ती श्रीपत आहेत.दिग्दर्शक भरत सुनंदा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिधम मुव्ही प्रेजेंटसोबत मुदिता फिल्म्स प्रस्तुत राजन हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.






majja.ooo : Ankita Lokhande.

Wednesday, 4 January 2017

महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त बनवण्यासाठी मराठी कलाकारांचे योगदान...

                      महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त बनवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यात अमीर खाननेही हातभार लावलाय दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी अमीर खान आणि किरण राव यांनी ' पानी फाऊंडेशन ' हि संस्था सुरु केली.सत्यमेव जयते या संस्थेच्या काही महत्वाच्या मंडळींनी या उपक्रमात मोलाची साथ दिली. या संस्थे अंतर्गत अनेक मराठी कलाकारांनी देखील योगदान दिले आहे. सई ताम्हणकर,सुनील बर्वे, नागराज मंजुळे, अजय -अतुल,रिंकू राजगुरू,आकाश ठोसर,तानाजी गलगुंडे,अरबाज शेख,फातिमा सना खान,सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी आणि अमीर खान हे सगळे स्टार आपल्याला एका गाण्यातून दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचा सल्ला देत आहेत. अजय अतुल रचित आणि गुरु ठाकूर लिखित 'तुफान आलं' हे गाणं नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलं असून अजय गोगावले यांच्या आवाजातून हे गाणं सजलेलं आहे.विशेष बाब म्हणजे यात किरण राव हिने पहिल्यांदा गाणं गायले आहे.


 महाराष्ट्रातील एकंदर परिस्थितीवर भाष्य करणार हे गाणं आहे. महाराष्ट्रातील सत्य परिस्थिती नागराज मंजुळे यांनी आपल्या दिग्दर्शनातून दाखवून दिली.  'तुफान आलं' हे गाणं सध्या youtube वर उबलब्ध आहे. या महत्वपूर्ण कामासाठी दंगल,सैराट टीम तसेच इतर कलाकारांना majja.ooo तर्फे शुभेच्छा.








majja.ooo : Ankita Lokhande.

Tuesday, 3 January 2017

प्राजक्ता माळी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर...

                   यावर्षी झी मराठी प्रेक्षकांसाठी दोन नवीन मालिका घेऊन येत आहे एक तर 'चूक भूल द्यावी घ्यावी'हि मालिका आपल्याला माहीतच आहे आता दुसरी अजून एक मालिका येतेय ती म्हणजे 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' ... या मालिकेचं नाव हटके तर आहेसच परंतु याचं कथानक देखील वेगळं आहे. झी मराठी प्रत्येकवेळी असंच नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांपर्यंत येते आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

                     जुळून येति रेशीमगाठी या मालिकेतून नावारूपाला आलेली प्राजक्ता माळी नवीन मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच  ओळखीचे चेरे देखील आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे..... 



झी मराठी कडून नवीन वर्षाची भेट म्हणून हि मालिका ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं...’ १८ जानेवारीपासून बुध-शनि रात्री १० वाजता बघायला विसरू नका.






majja.ooo : Ankita Lokhande.

Monday, 2 January 2017

प्रतिभावंत अभिनेत्री मुक्ता बर्वे...

                 आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक मनांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. तिच्या बऱ्याच भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. तिच्या प्रत्येक भूमिकेत काहीतरी नावीन्य असतेच.कामाच्या संख्येपेक्षा कामाच्या दर्ज्याला ती अधिक महत्व देते.जोगवा,धोबी पछाड,मुबई पुणे मुंबई,डबल सीट,गणवेश यांसारखे दर्जेदार चित्रपट देऊन ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तसेच एका लग्नाची दुसरी गोष्ट या छोट्या पडद्यावरील मालिकेने प्रेक्षकांना वेड लावून सोडले. अभिनयाशिवाय मुक्ताला वाचायला खूप आवडते. तसेच तिचे मांजरीवर खूप प्रेम असून #cocojeeva आणि  #smokeyjodha अशी तिच्या मांजरीची नावं आहेत.

तसेच मुक्ताला फोटोज क्लिक करायला खूप आवडतात. ती जिथे जाईल तिथल्या आठवणी तिला कॅमेरा मध्ये सेव करायची प्रचंड आवड आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिने काढलेल्या सुंदर फोटोसची गॅलरी पाहायला मिळते.
शिवाय ती स्केचिंग हि उत्तम करते. तिच्या अकाउंटवर तिने काढलेली चित्र हि पाहायला मिळतात.
        अभिनयासोबत इतर गोष्टींची आवड जपणाऱ्या प्रतिभासंप्पन मुक्ता ला खूप शुभेच्छा.








majja.ooo : Ankita Lokhande. 

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदा अंडर वॉटर गाण्याचं शूटिंग....

                             मराठी चित्रपटसृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून येत्या काळात मराठी चित्रपटांना एक कमालीची उंची दिली आहे. कथानक असो किंव्हा स्टारकास्ट या सर्व बाबतीत वेगळेपण पाहायला मिळतं. त्यामुळे मराठी प्रेक्षक आता प्रत्येक चित्रपटाकडे एका वेगळ्या आशेने बघतो. 'प्रेमाय नमः' हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रेमावर आधारित हा चित्रपट आपल्याला १० फेब्रुवारी २०१७ ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग हे  अंडर वॉटर करण्यात आले आहे. एक पूर्ण गाणं अंडर वॉटर करण्याचं धाडस या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने उचललं आहे. विशेष म्हणजे मराठी मध्ये पहिल्यांदा असा प्रयोग करण्यात आला असून  हा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही.
  




  व्हाईट ओनियन एंटरटेनमेंट प्रस्तुत जगदीश वठारकर दिग्दर्शित 'प्रेमाय नमः' हा चित्रपट नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काहीतरी नावीन्य आणेल. 







majja.ooo : Ankita Lokhande.